मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू…..!

ऐ वतन , वतन मेरे , आबाद रहे तू   मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू …..!   तू ही मेरी मंजिल , पहचान तुझी से                                                       पहुंचू मैं जहां भी                                                    मेरी बुनियाद रहे तू   ऐ वतन , वतन मेरे , आबाद रहे तू …!                    देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक नागरिकावर अवलंबून असते. त्याचा सर्वात मोठा भाग हे त्या-त्या देशातील सैनिक, सीमेवरील जवान, आर्मी, नेव्ही, खेळाडू, वैज्ञानिक, राजकारणी, सिनेतारका, शेतकरी तसेच ...
तिचे अस्तित्व.....!            आपल्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यास आपण त्या आपल्या मुलांच्या आयुष्यात पूर्ण करायची स्वप्न रंगवू लागतो. योग्य तेवढे चांगले शिक्षण, आर्थिक दर्जा उंचावणे, आपल्याला जे स्वतंत्र मिळालेलं नाही ते मुलांना मिळावे अशा अनेक प्रकारच्या इच्छा असतात. ज्या मनुष्य काही कारणास्तव पूर्ण करू शकत नसतो. परंतु एक योग्य वेळ त्याच्या ह्या सर्व इच्छा त्याच्या मुलांच्या आयुष्यातून नक्कीच पूर्ण करते. असंच काहीसा माझ्या मम्मीचा दृष्टीकोन तिच्या आयुष्याकडे बघण्याचा होता, तो तिने साफल्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिने जे सुख उपभोगले नाही ते सुख तिच्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला. अगदी तिच्या बालपणापासून ते आजच्या दिवसापर्यंत.         घरात थोरली असल्यामुळे भाऊ बहीण यांच्या इच्छांना जास्त प्राधान्य मिळत असे, पण त्यात ती नेहमीच खुश असे. मोठ्या बहिणीची जबाबदारी ती जोमाने पार पाडत असे. भावंडांचा सांभाळ करण्यापासून ते शिकवण्या घेईपर्यंत त्यांची सगळीच जबाबदारी तिला पार पाडता येत होती. आई वडील रानात दिवसभ...

पुरणपोळ्यांचा घाट.....!

पुरणपोळ्यांचा घाट.....!                    मला माझ्या स्वतःवर भारीच आत्मविश्वास अगदी लहानपणापासून धडाडीची कार्यकर्ता म्हंटल तरी चालेल. मी कोणतही काम हाती घेतांना फारसा त्याच्या परिणामांचा विचार करत नाही . माझ्या मते आपल्यात धमक असावी जे काम हाती घेतलय ते उत्तम प्रतीने पार पाडता यावे. त्यासाठी लागेल त्या पद्धतीने झगडता आल पाहिजे. प्रत्तेक गोष्ट कृतीत केल्याशिवाय तिच्यातील उणीवा आपल्या लक्षात येत नाही, काही न करता हे जमणार नाही - ते जमणार नाही याची बोंब ठोकणे मला अजिबात पटत नाही. अवघड गोष्टींना प्रयत्न हि खडतर मार्गावरूनच असतात.           साधी स्वयंपाक घरातली गोष्ट बघाना. . , पोळ्या शिकायला किती दिवस लागतात..? तरी सुद्धा स्त्रिया शिकतात आणि काही दिवसानंतर तो त्यांच्या डाव्या-हाताचा खेळ होऊन जातो. मी तर खूप शिव्या खाल्ल्या राव पोळ्या शिकायला, मला लहापणापासूनच पापड अगदी गोल-गोल लाटता येत होता, पण पोळ्यांच काय असत..ना... फक्त आकार देऊन चालत नाही. त्यांच पीठ कस मळलय, उंड...