मुख्य सामग्रीवर वगळा

जपानीज सरकार...!



जपानीज सरकार...!


         काही दिवसांपूर्वी जपान बद्दल एक बातमी सगळ्याच वृतपत्रांमध्ये तसेच Social Sites वर लेखाच्या रूपाने प्रसारित झालेली होती. “होकैदो” हे जपान मधील एक शहर आहे. तेथील “क्युशिराताकी” या गावात एक ट्रेन थांबत नव्हती. एका मुलीच्या वडिलांनी जपान सरकारला पत्र लिहून विनंती केली. तिच्या शाळेसाठी जपान सरकार ने या पत्रा विषयी तत्पर नोंद घेऊन त्या स्थानकावर ट्रेन थांबविण्याचा निर्णय घेतला. आणि बरीच वर्षे त्या मुलीच्या शिक्षणासाठी हि ट्रेन थांबण्यास परवानगी जपान सरकारने ने दिली. एका व्यक्तीच्या शिक्षणसाठी जे सरकार निर्णय घेऊ शकत अशा देशातील नागरिकही त्या देशासाठी काहीही करण्यास तत्पर असतात. नागरीकांमध्ये देशा बद्दल चा अभिमान वाढवण्याचे काम हे त्या-त्या देशाचे सरकारच करत असते. 

         तसाच अनुभव मला ह्या शुक्रवारी आला. आपणाला सर्वच गोष्टी माहित असतात, पण जेव्ह्या त्या स्व:नुभवल्या जातात तेव्हाच त्यावरचा विश्वास हा अटळ बनतो. मी रोजच्याच वेळेत “नौरीन गीगास्तु” या बस स्थानकावर पोहचले. तिथून कंपनी ची कॅब पिक-अप करत असते. पण आज तिथे कॅब नव्हती. मी पाच एक मिनिटांत कंपनी ला कळवल, तर त्यांनी विचारल तुला घरी जाण्यास किती वेळ लागेल? म्हंटल ४५ मिनिटे, तर अवघ्या १५ मिनिटांत कंपनीने Taxi ची व्यवस्था केली. कारण कंपनीची गाडी हि ठरलेल्या वेळेतच असते. केवळ माझ्या एकटीसाठी गाडी पाठवल्यामुळे मला जपानीज लोकांच्या कृतज्ञ ते बद्दल फारच कौतुक वाटल. आणि चटकन त्या “होकैदो” मधील मुलीची आठवण झाली. आणखी एक अप्रूप म्हणजे त्यांनी मला एकदाही उलट प्रश्न केला नाही, किंवा कामावर हजर होण्यास मनाई केली नाही. कारण “किनुगवाया Factory” हि “नौरीन गीगास्तु” या बस स्थानकापासून ४०,४५ मिनिटांवर आहे. आणि तेथे वाहतूक हि फक्त स्वतःच्या गाडीनेच नेच केली जाते. Taxi परवडत नाही.

         पण Factory मध्ये पोहचे पर्यंत माझ्या मनात टिकटिक चालू होती. जपानीज लोक खूप काळजी पूर्वक वागतात. आपल्यामुळे कुणाच नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन चालतात. आमचा वाहन चालक कधीही सर्वाना घेतल्या शिवाय तिथून निघत नाही. कुणी वेळेत पोहचल नाही तरी वाट बघतो. कंपनी ला कळवतो. मग रवाना होतो, मग आज अस कसं झाल असाव बरं...?

         ९.३० ला काम सुरु केले. अर्धा तास उशिरा. थोड्यावेळानंतर मैत्रीणीसोबत बोलताबोलता कळाले कि आजच्या ९ वाजताच्या लिस्ट मध्ये माझ नाव नव्हतच, ते ८ वाजताच्या लिस्ट मध्ये होत. अर्थात तो वाहन चालक वाट पाहून नीघुन गेला असावा. म्हणजेच आमच्या वाहन चालकाची काही चूक नव्हती. असोत, चूक कुणाचीही असो पण याला महत्व न देता, कामगाराचे नुकसान होऊ नये यावर जास्त भर कंपनीच्या लीडर ने दिला.

         म्हणूनच आज थोडी खंत वाटते, आपल्या देशातील सरकार किंवा नौकरीतील वरिष्ठ हे कामगारांबद्दल अति दक्ष केव्हा होतील...? जपान मध्ये राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहे. अशा प्रकारचे बदल आपल्या देशात घडावे, यासाठी स्वतःला सक्षम कार्यरत बनवण्याचे प्रयत्न करण्याची उम्मेद वाढते आहे....!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...