आईने मोठ्या प्रेमाने टोमॅटोचे रोपटे लावले , प्रत्युष ते बघून जाम खुश झाला . उड्या मारून मारून सगळ्यांना त्याने दाखवले .. काहीदिवसातच चार पाच टोमॅटो आले . बाळ टोमॅटो तोडू नको हं ... ते छान रेड रेड झाले कि मग तूच तोड हं बेटा , तुझ्याचसाठी आहे बाळ ते ... गुणी बाळाने गप्प बसून त्या टोमँटोंवरती संशोधन केले ... पण पुन्हा ते रंग बदले पर्यंत त्यांना अजिबात हात लावला नाही . फक्त रोज टोमॅटोंना बघून यायचा ते झाडावर असल्याची खात्री केली कि त्याला खूप आनंद व्हायचा .... आज शेवटी बाळाने त्याच्या हाताने टोमॅटो तोडले . बापरे आज तर त्याच्या आनंदाला पारावर उरलाच नाही ... ट्म्मा ट्म्मा म्हणत पळत सुटला . तेवढ्यात आईने हाक मारली चला मम्माडी आणि पिल्लुडी गरम गरम पराठे खा या चला पटकन नाष्टा करून घ्या ... घरात येऊन टोमॅटो धुवे पर्यंत ह्या पिल्लाला दम नाही . दे ... यऐ ... दे . ऐ .. देऐ .... मदे मदे ( मला दे ).... हातात टोमॅटो मिळताच गडी आपला त्यात मग्न .... मम्माडी : मम्मी टोमॅटो सॉस दे ग मला ... प...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....