
Disney Sea
जपान मध्ये असतांना लग्नानंतरचा माझा दुसरा वाढदिवस कसा साजरा करायचा असा काही विचार आम्ही करत होतो, मग काय कुठल्याही सेलिब्रेशनची सुरवात हि शॉपिंगनेच होते. चार ड्रेस मिळाले. त्यावर सर्व काही मॅचिंग ज्वेलरी, पर्स, सँडल. गिफ्ट साठी स्वतंत्र पैसे. केक आणूया आणि छान पैकी जेवायला जाऊया. नाही आपण कुठेतरी फिरायला जाऊया....! चल जशी तुझी इच्छा येयेयेयेयेऐऐऐऐ....... अरे पण तुला सुट्टी नाही..... एक दिवस सुट्टी घेतो चल..... बापरेरेरे!!!!!.... सच्चीईईई....? सच्ची सच्ची... नाही नाही तू बोल मुच्ची मुच्ची.... ओके हा मुच्ची मुच्ची.... पण जायचं कुठे? चल शोधूया? ये सत्त्या आपण अशा ठिकाणी जाऊया जे खूअअअप फेमस असेल आणि जपान मधील स्पेशल असेल. अग मग तर तुला Disney Land. Disney Sea ला जायला पाहिजे.... खरंच??? हममअ.... चल नेटवर बघू काय काय आहे तिथे...? नेट वर बघून घे खुश होशील. संपूर्ण Disney Land आणि Disney Sea चे फोटो पाहून माहिती काढली. तिकिटापासून येण्याजाण्याचा खर्च, वेळ, कुठून कसे जायचे सगळं सगळं नेट वर भ्रमंती झाली... आणि दोघे पण भयंकर खुश झालो कि आपल्याला योग्य तो वन डे पिकनिक स्पॉट मिळाला. वरील माहिती मध्ये हे देखील कळाले कि Disney Land Disney Sea एका दिवसात संपूर्ण फिरणे कदापि शक्य नाही, भयंकर मोठा असा एरिया, तुफान गर्दी, राईड्ससाठी मोठं मोठ्या रांगा.... तर, अगदी आरामात आणि सोईस्कर सगळं काही पाहण्यासाठी पुरेपूर आनंद घेऊन धमाल उडविणे आणि ट्रीपला झालेला खर्च वसूल करणे यासाठी जपानीज लोक हे संपूर्ण वर्षभराचा पास काढतात आणि वाटेल त्यादिवशी ते Disney Land, Disney Sea फिरून येतात दोन्ही ठिकाणे संपूर्ण पणे वेगवेगळे आहेत तिकीट, पास सुद्धा वेगळे आहे. आता प्रश्न Disney Land कि Disney Sea ला जायचं...? तर Disney Land हे लहान मुलांसाठी आहे तिथे कार्टून्स वगैरे लहान मुलांचे खेळ, गार्डन आणि सोप्या राईड्स आहेत आणि Disney Sea हे मोठ्या मुलांसाठी, लोकांसाठी आहे. Disney Sea च्या नावातच कळून येते ते ठिकाण समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे. आणि काही बोटी राईड्स समुद्रातुनच फिरवल्या जातात. मोठं मोठ्या राईड्स, थरारक गुफा, disney cartoon movies मधील गोष्टी ह्या नाटक स्वरुपात छोट्या stage वर करून दाखवतात हे तेथील वैशिष्ट्य आहे मग Disney Sea ला जायचे ठरले. आणि अवघ्या २,३ दिवसात सर्व काही प्लॅनिंग फिक्स करून वन डे ट्रिपसाठी तयार. ११ तारखेलाच केक सरप्राईज मैत्रिणीची फ्यामिली छोट्या श्रीया सोबत चं धमाल फोटोंची धमाल.... आणि सोबत सकाळच्या ट्रीपची उस्तुकता Disney Land आणि Disney Sea भारतात असतांना मी केवळ Disney Land बद्दलच ऐकून होते आणि काही कार्टून नेटवर्क द्वारे Disney चे Characters माहीत होते. जर Disney Land पाहायचे असेल तर ते केवळ विदेशातच शक्य आहे, तिथे सगळ्या प्रकारचे कार्टून्स पाहण्यास मिळते. ज्याप्रमाणे आपण टीव्ही वरती त्यांना पाहतॊ अगदी त्याच स्वरूपात स्वप्नातील दुनिया तिथे पाहण्यास मिळते. असोत आपला काय संबंध आपण आयुष्यात कधी कार्टून पाहिले नाही जे माहित आहेत ते बहीण भाऊ सतत बघत असतात त्यांच्यामुळे माहिती मिळाली. त्यातील मी अल्ल्लाउद्दिन आवडीने पाहायचे. तर थोडक्यात इथे विषय संपून जायचा... पण २०१७ चा वाढदिवस माझा असा काही माझ्यासाठी छान सरप्राईज गिफ्ट घेऊन आला. कि मलाही ह्या Disney Characters च्या