मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

#अमेरिकन_डायमंड_ची_ओळख....

#अमेरिकन_डायमंड_ची_ओळख.... आज मी पुन्हा एक नवीन रील आणि युट्युब शॉर्ट व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोन सुंदर अमेरिकन इमिटेशन डायमंड नेकलेस सेट – तेही कनकवर्णी (सोनेरी वर्ण) सोन्यासारखी झळाळी असलेल्या सोनसळी साडी सोबत सौंदर्य आणि शैलीचा परिपूर्ण संगम असे दागिने आणि साडी परिधान केले आहे. साडी बद्दल खास सांगायचं झालं तर हि साडी मम्मीने आणि मी नाशिकमधूनच काकांच्या मुलीच्या हळदीसाठी विशेष घेतली होती. माझ्या बऱ्याच मैत्रिणी नेहमी विचारत असतात तू साड्या कुठून घेते तर, मी सद्य परीस्थित जिथे असते तेथील बाजारातूनच शोधून शोधून मनाला बघितल्या क्षणी हा हि साडी भारी आहे!, हि मस्तए ना मम्मी? असं जेव्हा वाटेल तेव्हा तीच साडी पटकन उचलून अंगावर टाकून बघते.. हा...! हि आवडली!... बस अशी साड्यांची खरेदी असते. आता बघूया तारा ज्वेलरी मधील दागिन्यांची विशेषतः.....सौंदर्य, देखणेपणा आणि आकर्षकतेचा मिलाफ म्हणजे आमचा इमिटेशन अमेरिकन डायमंड नेकलेस सेट. लग्नकार्य, समारंभ, पार्टी किंवा खास प्रसंगी तुम्हाला हवा असतो असा दागिना जो तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो – आणि तोही किफा...
अलीकडील पोस्ट

#खुपदिवसानंतर...

मैत्रिणींनो कशा आहात?... माझे “क्षणांनी भरलेले आभाळ" यात खूप दिवसातून आज काहीतरी लिहावं असं वाटलं म्हणून मी थांबवलेलं लिखाण आज सुरु केले. यामागे खरतर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा अट्टहास आहे. ज्या खरोखर आवर्जून माझे लेख वाचत असतात. खास त्यांच्यासाठी मी पुन्हा लिखाण सुरु केले. आणि मुख्य म्हणजे माझा सर्वात पहिला लेख जो माझ्या फेसबुक, ब्लॉग आणि सोशल मीडियावरील अनेक महिलांच्या गटांमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता. तो म्हणजे "लग्नातील शालू"👇 https://www.facebook.com/share/1B2jhAN5LE/?mibextid=wwXIfr आवर्जून सांगावस वाटत कि ह्या वेळेस साडी सोबत माझ्या तारा ज्वेलरी मधील दागिन्यांबद्दल सुद्धा मी लिहिणार आहे. आशा आहे तुमचा प्रतिसाद मला तसाच मिळेल जसा माझ्या पहिल्या साडीच्या लेखाच्या वेळेस मिळाला होता. चला तर मग बघूया माझी साडी आणि दागिन्यांची सांगड लिखाणाने कशी उत्कृष्ट शोभून दिसते ते.... तारा ज्वेलरी मध्ये ह्या वेळेस उत्कृष्ट असे महाराष्ट्रीयन दागिन्यांचं संग्रह आलेला आहे. त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठ. ह्या फेसबुक पेजला आत्ताच फॉल्लो करा.👇 https://www.facebook.com/...

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

होळी निमित्त नवीन ज्वेलरी आली, भयंकर कामाच्या व्याप्यात एकटीने एकदिवस एक रात्रभर फोटोशूट व्हिडीओग्राफी केली.... ज्वेलरीची प्रायसिंग ट्यागींग करणं फोटो साठी तयार होणं प्रत्येक सेट वर शोभेल अशी साडी मेकअप गेटअप सगळं परफेक्ट बसवणं दहा फोटो काढून एक सिलेक्ट करणं 2,4 व्हिडीओ काढून एक सिलेक्ट करणं घरातली काम वेगळी..  मी ज्वेलरी बिसनेस सुरु करताना "ऑनलाईन" सुरु केला मला ऑनलाईन अधिक जास्तीस्त जास्त ऑफलाईन ऑर्डर्स मिळत गेल्या त्यामुळे बरेच फोटोशूट व्हिडीओशूट नकरताच ज्वेलरी सेल झाल्या त्यामुळे माझ्या बऱ्याचशा फॉलोवर्स ला माझ्यामधील सर्व डिझाइन्स पाहायला मिळाल्या नाहीत आणि त्यामुळेच मी आता ठरवलं सर्व डिझाइन्स चे फोटोस व्हिडीओस करूनच पुढील दागिन्यांची विक्री सुरु करायची....  त्यासाठी भरपूर मेहनत भरपूर वेळ एकटीला द्यावा लागेल. दोन वेळेस दोन मुलींना ज्वेलरीचे काम दिले, फोटोग्राफर ला काम दिले मनाजोग काम कुणीच केले नाही आता पासून पुढे स्वतःच सगळी काम करायचे ठरवले.... नऊ हातांची ताकत एकाच हातात आहे बरं….. बाकी वरील विचार येतो कधी मध्ये डोक्यात……. होळीच्या आणि जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभे...

