भारतातून ह्या वेळी येतांना आठवणीने होळीचे रंग घेऊन आले , पिल्लूसाठी आपलं थोडस रंग खेळूया मग अचानक होळीच्या दिवशी सुचलं पाण्याचे फुगे मिळतात " डायसो हंड्रेड येन शॉप " मध्ये तुम्ही दोघे जा आणि ते घेऊन या , मी तोपर्यंत सगळं घर आवरते आणि तुम्हाला मस्त गाजराचा हलवा बनवून ठेवते . तयारी करता करता पाऊस आला मग काय ड्याडा एकटाच गेला आणि फुग्यांचा पंप फुगे घेऊन आला परंतु पंपाने काही पाणी भरता आले नाही मग संपूर्ण घर आवरून गाजराचा हलवा बनवून पाण्याचे फुगे बाथरूमच्या नळाने भरून ठेवले रंगांची ताटली भरून ठेवली आणि आता मी पटकन तयार होते म्हणताच पिल्लूला बाहेर फिरायला जायचं असं वाटलं आणि हट्ट सुरु झाला . बरं ठीक आहे तू आवरून ठेव आम्ही आलोच आणि अवघ्या पाच मिनिटांत पिल्लू झोपी गेलं . ड्याडा हसत हसत घरात आला मम्मा वैतागली .... मग म्हंटल चल आपण फोटो शूट करून घेऊ पिल्लू उठलं कि मग मस्त रंग खेळू . मग काय मस्त फोटोंची धमाल केली . होळीची गाणी ऐकता ऐकता मस्त पुन्हा केलेली तयारी बदलली .... प्यार के रंग से खेलो रे होली चढके ना ये रंग उतरेगा ...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....