मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तूच माझी Valentine.......!

तूच माझी Valentine.......!        भाग-१          बारा तारखेच्या रात्रीच्या बारा नंतर कानाजवळ फूसफूस करतोय Happy Valentines Day... मी ब्ल्यांकेट मध्येच हळूच हसले येड्यायाया उद्या तेरा तारीख आहे. अस बोलू वाटल होत, पण म्हंटल जाऊदे, जाऊदे गम्मत बघ.. I love you Raju... हा.हा..हा... सकाळीस उठल्याबरोबर अरे..!, आज तेरा तारीख आहे, मी रात्रीच विष करत होतो तुला... गालातल्या गालात हसले. एरवी नेहमी म्हणत असतो “मी असले डे वैगरे काही साजरे करत नाही ग.. प्रेमाचा एक दिवस ठरवावा लागतो.. याचा अर्थ किती दयनीय परिस्थिती त्या “प्रेमाची” आजच्या युगात झालीय बघ”....!          असच मला लग्न ठरल्या नंतरच्या Valentine च्या दिवशी म्हणालेला. पण न विसरता आठवणीने त्याच्या आधल्या रात्री फोन वर विचारून मला विष मात्र केल. लग्न ऑगस्ट मध्ये ठरलेलं होत. फेब्रुवारीच्या तेराला रात्री विचारतोय “तर, मग उद्या Valentine Day! आहे. मी विष करायचं का तुला? हा.हा.हा.. अग हसतेय काय?, बोल... जाऊदे करतो विष Happy Valentines ...