मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस.....

वाढदिवस.....         वाढदिवस साजरा करण्याच वेड मला लहान पणापासूनच आहे. हा दिवस सगळ्यांच्याच खूप खूप आवडीचा असतो मी तर, आज वाढदिवस झाल कि लगेच पुढच्या वाढदिवसाची वाट पाहत असते, नवीन दिनदर्शिका आणताच कोणत्या वारी वाढदिवस येतोय मागच्या-पुढच्या दिवसात कोणते सण वार आहेत. हे तपासात असते. दरवर्षी त्याच सोहळ हे सारखच असत बरं... नाही, म्हणजे नवीन-नवीन छान-छान कपडे घेण, त्यावर सगळ काही जुळणार म्हणजे (Matching-maching) जस कानातले, गळ्यातल, बांगड्या, नेलपोलिश, लिपस्टिक सगळ सगळ सगळच... जे आवडत ते केक आणणे, घर सजवणे, आवडीच जेवण बनवणे नाही Sorry-sorry चुकले-चुकले लग्ना अधी मम्मीला बनवायला सांगायची आणि लग्ना नंतर कुणी जेवण बनवत का? अशा खास दिवशी हाःहाहा:.हा:... आणि यात सगळ्यात मुख्य म्हणजे मला मम्मी जेव्हा औक्षण करते तेव्हा खूपच आवडत अगदी मी लहान असल्यापासून, मम्मीच्या हातातल ताट फिरत तशी आपली नजर फिरत असते, त्या दिव्याची वातीचा लख्ख प्रकाश त्यादिवशी फक्त आपल्यासाठीच असतो. वाह:... किती छान वाटत ना?, अगदी आपण वयाने कितीही मोठे जाहलो तरी, त्या ओवाळणाऱ्या...