#मेष­_श्रावण_शॉपिंग_फेस्टिवल_एक्झीबीशन_मधील_तारा_ज्वेलरी.....

      #मेष­_श्रावण_शॉपिंग_फेस्टिवल_एक्झीबीशन_मधील_तारा_ज्वेलरी.....             तारा ज्वेलरी हा व्यवसाय सुरु करतांनाच मी हे  डोळ्यासमोर  ठेउनच व्यवसाय सुरु केला कि आपण एक्झीबीशन्स मध्ये आपले दागिने ठेवायचे, मग एक्झीबीशन्सची शोध मोहीम सुरु केली आणि त्यातील यादीतून सर्वात आधी निवडले ते मेष एक्झीबीशन आणि जपान मधून भारतात आल्याबरोबर ज्वेलरीचा स्टॉक वाढवला आणि येत्या एक्झीबीशनला जोडले गेले. थोडा उशिरा स्टॉल बुक केल्यामुळे शेवटचा स्टॉल मिळाला पण असतो सुरवात झाली हे म्हत्वाच. पुढे त्यात बऱ्याच अडचणी आणि बऱ्याच गोष्टी जुळवून घ्यायच्या कशा हेच कळत नव्हते. उदा. एक्झीबीशनसाठी कमीतकमी पाच ते सात दिवस बाहेर गावी जावे लागणार मग माझ्या पिल्लूची काळजी वाटू लागली ह्या विचाराणे हिम्मत होत नव्हती कि बाळाला एवढे दिवस आपल्यापासून लांब कसे ठेवायचं?. पण मम्मी पप्पांनी धीर दिला आणि चिंता न करता पुढच पाऊल टाक आमच्या कडे पिल्लू मस्त राहील. काय त्यात सकाळी शाळेत सोडवू, दुपारी घरी आल्याबरोबर जेवण झोपला कि संध्याकाळी उठल्याबरोबर पाऊस नस...

Let’s go on helicopter ride🚁🇯🇵

  # Lucky _ Boy...... #Dream_Girl(part two) # Follow _Dreams, #They_Know_The_Way https://fb.watch/dVdZZ36z5_/ क्रमश.... पहिला लेख लिहिला तेव्हा वाटल नव्हत त्याचा क्रमश पुढील लेख असा पण मला लिहायला मिळेल.... चला वाचूया....क्रमश मधील गमतीजमती..... शेवटी माझे बालपण कुठेच हरवले नाही, ते आजची अनुभवास येते........   बाळ माझे विदेशातच जन्माला आले, आणि तीन महिन्याचे असल्यापासूनच त्याचा विमान प्रवास सुरु झाला. पंधरा दिवसाचा असल्यापासूनच त्याला प्रवासाची सुरवात मी केली होती. त्यामुळे त्याला फिरायला भयंकर आवडत प्रवासाला निघायचं म्हणजे त्याला खूप आनंद होतो कुठेही फिरायला आवडत त्याला केवळ नाव माहिती झाल पाहिजे बस्स्स्स.... तिथे फिरून येईपर्यंत त्याचा हट्ट पूर्ण होत नाही. चार पाच महीन्याच असल्यापासूनच पोरग बाहेर फिरायला जायचा हट्ट करायला शिकला. मी पण त्याच्या ह्या हट्टाला कुठेही कमी पडायचं नाही अस ठरवून त्याला जे जे ठिकाण फीरवता येईल जे जे त्याला आणि त्याच्या वायोमानाला समजेल ते ते त्याला दाखवायचं फिरवायच. उदाहरणार्थ निसर्गाच्या सानिध्यात लहान मोठ्या पार्क मध्ये खेळायला नेण्य...

ओळख तारा ज्वेलरीची....

  ओळख तारा ज्वेलरीची...         नमस्कार, मी राजश्री जगताप. सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष आनंदचे सुखाचे समृद्धीचे जावो त्याच बरोबर आपण केलेले संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य निर्माण होवो. कसे आहात? निश्चितच मी गृहीत धरते सर्व कुशल मंगल असावे. कोविडच्या वातावरणातून आपण बाहेर येतो न येतो तोच आता ओमिक्रोन नावाच्या विषाणूने पुन्हा लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. परंतु आपण घाबरून न जाता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे आहे. कोविड ओमिक्रोन अशा प्रकारचे अनेक विषाणू भविष्यात उद्भवण्याची संभावना आहे परंतु, जग आणि जगातील मनुष्य प्राणी हा कधीच थांबला नाही न त्याची प्रगती थांबते हे आपण अनुभवल आहेच. त्यामुळे प्रत्येकाने निवडलेल्या आपापल्या मार्गावर निर्धास्थ चालावे हीच सदिच्छा...        आज अचानक व्हिडीओ बनविण्याचे कारण असे कि, जानेवारी २०२२ नवीन वर्षात मी माझ एक छोटस स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगू इच्छिते आणि त्याच्या पुढील वाटचालीस तुमच्या शुभेच्छा मिळाव्यात अशी आशा व्यक्त क...