स्वपांच्या दुनियेत हरवायला मिळाले. पहाटे सहाला सायकलवरून स्टेशन गाठलं, त्सुकुबा स्टेशन पासून ट्रेन पकडली, त्यानंतर ६० मिनी ट्रेन आणि अर्ध्या तासात Disney Sea ला पोहचलो. त्याच्या प्रवेशद्वारापासुनच आश्चर्य चकित करण्यासारखे दृश्य आणि कार्टून्स सुरु झाले एवढे भव्यदिव्य Disney Sea पाहून आनंद गगनात मावेनासा झाला. अगदी लहान मुलांप्रमाणे आम्ही बागडू लागलो. चॉकलेट, फुगे, ड्रेस, मुलांच्या खेळणी हे सगळच कार्टून्स च्या आकाराचे आपल्या जत्रेसारखे भासू लागले. त्यात पावसाची रिमझिम सुरु होती. मनाला सुखावणारा गारवा त्यात नवऱ्याची मजेशीर साथ खूप मजेत आनंदात बागडत दिवस सुरु झाला फोटो आणि व्हिडीओ चा धडाका सुरु झाला. प्रत्येक Disney Character सोबत फोटो काढले. पुढे मोठ मोठ्या उंच आणि भयंकर पद्धतीने ९०अंश ३६०अंश अशा फिरणाऱ्या राईड्स, भूतांची गुहा, त्याचप्रमाणे मोठ मोठे थीएटर आणि त्यांच्या मध्ये मरमेड शो, कार्टून शो, लाईटचे शो, गोष्टी, नाईट शो अस बरच काही ह्या स्वप्नगरीत वसवलेले आहे. त्याचप्रमाणे “सिंदबाद” ची गोष्ट सुद्धा एक स्वतंत्र विभागात वसवली आहे. वन डे ट्रीप चा सगळ्यात शेवट हा मोठ्या मोठ्या लाईट मध्ये कार्टून नाईट शो ने केला. आणि हे शो समुद्राच्या पाण्यावरील एका छोट्याशा बेटावर करण्यात येतात. समुद्र किनारी सर्वांची जागा पकडण्याची लगबग असते त्यासाठी खूप वेळ आधी येऊन बसावे लागते. पण पूर्ण दिवसात संपूर्ण Disney Land फिरता फिरता हे शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला मिळेल त्या जागेत आम्ही बसून कार्टून नाईट शो मोठ्या मुश्किलीने संपवला. हात पाय पाठ चालून चालून एवढे दमले होते कि आता तिथून घरी पोहण्याची शाश्वती राहिली नव्हती. अक्षरशा शरीरात त्राण उरले नाही असे वाटू लागले. मोठ्या मुश्किलीने घरापर्यंत आलो येता येता MacD ने मात्र साथ दिली, नाहीतर पोटात कावळ्यांची कावकाव आणि चालण्याची क्षमता संपलेली. तू तर उद्या आराम करशील ग, माझ काय? मला कामावर जायचं आहे.... हा.हा..हः...... चल मग अजून दोन दिवस फिरून घेऊ, नको नको नको बाबा आता बस घरी पोहचू फक्त केवळ एकच धेय्य..... अशा प्रकारे आयुष्यभर आठवणीत राहणारा माझा वाढदिवस साजरा झाला. पण पण पण ऐका अजून पुन्हा बऱ्याचदा Disney Land ला आणि Disney Sea ला जायचं अस पण ठरलं होत मग काय हे सगळ मी नवऱ्याला आठवण करून देण्यासाठी लिहिलंय. लिहण्यासाठी फार जास्त वेळ नव्हता त्यामुळे खूप सविस्तर नाही लिहू शकले. परंतु फोटो मधून सगळी मज्जा आणि संपूर्ण Disney Sea सर्वांना अनुभवता नक्कीच येईल........ पुढे कित्येक दिवस आम्ही ह्या ट्रीप च्या फोटोंमध्ये रमलेलो होतो. सतत आठवण आली कि Disney Sea च्या स्वप्नागरीत रमत बसणे हा आमचा जणू काही छदच झाला होता. आयुष्यातल्या ह्या छोट्या छोट्या क्षणांनीच तर आभाळ भरत आणि माझ हेच “क्षणांनी भरलेल आभाळ” नेहमी आनंदात सुखात राहो हीच सदिच्छा ....... #Missing_Hubby #Missing_Japan #Missing_Disney_Sea आणि न अनुभवलेलं #Disney_Land देखील. म्हणजे आता येणाऱ्या ट्रीप ह्या दोन्ही ठिकाणी नक्कीच करू. आता खास माझ्यासाठी नाही ओ.... आमच्या प्रत्यूषसाठी...... ब्लेस यू बाळ.... तुला सगळ्या प्रकारची मज्जा तुझ्या आयुष्यात अनुभवता यावी हीच सदिच्छा... आणि मम्माच्या वाढदिवसादिवशी तुला अनेक अनेक आशीर्वाद.... भाग्यवान हो बाळा....!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा