मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विदेशी दुखः....!

विदेशी दुखः....!                 जपान मध्ये आंबे भेटणे म्हणजे मला स्वर्ग सुखाप्रमाणे भासले. सुरवातीला मला इथे एवढी कल्पना नव्हती कि टोकियो मध्ये आंबे मिळतील म्हणून एक दोन वर्षी आम्ही चार चार आंबे आणले होते. मात्र ते भारतीय नव्हते, त्यामुळे त्यांची चवही फारशी आम्हाला आवडली नव्हती. आणि किंमतही सोने खरेदी केल्याप्रमाणे. पण हल्ली बरचस आयात निर्यात वाढल आहे. उद्योग-धंदे वाढले आहेत. त्यामुळे विदेशातही स्वदेशी वस्तू मोठ्या प्रमाणत उपलब्ध होत आहेत. परंतु त्या प्रेत्येक गावात किंवा शहरात अजून पोहचत नाहीत. त्यामुळे त्यासाठी डिलिवरी चार्ज भरून आपल्या शहरात मागवावे लागते. आता काही वेळेस हे शक्य होत असते परंतु काही वेळेस दुपटी तिपटीने पैसे देऊन देखील एवढ्या लांबहून वस्तू मागवणे यात काही शहाणपण वाटत नाही. सोशल साईट वरून जस जस मला भारतीय वस्तूंचा पत्ता लागत असतो तस तस मी नवऱ्याला कळवते आणि लगेच माहिती काढून एकदा तरी ती गोष्ट मागवून बघायची हा ध्यास मनी असतो. मग काय आवडल तर पुढच्या वेळेस देखील मागवायच.     ...