माझ्या बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते घरात फार कंटाळा येतो तू कशी ग एकटीच आनंदी राहतेस?, सगळे सोबत असतांना सुद्धा आयुष्याचा कंटाळा येतो तुझ्या सोबत तर कुणीच नसते मग तुला कस करमत? काय करतेस दिवसभर? तर, मी एकटी याच कारणाने आनंदी राहू शकते कि, मी एकटेपणात नाही तर एकांतात राहते. आणि माझ्या ह्याच एकांताला मी छंदांची जोड दिलेली आहे. अर्थात मला अनेक छंद आहेत. ज्यामुळे एकाचा कंटाळा जरी आला तर दुसर काहीतरी करता येत. माझ्या कामाची आणि त्याचबरोबर छंदाची यादी मी दिवसाला आठवड्याला महिन्याला आणि वर्षाला सुद्धा करून ठेवत असते. जसे दिवसाची सुरवात घरातील काम, स्वयंपाक आटपून लेखन करायचं, वाचन, स्वतःचे फोटोशूट करून घ्यायला आवडते, फोटो एडिट करायचे, व्हिडीओ बनवायचे, कधीतरी उगाच नट्टापट्टा करायचा, गाणी ऐकायची, कधीतरी रुमालावरील(कपड्यावरील) नक्षी काम करायचं, चित्र काढायचं, रांगोळी मेहंदी काढायची, फुलझाडे आणून लावायचे, माझे मेकअप, साड्या आणि दागिन्यांचे डबे आवरून सुव्यवस्थित ठेवायचे, नवीन नवीन पदार्थ बनवायचे, कधीतरी विसरलेली ज्वेलरी डिझायनींग करायचं, फिरायला जाऊन यायचं, कधी थकले...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....