#अमेरिकन_डायमंड_ची_ओळख....
आज मी पुन्हा एक नवीन रील आणि युट्युब शॉर्ट व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये दोन सुंदर अमेरिकन इमिटेशन डायमंड नेकलेस सेट – तेही कनकवर्णी (सोनेरी वर्ण) सोन्यासारखी झळाळी असलेल्या सोनसळी साडी सोबत सौंदर्य आणि शैलीचा परिपूर्ण संगम असे दागिने आणि साडी परिधान केले आहे.
साडी बद्दल खास सांगायचं झालं तर हि साडी मम्मीने आणि मी नाशिकमधूनच काकांच्या मुलीच्या हळदीसाठी विशेष घेतली होती. माझ्या बऱ्याच मैत्रिणी नेहमी विचारत असतात तू साड्या कुठून घेते तर, मी सद्य परीस्थित जिथे असते तेथील बाजारातूनच शोधून शोधून मनाला बघितल्या क्षणी हा हि साडी भारी आहे!, हि मस्तए ना मम्मी? असं जेव्हा वाटेल तेव्हा तीच साडी पटकन उचलून अंगावर टाकून बघते.. हा...! हि आवडली!... बस अशी साड्यांची खरेदी असते.
आता बघूया तारा ज्वेलरी मधील दागिन्यांची विशेषतः.....सौंदर्य, देखणेपणा आणि आकर्षकतेचा मिलाफ म्हणजे आमचा इमिटेशन अमेरिकन डायमंड नेकलेस सेट. लग्नकार्य, समारंभ, पार्टी किंवा खास प्रसंगी तुम्हाला हवा असतो असा दागिना जो तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो – आणि तोही किफायतशीर दरात!
🔹 अमेरिकन डायमंड म्हणजे काय?
अमेरिकन डायमंड हा खरा हिरा नसतो, परंतु तो दिसायला आणि चमकायला हिर्यासारखाच असतो. याला Cubic Zirconia (क्युबिक झिरकोनिया) थोडक्यात CZ, जो एक कृत्रिम रत्न आहे. त्याची पारदर्शकता, झळाळी आणि टिकाऊपणा यामुळे तो हिऱ्याचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
• वजनाने हलका, पण दिसायला रॉयल
• कमी किमतीत शानदार लुक
• फॅशन आणि स्टाईलप्रेमींना आवडणारा पर्याय
🔹 आमचे इमिटेशन अमेरिकन डायमंड नेकलेस सेटचे वैशिष्ट्ये
• उच्च दर्जाचे फिनिशिंग
• स्किन-फ्रेंडली मटेरियल
• पारंपरिक व मॉडर्न डिझाईनचा सुंदर संगम
• प्रत्येक पोशाखासोबत जुळणारे विविध प्रकार
🔹 का निवडाल आमचा नेकलेस सेट?
जर तुम्ही अशा दागिन्यांचा शोध घेत असाल जो हिऱ्याचा लुक देईल पण खिशाला परवडेल, तर आमचा अमेरिकन डायमंड इमिटेशन सेट तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तो फक्त दागिना नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवणारा एक खास अॅक्सेसरी आहे.
🔹 उत्पादनाचे वर्णन
आमचा अमेरिकन डायमंड इमिटेशन नेकलेस सेट दोन सुंदर प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – एक पारंपरिक महाराष्ट्रीय लुकसाठी आणि दुसरा मॉडर्न लुकसाठी. प्रत्येक सेटमध्ये डिझायनर नेकलेस आणि मॅचिंग इअरिंग्सचा समावेश आहे. उच्च दर्जाचे क्युबिक झिरकोनिया स्टोन्स वापरलेले असून त्याची चमक आणि झळाळी खऱ्या हिऱ्यांप्रमाणे दिसते.
🔹 दागिन्यांची काळजी कशी घ्यावी
आपला इमिटेशन दागिना दीर्घकाळ चमकदार आणि टिकाऊ ठेवण्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा:
1. पाणी, परफ्यूम, क्रीम यापासून दूर ठेवा.
2. वापरल्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करून एअरटाइट डबीत ठेवा.
3. गरम वातावरण आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
4. दागिना खेळताना, अंघोळ करताना किंवा झोपताना काढा.
🔹 ऑर्डर कशी कराल?
🔺 सध्या आमचे ह्या पोस्ट मधील हे तिनही सेट सोल्ड आउट झाले आहेत, परंतु लवकरच नवीन स्टॉक येत आहे.
ग्राहकांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे आम्ही हे सेट लवकरच पुन्हा उपलब्ध करणार आहोत.
🟢 नवीन स्टॉकसाठी pre-booking चालू आहे
व्हिडीओ साठी ह्या लिंक पाहणे...
झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले..... २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा