मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संकल्प.....!

संकल्प.....! image from internet         शाळेत असतांना संकल्प म्हणजे कोणते तर लवकर निजे लवकर उठे, लवकर उठून ध्यान करणार, खूप खूप अभ्यास करणार, खूप वाचन वाढवणार, केलेल्या वेळापत्रकानुसार दैनंदिन नियोजन काटेकोरपणे पाळणार, रोजनिशी लिहिणार, तेब्बेतीकडे लक्ष देणार, ह्या वर्षी सगळ्या वर्षापेक्षा सर्वोत्तम शालेय गुण मिळवणार.... असे अनेक अनेक अनेक संकल्प असायचे पण चार पाच वर्ष फक्त संकल्प करण्यातच निघून गेले.         आणि मग, काही वर्षाने लक्षात आले अस काही नसत ह्या जगात...! ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ज्या आपल्याकडून पाळल्या जात नाहीत. एवढ्या सकाळी कोण उठत का कधी?, एवढा अभ्यास फक्त हुशार मुल करत असतात, दैनंदिन नियोजन हे तर उगवणारा दिवस किती वाजता उगवतोय त्यावर ठरेल ना?, रोजनिशी काय लिहायची रोज मरे त्याला कोण रडे?, तब्बेत काय?... आहेत मम्मी पप्पा ते देताय ना लक्ष?, बाकी शालेय गुणांचा आलेख मात्र एकएक गुणाने का होईना वाढता होता. तो कधी खाली नाही आला. याच समाधान खात्रीशीर होत, बाकी सर्वोत्तम गुण वगैरे पाहू हळूहळू. ...