जपानची निसर्ग श्रुष्टी....!
त्यांची जीवनशैली
जपान या
देशाला नैसर्गिक आपत्तींना फार मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. परंतु हेही
तितकेच खरे आहे कि “निसर्ग कधीही अन्याय होऊ देत नाही.” कारण जेवढ्या मोठ्या
प्रमाणात नैसर्गिक आपत्तींना जपान तोंड देत असला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात
नैसर्गिक सौंदर्याची किमया हि लाभलेली आहे. जणू काही नैसर्गिक सौंदर्याचे वरदानच
जपान या देशाला मिळाले आहे. सौंदर्य सृष्टीने नटलेल्या या जपान देशाला आयुष्यात
एकदातरी नक्कीच भेट द्यावी.
जपानला उगवत्या सूर्याचा देश असं
संबोधल जात. पहाटे ४ च्या सुमारास अथवा त्याही अगोदर सूर्योदय होतो. खूप सुंदर
रम्य अशी पहाट येथे अनुभवास येते. आशिया खंडाच्या पूर्वेकडचा देश म्हणजे जपान.
भारत आणि जपान या दरम्यान ३.३० तासांचा फरक आहे. मला भारतातून कोणीही Phone करत
तेव्हा “कशी आहेस” या प्रश्ना अगोदर “तिकडे किती वाजलेत..?” हा प्रश्न असतो..... हा..हा...हः.....
जपान मधील ऋतू हे ६
प्रकारांचे आहे. येथील लोक बदलत्या हवामालानाला सणां प्रमाणे साजरे
करतात. त्याचप्रमाणे त्या प्रत्तेक बदलत्या ऋतू साठी Special Dish ही असते. अर्थात
प्रत्तेक ऋतू मध्ये शरीरासाठी जे योग्य आणि पचन होण्यास सोईस्कर असेल ते उपलब्ध
असत. पण येथील बदलत्या वातावरणामुळे शारीरिक अथवा मानसिक बदल हा मोठ्या प्रमाणात
जाणवतो जसे कि फार डोक दुखणे, हात पाय दुखणे, सतत चक्कर येणे, झोपाळलेले वातावरण तसेच
मानसिक ताण-तणाव वाढणे, Mood Off असणे. यासर्व कारणांमुळे जपानीज लोकांमध्ये
नैराश्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात जाणवते. हो पण हे ते त्यांच्या वागण्यात
दिसू देत नाही, चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. काय त्रास होतोय हेही ते कधी दाखवत नाही.. त्यांना
सहानुभूती मिळवणे म्हणजे कमीपणा वाटतो. इथे रहाण सोप्प नाही. भल्याभल्या माणसांची मानसिक
परिस्थिती बदलते. जगात सर्वात जास्त आत्महत्या करणाऱ्या देशांपैकी जपान हा एक देश आहे.
टोकियो ला काही Reastaurants मध्ये स्वतंत्र अशा खोल्या असतात. ज्यात खूप रडून
घ्यायचं आणि आहे तेवढ Frustation, Emotions तिथे काढायचं. त्या खोल्यांमध्ये अस
काही संगीत आणि सजावट असते, सुंदर असे Napkkins ठेवलेले असतात कि त्यामुळे व्यक्ती रडून आपले दुखः मोकळे करतो..
हि एक गोष्ट मी इकडची टिपली. त्याचप्रमाणे आयुष्याला खूप कंटाळलेले, किंवा ज्यांचे
कुणी नाही असे लोक एक “Aokigahara Suicide Forest” नावाचे ठिकाण आहे, तिथे आपली Car
park करून घनदाट जंगलात जाऊन आत्महत्या करतात. यावरून हे कळते कि Japanese लोक किती
तणावाखाली असतात. पण निसर्गाने या तणावात लोक अडकून राहू नये यासाठी बहुमुल्य
किमया केली आहे.
माझे आगमन जपान मध्ये
१३ मे २०१६ साली झाले. तेव्हा उन्हाळा ऋतू सुरु होण्याचा काळ होता. थोड थंड
वातावरण होत. तेव्हा संपूर्ण ठिकाणी गुलाबी रंगाची फुले उमललेली होती. रस्त्याच्या
दुतर्फा झाडांचे Bed प्रमाणे कात्रण केलेले आणि तीच झाडे पूर्ण गुलाबी झालेली खूपच
सुंदर दृश्य तेव्हा होते.
मार्च ते मे मधील ऋतू ला
Spring (वसंत) ऋतू असे म्हणतात. Cherry Blossom’s दोन आठवड्यासाठी असते, एक म्हणजे
Blooming साठी आणि एक म्हणजे Falling साठी हा सर्वात महत्वाचा आणि सर्वांना आवडणार
ऋतू असतो. Cherry Blossom ची झाड हि छोट्या पासून मोठी असतात फार जुने असेहि झाडे
आहेत जे वर्षानु वर्षे फुलतात. याला Sakura असे संबोधले जाते. जपानीज लोकांसाठी
Sakura हे व्यक्तीचे आयुष्य, क्षणभंगुरता आणि उद्दातपणा चे प्रतिक आहे. हे जे दोन
आठवडे आहेत ते मोठ्या सणाप्रमाणे साजरे करतात. बऱ्याचश्या लोकांना त्या झाडांखाली
बसून जेवण करायला आवडते याला ते “Hanami” असे म्हणतात. Sakura पासून इथे Food, Drinks,
Sake(Japanese Wine) असे भरपूर वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्याला Sakura Theme असे
नाव दिले जाते. हा Sakura बघण्यासाठी संपूर्ण जपान आतुर असतो. ह्या फुलांचे रंग हे
सफेद आणि गुलाबी त्यातही दोन तीन प्रकारे Shades असतात. ह्या ऋतू मध्ये परीधानाचे वस्त्र
हे Kimono ह्या नावाने ओळखतात. ज्या प्रमाणे आपले सांस्कृतिक वस्त्र हे साडी आहे त्याप्रमाणेच
Kimono असतो. मला Sakura च एक गाण खूप आवडत. त्याची लिंक मी इथे share करत आहे. https://www.youtube.com/watch?v=EUzLfw9X6gc&t=1s माझी जापानीज मैत्रीण आणि मी एका जवळच्या ठिकाणी
साकुरा बघण्यासाठी फिरून आलेलो. तिने Special वेळ काढून मला ह्या ठिकाणी नेले. कारण
तेथे Transport सुविधा नाही स्वतःची Car असेल तरच ते ठिकाण योग्य आहे. आमच्या
दोघींची आवडती आठवण.....
जुन ते ऑगस्ट उन्हाळा
असतो. जास्तीत जास्त तापमान हे ३६ ते ३८ पर्यंत असते. उन्हाळा हा सणांचा ऋतू आहे. यात
सामुहिक जापनीज नृत्य केले जाते, Drum वाजविले जाते, Mountain Hikes (पर्वत चढाई)
केली जाते. Cold Noodels म्हणजेच “Somen Noodles” हि Dish असते, Kakigori म्हणजे
बर्फाचा गोळा, Beer आणि Sake(जापनीज दारू) ह्या ऋतू मध्ये नानाप्रकारचे पेय्य फारच
प्रसिद्ध आहेत. कारण भंयंकर उन्हामुळे Dehydration खूप होते. शरीरातील
उर्जा उन्हाने शोषली जाते. पण त्यासाठी रस्त्यावर, Stations वर, जागोजागी Vending
Machines बसवलेले आहेत. त्यात Season नुसार पेय्य असते (Energy Drinks). एक “Matsuri
Festival” असतो. त्यात वेगवेगळे वाद्य, कंदील, खाद्य पदार्थांचे Stalls असतात, त्यांचा
पारंपारिक पोशाख “Yukata” घालून रस्त्यांवरती नृत्य आणि Parade करतात. Yukata हा
Cotton च्या कपड्यापासून बनवलेला पोशाख आहे. त्यामुळे specially तो उन्हाळ्यात घालतात.
ऑगस्ट मध्यंतरी संपूर्ण जपानला एक सुट्टी असते, त्यादिवशी “Dance the Bon-Odori” हा
एक सण आहे. तो सांस्कृतिक नृत्य करून साजरा केला जातो. आपल्या कडे जसे पित्र पाट
असतात तसेच यांच्या कडे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हा सण असतो. जपान
या देशात अंधश्रद्धा देखील आहे. आपण आपल्याच देशाला नेहमी नाव ठेवत असतो, परंतु विदेशांमध्येही
हा प्रकार आढळतो. यात “Grave Yard” च्या इथे जाऊन मेणबत्या लावतात. एक प्रकारच मोठ्या
आवाजात गायन केले जाते. नंतर जापनीज पंखा घेऊन हातांचे विविध प्रकारचे नृत्य केले
जाते.
ह्या महिन्यांत Tulip, Poppy/Linaria, Japanese Rose हि फुले मोठ्या प्रमाणात
बघायला मिळतात. येथे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे Gardens बनवलेले आहेत. जिथे कलम
करून फुले लावली जातात. आणि त्यांना बघण्याचा Time period हा ठराविक सहा ते सात
दिवसांचाच असतो. कळीचे रोप लाऊन ती उमलून गळे पर्यंत म्हणजेच peak time हा अवघे
तीन ते चार दिवसांचाच असतो. त्याची Internet वर Updates असतात. त्यामुळे ते Check
करूनच Visit द्यावी लागते. आम्ही दोघांनी केलेले Tulip च्या Garden मधील Photos
Shoot या लिंक वर आपल्याला पाहायला मिळतील.
नंतर येतो तो पावसाळा. पावसाळ्याचा
ठराविक असा महिना किंवा Time नसतो, इथे Weather Fluctuate असल्यामुळे सकाळ, दुपार,
संध्याकाळ, आणि रात्री काय Weather असेल काही सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला
पुस्तकी शिक्षणातही होत भारतापेक्षा दुसर कोणत्याच देशात हवामान हे चांगल नाही. परंतु
आता भारतातही बेभरवसे पाऊस असतो. हो पण जपान येथील हवामान खाते अगदी Accurate
असल्यामुळे Weather, Temprature Map बघून आपण बाहेर पडू शकतो. त्यातच काही दिवसांत
Typhoon (वादळ) हि येत असते. मी इथे दोन वर्षा पासून असल्यामुळे दोन्ही वेळेस बघीतलय
कि वादळ हे पावसाळ्यात मध्ये-मध्ये अवघ्या काही दिवसांसाठीच अथवा काही वेळेपुरतच
असते. पण त्याची तीव्रता हि फार मोठ्या प्रमाणात भयंकर असल्यामुळे नैसर्गिक हानी, मानव
हानी, हि अति प्रमाणात होते. पण जपान हे आधुनिक तंत्रज्ञानात प्रगत किंवा Digital Country
असल्यामुळे ती हानी तत्काळ भरून काढण्यास जापनीज तत्पर असतात. हो पण कितीही
Digital झाल तरी मानव हानी हि कोणीच भरून काढू शकत नाही.
Autumn म्हणजेच थंडीची सुरवात आणि झाडांच्या पानांचा
रंग बदलने, Autumn leaves येथे खूप प्रसिद्ध आहेत. खूप वर्षानुवर्षांची
जुनी झाडे येथे पाहण्यास भेटतात. ज्याप्रमाणे Cherry ची झाडे असतात त्याचप्रमाणे
Autumn मध्ये पानांचा रंग बदलणारी Momiji (Maple tree) आणि Echo (Ginkgo) हि दोन
मुख्य झाडे आहेत. ही झाडे खुप उंच असतात सरळ लाकूड असते, आणि काही संपूर्ण पानांनी
भरलेली झुपकेदार झाड असतात. Maple झाडाचे वैशिष्ट असे कि याची पाने लाल आणि पिवळी
असतात. त्यांचा रंग बदलण्याचा कालावधी फारच कमी काळाचा असतो. पण सौंदर्य हे
अप्रतिम असते. सकाळच्या पहारी पिवळे तांबूस सूर्य किरणे त्या झाडांवर पडून कल्पनेतली
सोनेरी पहाट जशी असते, तशीच इथे चक्क सत्यात उतरलेली पाहायला मिळते. लाल-पिवळी
पाने जशी झाडावर खुलून दिसतात. तशीच ते पानगळ होतांना हि दिसतात. जबरदस्त शांततेत पानांचा
खळखळाट हा अंगावर शहारे आणतो. आम्ही राहत असलेल्या ठिकाणी थंडी हि फारच कडाक्याची
असते, -5 to -7 oC पर्यंत Temprature होते. तसे संपूर्ण जपान मध्ये -20
oC पेक्षाही कमी Temprature असते. बाहेर जातांना Thermal वरती Double
कपडे, Jacket, Cap, Gloves, Mask अस स्वतःला Pack करूनच बाहेर जावे लागते. थंडीच्या
सुरवातीपासुंच्या तर बर्फ पडेपर्यंतच्या Temperature साठी कमी-जास्त उबदार कपडे
मिळतात.
मला हा रोचक असा नजारा घरात बसून
पाहायला मिळाला. ५२ वर्षानंतर Tsukuba मध्ये नोव्हेंबर या महिन्यात बर्फ पडल्याची वार्ता कानी आली. माझ्या सर्वच Japanese मैत्रिणी मला आवर्जून सांगू लागल्या
You are so
lucky that you can see Snow fall, this is happpening after 52 years in a month
of november. Snow fall Weekdays मध्ये होत असल्यामुळे Ski ला जाण्यासाठी जमल नाही
परंतू घराच्या मागे-पुढेच इतक छान Ski Resort झालेलं कि त्याची कमी वाटलीच नाही. खास
Photos काढण्यासाठी आमच्या ह्यांना Lunch time लवकर घ्यायला सांगितला. आणि पटकन
Photos काढून आलो. दोन ते तीन दिवस छान Snow ची मज्जा घेतली. आयुष्यातील
अविस्मरणीय क्षण टिपून घेतले. त्याचप्रमाणे २०१७ लाही खूप छान आणि मोठ्या प्रमाणत
हिमृष्टी झाली. पण मी India मध्ये होते. नवर्याने मला Video Call करून-करून चिडवल,
स्वतःचे photos काढून पाठवून जाशील परत..? मला सोडून India ला....? हाहाहः...!
Snow हा महिनाभरासाठी
जरी असला तरी, Ski resort हे ३ महिन्यासाठी खुले असतात. बर्फात Fur चे Jackets वापरावे लागतात, ज्याला बाहेरून Raincoat च्या कपड्याप्रमाणे
कपडा वापरलेला असतो.
प्रत्तेक Season साठी
वेगवेगळे Spots/places इथे बनवलेले आहेत. Japanese लोकांनी नैसर्गिक
सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खूप मोठमोठ्या उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत. Digital
ह्या नावाचा खरा अर्थ Japanese लोकांकडूनच शिकायला भेटतो.
राजश्री जगताप



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा