मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जपानची निसर्ग श्रुष्टी....!

जपानची निसर्ग श्रुष्टी....!  त्यांची जीवनशैली       जपान या देशाला नैसर्गिक आपत्तींना फार मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. परंतु हेही तितकेच खरे आहे कि “निसर्ग कधीही अन्याय होऊ देत नाही.” कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना जपान तोंड देत असला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्याची किमया हि लाभलेली आहे. जणू काही नैसर्गिक सौंदर्याचे वरदानच जपान या देशाला मिळाले आहे. सौंदर्य सृष्टीने नटलेल्या या जपान देशाला आयुष्यात एकदातरी नक्कीच भेट द्यावी.           जपानला उगवत्या सूर्याचा देश असं संबोधल जात. पहाटे ४ च्या सुमारास अथवा त्याही अगोदर सूर्योदय होतो. खूप सुंदर रम्य अशी पहाट येथे अनुभवास येते. आशिया खंडाच्या पूर्वेकडचा देश म्हणजे जपान. भारत आणि जपान या दरम्यान ३.३० तासांचा फरक आहे. मला भारतातून कोणीही Phone करत तेव्हा “कशी आहेस” या प्रश्ना अगोदर “तिकडे किती वाजलेत..?” हा प्रश्न असतो..... हा..हा...हः.....         जपान मधील ऋतू हे ६ प्रकारांचे आहे. येथील लोक बदलत्य...
मैत्री...!                                 मैत्री हे नात जगात प्रत्तेकासाठीच खूपच जवळ असत. पण मनाच्या जवळ चे मित्र मैत्रिणी मिळण्यासाठी देखील भाग्य लागत. आणि यात देखील मी भाग्यवान ठरले. मैत्रीच सौख्य मला फारच छान लाभलेलं आहे. अगदी विदेशात येऊन देखील मला कधीच परकेपणाची जाणीव झाली नाही ती केवळ मला लाभलेल्या मैत्री मुळेच. इथे मला बऱ्याच देशातील विविध मैत्रिणी मिळाल्या. त्यातला त्यात Akiko-San या जपानीज फारच जिवलग आहे. आमची भेट एका Event मध्ये झाली. माझ्या जपान मधील पहिल्या मैत्रिण ह्या Nishikawa-San त्यांनी एक Event आयोजित केलेलं होत. “थानाबाता” हा एक जपानीज सण आहे. तो एका मुलीच्या प्रेम कहाणी वर आधारित ते साजरा करतात. ती संपूर्ण प्रेम कहाणी वाचून दाखविणे असा Event असतो. त्यादिवशी “Origami” म्हणजेच कागदापासून बनवलेल्या गोष्टी तसेच दागिने बनवून ते एका छोट्याशा झाडाच्या फांदीला लटकवतात आणि मनातील इच्छा व्यक्त करतात. Akiko-San ह्या Event च्या सूत्रसंचालक होत्या. Nishikawa-San ...

जपानीज सरकार...!

जपानीज सरकार...!           काही दिवसांपूर्वी जपान बद्दल एक बातमी सगळ्याच वृतपत्रांमध्ये तसेच Social Sites वर लेखाच्या रूपाने प्रसारित झालेली होती. “होकैदो” हे जपान मधील एक शहर आहे. तेथील “क्युशिराताकी” या गावात एक ट्रेन थांबत नव्हती. एका मुलीच्या वडिलांनी जपान सरकारला पत्र लिहून विनंती केली. तिच्या शाळेसाठी जपान सरकार ने या पत्रा विषयी तत्पर नोंद घेऊन त्या स्थानकावर ट्रेन थांबविण्याचा निर्णय घेतला. आणि बरीच वर्षे त्या मुलीच्या शिक्षणासाठी हि ट्रेन थांबण्यास परवानगी जपान सरकारने ने दिली. एका व्यक्तीच्या शिक्षणसाठी जे सरकार निर्णय घेऊ शकत अशा देशातील नागरिकही त्या देशासाठी काहीही करण्यास तत्पर असतात. नागरीकांमध्ये देशा बद्दल चा अभिमान वाढवण्याचे काम हे त्या-त्या देशाचे सरकारच करत असते.            तसाच अनुभव मला ह्या शुक्रवारी आला. आपणाला सर्वच गोष्टी माहित असतात, पण जेव्ह्या त्या स्व:नुभवल्या जातात तेव्हाच त्यावरचा विश्वास हा अटळ बनतो. मी रोजच्याच वेळेत “नौरीन गीगास्तु” या बस स्थानक...