प्रत्यूषची जापनीज शाळा...... सायंकाळचे ५.३० वाजले आहेत, २३ मार्च चा हा सुंदर सूर्यास्थ खिडकीतून क्यामेऱ्यामध्ये कैद करण्याचा आनंद घेत, आज मला मिळालेलं छोटस यश मी शब्दात टिपण्याचा प्रत्यन करीत आहे. नुकतीच चेरी ब्लॉसम सकुरा फुलण्याची सुरवात झाली आहे. त्यामुळे आज थोडफार वातावरणाच तापमान वाढलेलं आहे, एकंदरीत थंडी थोडी कमी होण्यास सुरवात झाली आहे. आपण केलीली धडपड, घेतलेली मेहनत यातून मिळणार जे काही यश पदरी पडत त्याला आपण स्वतः नेहमीच प्रोत्साहन द्यायला हवे. तरच नव्याने आयुष्यात मेहनत घेण्यास सक्षमता वाढते. प्रत्यूषला जापनीज शाळेत पाठवायचं माझ हे स्वप्न त्याच्या जन्मापासूनच होत. पुढे लॉकडाऊन मध्ये वर्षभर भारतातच अडकले असतांना देखील मी ह्याच गोष्टीचा विचार करीत असे. विदेशात पुन्हा येणे देखील अवघड झाले असता मी माझ स्वप्न मनी बाळगून होते. मी ऑनलाई बबऱ्याच शाळा शोधल्या परंतु माझे बरेच प्रयत्न अयशस्वी ठरले. मग जानेवरी २०२१ मध्ये मी जशी जपानला आले, अगदी त्याच आठवड्यापासून क्वारंनटाइन मध्ये असतांना जपानीज शाळा शोध मोहीम ...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....