मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
होली है.....! बुरा न मानो होली है.....         होली रंगो का त्योहार है लाल, पिले, नीले, हरे, गुलाबी.... होली है भाई होली.....! बुरा न मानो होली है.....!        लहानपणापासून नाशिक मध्ये जी होळी पाहत आलो ती म्हणजे होळीच्या दिवशी सुकलेले लाकूड, घास, गौऱ्या उभे करून नारळ हार-फुले, होळी भोवती रांगोळी. होळी पेटवल्या नंतर तिला पुरण पोळी-नारळाचा नैवद्य दाखवून पाणी घालणे. “होळी रे होळी पुरणाची पोळी, बाम्हण मेला संध्याकाळी त्याचा दिवस मंगळवारी” अस काहीतरी बोलून बोंबा मारायच्या... याचा अर्थ फारसा काही माहित नव्हता पण मोठ्यांच अनुकरण.. होळीतली खरपूस पोळी आणि खोबर खाण्याची मज्जा हि काही औरच. दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे “धुळवड” रात्री पेटलेल्या होळीत दुसऱ्या दिवसापर्यंत थोडा-थोडा आहार असतो.   होळीच्या राखेत पाणी ओतून त्यातच येणाऱ्या जाणाऱ्याला लोळवून काढायच आणि रंगपंचमी हि पाच दिवसानंतर. पण, मुंबई मध्ये आल्यानंतर एक वेगळी होळी पाहायला आणि खेळायला मिळाली ती म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी केली जाते. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये होळ...

मुंबई ते टोकियो.....!

मुंबई ते टोकियो.....! भाग १.....   मुंबईची पोरगी विमानी बसली , पिरतीच्या देशाला आली आली. पंखावरी प्रीतीच्या ह्या येईल मी फिरुनी , हाय आस्मानी रंगाला गेले मी भुलूनी. ( १०मार्च२०१८)            मला घरी जायच आहे. घरी जायच आहे?... आत्ताच तर मे मध्ये आलो आपण आणि आता ऑक्टोबर पुन्हा काय आहे घरी?, कशाला जायच? इथेच राहायचं आता. मी नाहीईई..., मला जायच म्हणजे जायच...! बस नो एनी आर्गुमेन्ट.. हो पण कशाला? मला Friquent Flyer व्ह्यायचं आहे.. तुला काय व्हायचय?, इंग्लिश समजत नहि व्हय मराठीत सांगू?, मला “नियमित विमान प्रवासी” व्हायचं आहे. हा.हा..हा.... त्यासाठी तू छान अशी उद्योजिका हो.. तुला आठवड्यातून जायला भेटेल. आणि मुख्य म्हणजे परवानगी सुद्धा घ्यावी लागणार नाही. मी काय तुझी परवानगी घेत नाहीये, तुला सांगतेय माझ तिकीट काढून दे मला घरी जायच आहे. आणि फक्त जाण्याचच काढ येण्याच रिटर्न नको., का? कारण.... यायचं कधी, कि यायचं नाही ते मी ठरवेल. ठीक आहे बघूया.. हम्म्म,,,, स्वतःच्या मताने विचार करणारा माणूस असतो ना तो चटकन निर्णय घ...