मैत्रिणींनो कशा आहात?...
माझे “क्षणांनी भरलेले आभाळ" यात खूप दिवसातून आज काहीतरी लिहावं असं वाटलं म्हणून मी थांबवलेलं लिखाण आज सुरु केले. यामागे खरतर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा अट्टहास आहे. ज्या खरोखर आवर्जून माझे लेख वाचत असतात. खास त्यांच्यासाठी मी पुन्हा लिखाण सुरु केले. आणि मुख्य म्हणजे माझा सर्वात पहिला लेख जो माझ्या फेसबुक, ब्लॉग आणि सोशल मीडियावरील अनेक महिलांच्या गटांमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता. तो म्हणजे "लग्नातील शालू"👇
https://www.facebook.com/share/1B2jhAN5LE/?mibextid=wwXIfr
आवर्जून सांगावस वाटत कि ह्या वेळेस साडी सोबत माझ्या तारा ज्वेलरी मधील दागिन्यांबद्दल सुद्धा मी लिहिणार आहे. आशा आहे तुमचा प्रतिसाद मला तसाच मिळेल जसा माझ्या पहिल्या साडीच्या लेखाच्या वेळेस मिळाला होता.
चला तर मग बघूया माझी साडी आणि दागिन्यांची सांगड लिखाणाने कशी उत्कृष्ट शोभून दिसते ते....
तारा ज्वेलरी मध्ये ह्या वेळेस उत्कृष्ट असे महाराष्ट्रीयन दागिन्यांचं संग्रह आलेला आहे. त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठ. ह्या फेसबुक पेजला आत्ताच फॉल्लो करा.👇
https://www.facebook.com/share/1CJapzXqt3/?mibextid=wwXIfr
मी आजच्या पोस्ट मधील फोटोज मध्ये दोन दागिने परिधान केलेले आहे. एक म्हणजे गळ्याभोवती सुंदर अशी धातूची चिंचपेटी आणि दोन म्हणजे लांब शाही हार.
चिंचपेटी बद्दल सांगायचं झालं तर हि आधी केवळ मोत्यांमध्ये बनत होती. कालांतराने ती धातू मध्ये बनवली जाऊ लागली. आणि तिच्या रुपरेखे मध्ये म्हणजेच डिझाइन्स मध्ये देखील सुंदर असे थोडेफार नवनवीन बदल करून त्यात काही अंशी हिरे माणिकाची फुले आणि लटकन यांची जोड देऊन तिला अजून वेगवेगळे आकर्षक असे रूप देण्यात आले.
शाही हार- आता यात देखील अनेक प्रकार आहेत. पण सर्वात सुंदर नाजूक मोहक आणि मुख्य मध्ये सालस प्रकार हा सोनसाखळ्यांचे अनेक जसे दोन, तीन, चार, पाच पदर आणि त्यावर काही अंतरावर मध्ये मध्ये नाजूक बकुळीची फुले किंवा त्यासारखी नाजूक गोड फुले रचलेली आहेत. हे हार अगदी सोन्याच्या धातू सारखेच लक्ख दिसतात. त्यामुळे ते अनेक स्त्रियांना फार आवडतात. खरतर मलाही खूप आवडतात. आणि त्याच मुळे मी ह्या दोन्ही दोगीन्यांचं सादरीकारण एकत्र केलं तर किती सुंदर वाटेल ह्या विचाराने माझ्या मम्मीची एक सर्वात जुनी साडी जी मी नोकरी करीत असतांना म्हणजेच २०१० मध्ये तिला तिच्या वाढदिवसाला भेट म्हणून दादर, मुंबई येथून आणली होती आणि ती साडी तिलाही प्रचंड आवडते. तिचा रंग पोत अजूनही फार सुंदर आणि आकर्षक आहे. ती केवळ १२०० रुपयाची होती पण, तिच्या किमतीपेक्षा जास्त आनंद तिने आम्हा माय लेकींना दिला. आम्ही त्यासाडीला पाहून खूप खुश होतो. हा रंगही आम्हा दोघींचा फार आवडता रंग आहे. त्याचप्रमाणे मी हि साडी माझ्या लग्नाच्या सवाष्णीच्या भोजनाच्या कार्यक्रमाला परिधान केली होती. त्यांनतर, खूप वर्षाने आज केली. तेव्हाचे दोन फोटो आठवण म्हणून तुमच्यासठी इथे जोडते. ह्या फोटोमध्ये आम्हा दोघी बहिणींना रडू आलं होत. आणि एक माझा फोटो.
मग कसा वाटला माझा हा "तारा ज्वेलरी" मधील दागिन्यांचा आणि आवडीच्या साडीचा "सोबर दृष्टिक्षेप"?... हा हा हा... माझा लुक होओ....
नक्कीच आवडेल!…
मैत्रिणींनो माझ्या रोज येणाऱ्या नवनवीन दागिन्यांचे व्हिडीओ आणि फोटोज पाहण्यासाठी माझे फेसबुक पेज, इन्स्टाग्राम पेज, आणि युट्युब चॅनेल फॉलो आणि सबस्क्राईब करा लाईक कमेंट करत रहा. मी इथे माझ्या आवडीच्या गाण्यांवरती सुंदर सुंदर व्हिडीओज बनवण्याचा प्रयत्न करीत असते. वरील चॅनेल्स बघत रहा आणि क्षणांनी भरलेले आभाळ वाचत रहा. माझा व्हाट्सअप ग्रुप देखील आहे तो पण तुम्ही जोडून घेऊ शकता. म्हणजे आपल्या आवडीनिवडी एकमेकींना समजतील. त्याचप्रमाणे काही दागिने आपल्याला आवडल्यास खरेदी देखील करू शकता.
Youtub 👇
https://youtube.com/@taarajewellery438?si=4VCguStQTO666WCW
Instagram👇
https://instagram.com/taara_the_jewellery_place?utm_medium=copy_link
Facebook page 👇
https://www.facebook.com/Taara-The-Jewellery-Place-103145992250707/
WhatsApp 👇
https://chat.whatsapp.com/EFDjxNtXYBL7dfP0Aa0hRW?mode=ac_t
Taara The Jewellery Place
Rashri Jagtap-Shinde
Rajashri Jagtap
Taara Jewellery
झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले..... २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा