Disney Sea जपान मध्ये असतांना लग्नानंतरचा माझा दुसरा वाढदिवस कसा साजरा करायचा असा काही विचार आम्ही करत होतो, मग काय कुठल्याही सेलिब्रेशनची सुरवात हि शॉपिंगनेच होते. चार ड्रेस मिळाले. त्यावर सर्व काही मॅचिंग ज्वेलरी, पर्स, सँडल. गिफ्ट साठी स्वतंत्र पैसे. केक आणूया आणि छान पैकी जेवायला जाऊया. नाही आपण कुठेतरी फिरायला जाऊया....! चल जशी तुझी इच्छा येयेयेयेयेऐऐऐऐ....... अरे पण तुला सुट्टी नाही..... एक दिवस सुट्टी घेतो चल..... बापरेरेरे!!!!!.... सच्चीईईई....? सच्ची सच्ची... नाही नाही तू बोल मुच्ची मुच्ची.... ओके हा मुच्ची मुच्ची.... पण जायचं कुठे? चल शोधूया? ये सत्त्या आपण अशा ठिकाणी जाऊया जे खूअअअप फेमस असेल आणि जपान मधील स्पेशल असेल. अग मग तर तुला Disney Land. Disney Sea ला जायला पाहिजे.... खरंच??? हममअ.... चल नेटवर बघू काय काय आहे तिथे...? नेट वर बघून घे खुश होशील. संपूर्ण Disney Land आणि Disney Sea चे फोटो पाहून माहिती काढली. तिकिटापासून येण्याजाण्याचा खर्च, वेळ, कुठून कसे जायचे सगळं सगळं नेट वर भ्रमंती झाली... आणि दोघे पण भयंकर खुश झालो कि आपल्याला योग्य तो वन डे...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....