मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इथून पुढे कधीच विसरणार नाही.....!

इथून पुढे कधीच विसरणार नाही.....!          बायकोचा वाढदिवस जर नवरा विसरला तर त्याची काय अवस्था होऊ शकते याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे. नाही का?, पण बायको मात्र नवऱ्याचा वाढदिवस विसरली तर जास्तीत जास्त काय होत ओ....? मी सांगते.... ऐवढा मोठ्ठा काही गुन्हा होत नसतो. हो पण हे त्या पुरुषावर अवलंबून असत कि तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो हेहि मात्र तेवढेच खरे... आमच लग्न ठरतांना आम्ही एकमेकाला जन्मतारखा सांगितल्या होत्या. आमच्या साहेबांनी मला त्यांची खरी जन्मतारीख सांगितलेली होती. तिचा काही येवढा कधी विषय झाला नाही. खरी म्हणजे कागदोपत्री वेगळी लावलेली आहे. थोड्या दिवसांनी मला एक नवीन सिमकार्ड घ्यायचं ठरल, दुकानात गेले असता का कोण जाणे पण मला एक नंबर आवडला तो घेतांना असंच मनात विचार केला यांची जन्मतारखेचा आकडा आहे ह्या नंबर मध्ये चला तर घेऊया हाच.        लग्न झाल, Visa च काम करण्यासाठी मुंबई ला दोघे निघालो होतो, तेव्हा एकमेकांचे कागदपत्र व्यवस्थित फाईल मध्ये लावत असतांना आढळल यांची जन्म तारीख वेगळी आहे. अं..अ...अ.... फसवल कि काय ...