#सुगंधित_गोंडा दसरा आणि दिवाळीला खास गोंड्याच्या फुलांचा मान असतो. नाही म्हणजे तस गोंड्याच्या फुलाला वर्षाचे बाराहि महिने तेव्हडाच मान असतो., नाही?!, मला गोंड्याची फुल अगदी मोगऱ्याच्या फुलांप्रमाणेच आवडतात. त्यांचा सुगंध त्यांच्या रंगांचे प्रकार आणि मुख्य म्हणजे जेव्हा ते आंब्याच्या पानांसोबत जोडले/ओवले जातात तेव्हा ते जे काही आकर्षक दिसतात आणि दोघांचा एकत्रित सुगंध म्हणजे आहा.!!! बऱ्याचशा सणांना पूजेला घरी नेहमी गोंड्याची फुले आवर्जून आणली जायची. बाजारात गोंड्याच्या फुलांचे ढीग आणि ते फुले विकण्यासाठीचा विक्रेत्यांचा आरडाओरडा, ग्राहकांची लगबग, घरी फुल आणल्या नंतर त्याची तोरण ओवायचे त्यासाठी लागणाऱ्या दोऱ्या पासून, जाडी सुई शोधून, आंब्याचे पानं तोडून आणायचे ते स्वच्छ धुवून पटापट दोन्ही चारी दारांसाठी तोरण, बाबासाहेबांच्या फोटोला हार, गाड्यांसाठी हार काही उरलेली किंवा जाणीवपूर्वक काही फुले उरवून ठेवायचे मम्मी आठवणीने ओरडून सांगते बाई काही सुट्टे फुल बाजूला काढून ठेव बुद्धांना वाहायला. आम्ही लहान असतांना ती स्वतःच हे सगळं करायची तीची ह...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....