नाना ..... नाना जन्म तारीख 10 एप्रिल 1943 शिक्षण पाचवी ते सातवी . सर्व्हिस मिलीट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (M.ES.) माझ्या सासरी आणि माहेरी वयाने सर्वात मोठे असल्यामुळे मला मनोमनी नेहमी अभिमान वाटत असे की आपल्या घरात कुणीतरी स्वतंत्र काळापुर्वीचे जुन्या पिढीतील वरिष्ठ व्यक्ती अजूनही आहे . माझ्या दोन्ही आजोबांनंतर सासरेच ह्या पिढीचे ह्या वयाचे होते . सतीश त्यांना बाबा न म्हणता नानाच म्हणतात ते मला आवडत आणि म्हणून मी पण सासऱ्यांना मामा न म्हणता नानाच म्हणते . सासरच्या मंडळीतील मला नाना च जास्त आवडायचे . माझ्या लग्नात मनाजोग्या बॉटल ग्रीन शालूसाठी मी त्यांना खूप फिरवलं होत . त्यावर त्यांनी मला टोकल एवढं काय त्या हिरव्या रंगाचं ?, तुला कोणताही रंग खुलून दिसलं घेऊन टाकायचा होता दुसरा कुठलाही . हा का नाना ...?, कुठला घ्यायला पाहिजे होता ?. चॉकलेटी मरून घ्यायचा होता तो भारी दिसला असता तुला . चॉकलेटीच का हो नाना ? मला तोच आवडतो ,..... हा .. हा ... हा .... नाना ! मग तसच मला पण बॉटल ग्रीन खू...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....