#अमेरिकन_डायमंड_ची_ओळख.... आज मी पुन्हा एक नवीन रील आणि युट्युब शॉर्ट व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोन सुंदर अमेरिकन इमिटेशन डायमंड नेकलेस सेट – तेही कनकवर्णी (सोनेरी वर्ण) सोन्यासारखी झळाळी असलेल्या सोनसळी साडी सोबत सौंदर्य आणि शैलीचा परिपूर्ण संगम असे दागिने आणि साडी परिधान केले आहे. साडी बद्दल खास सांगायचं झालं तर हि साडी मम्मीने आणि मी नाशिकमधूनच काकांच्या मुलीच्या हळदीसाठी विशेष घेतली होती. माझ्या बऱ्याच मैत्रिणी नेहमी विचारत असतात तू साड्या कुठून घेते तर, मी सद्य परीस्थित जिथे असते तेथील बाजारातूनच शोधून शोधून मनाला बघितल्या क्षणी हा हि साडी भारी आहे!, हि मस्तए ना मम्मी? असं जेव्हा वाटेल तेव्हा तीच साडी पटकन उचलून अंगावर टाकून बघते.. हा...! हि आवडली!... बस अशी साड्यांची खरेदी असते. आता बघूया तारा ज्वेलरी मधील दागिन्यांची विशेषतः.....सौंदर्य, देखणेपणा आणि आकर्षकतेचा मिलाफ म्हणजे आमचा इमिटेशन अमेरिकन डायमंड नेकलेस सेट. लग्नकार्य, समारंभ, पार्टी किंवा खास प्रसंगी तुम्हाला हवा असतो असा दागिना जो तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो – आणि तोही किफा...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....