मुख्य सामग्रीवर वगळा

फेसबुक फ्रेंड



मीरा ताईंची आणि माझी ओळख ही फेसबुक वर झाली.  "माझ्या लग्नातील शालू" हा लेख त्यांनी वाचला होता त्यानंतर त्या माझ्या फेसबुक पेजच्या फॉलोवर झाल्या माझ्या प्रत्येक फोटोला, लेखाला त्यांची कमेंट असायची. त्यानंतर एकदा मेसेंजर वर बोलणे झाले, फोन नंबर दिल घेतले. मग काय आम्ही बऱ्याच वेळ फोन वर बोलायचो. त्यात जवळची ओळख आमची अशी की आम्ही दोघीही नाशिक मधल्या. त्या मला नेहमी म्हणतात फेसबुक वर मैत्री करणे थोडे कठीण असते आपण लगेच कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु मी जेव्हा तुझे लेख वाचते तेव्हा तुझ्या सोबत बोलत असल्याचा भास होतो. इतके खर आणि स्वच्छ मनाने लिहिते. त्यामुळे तुझ्यासोबत मैत्री करतांना पटकन विश्वास बसला. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आणि माझ कौतुक त्या नेहमी करत असतात. मी नशिकला भारतात लवकरात लवकर याव अशी त्या वाट पाहत होत्या. त्यात मी गरोदर आहे असे समजेल तेव्हा तर तू बाळंतपणासाठी घरीच ये असे त्यांचे कडक सांगणे होते. माझी बरिच काळजी त्या फोन वर व्हाट्सअप वर घेत असे. मला बाळ झाल्यानंतर ही त्या मी एकटिने जबाबदारी पार पाडल्याच भरपूर कौतुक करत असे. मी भारतात आल्याबरोबर माझा फोन बंद पाहून मेसेंजर ला संपर्क साधुन त्या मला साडी आणि  बाळाला गिफ्ट घेऊन त्यांच्या कुटुंबा समवेत भेटायला आल्या. त्यात आमची भेट ही महिलादिना दिवशी ८ मार्च २०२० ला झाली त्यामुळे आमच्या भेटीचा दिवस मला फार छान लक्षात राहिल. त्यात महिलादिना दिवशी मैत्रिणींकडून एकमेकिंना साडी मिळाली महिलांची आवडती वस्तु म्हणजे सोने पे सुहागा.
आता मीरा ताईं बद्द्ल सांगायच झाल तर त्या माझ्या पेक्षा वयाने फार मोठ्या आहेत. माझ्या मम्मीच्या वयाच्या जवळपास परंतु सोशल साईट वर सुरवातीला मावशी काकू म्हंटल तर हसायला येते म्हणून ताईच म्हणायचे तर त्या कायमस्वरुपीच्या ताईच झाल्या. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. फार सहनशक्ती शील स्त्री आहे. आयुष्यात मोठे मोठे संघर्ष केल्यानंतर त्यांच्या पदरी जे काही आज यश आहे त्याचा मला फार अभिमान वाटतो. अवघड परिस्थितीत मुलांच संगोपन करुण त्यांची शिक्षण, घर, संसार मुलांना दुचाकी चार चाकी वाहन घेणे हे सगळ सुखा सुखी मुलांना पुरवने एका आई साठी मोठा संघर्ष असतो आणि आज त्या हया संघर्षला हरवून जिंकल्याच कौतुक कराव तेवढ कमीच आहे. त्यांची मुले संकेत आणि श्रावणी. संकेत सोबत माझी भेट होणे बाकी आहे. पण श्रावणी फार गोड आणि नाजुक, हळूच प्रेमाने थोडच बोलणारी, तिही बिचारी पेचात पडली की राजश्री मावशी म्हणू की दीदी. असो ते फार महत्वाच राहत नाही जेव्हा मन जुळली जातात. प्रत्युष च आणि तीच छान जमल तास दोन तास त्याला घेऊन फिरवत होती खेळत होती.
माझ्या मम्मी पप्पांना देखील फार कौतुक वाटल फेसबुक च्या मैत्रिणी अस वाटत नाही नात्यातलेच असल्यासारखे वाटले. माझ्या मम्मी ला देखील एक छान मैत्रीण मिळाली.
Lockdown संपल्यावर मी नक्की एकदातरी भेटायला येईल ताई. आपल्या मैत्री बद्द्ल लिहायला थोडा उशीर झाला बरं. अजुन काही राहिल असेल माझ्याकडून तर तुम्ही पूर्ण करा😉 मी थोडक्यातच लिहिले आहे.
छान छान मैत्रिणी असणे अहो भाग्यच.

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...