मुख्य सामग्रीवर वगळा
#भात_लावणी🌱🌾👩🏻‍🌾👨🏻‍🌾

जपान मध्ये सगळ्यांकडेच स्वतःची शेती नसते. आणि ज्यांना शेती करण्याची आवड आहे त्यांनी काही पैसे भरून दिवसभर, महिनाभर किंवा काही वर्षे तेवढी जागा घेऊन शेती मध्ये काम करू शकता. पण हे केवळ आपली आवड, छंद जोपासण्यासाठी आणि आपल्याकडून शेतकरी बांधवांसाठी काही मदत होत असल्यास छोटेसे योगदान आहे. त्यात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लोक सहभागी होत असतात. आणि मी देखील एक दिवसाचे 3500¥(येन) भरून यात सहभागी होऊन शेतकऱ्यांसाठी माझे योगदान दिले होते.
त्याचप्रमाणे ह्या सोबत जपानीज सांस्कृतिक सोबा नूडल्स सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवले. सोबा नूडल्स हे जपान मधील सर्वात प्रिय आवडते असे नूडल्स आहेत त्या सोबत सूप सुद्धा असते. स्प्रिंग ओनियन (कांद्याच्या जाड लांब काड्या), कांद्याची पात नव्हे. त्याच्या चकत्या आणि वसाबी (खूप तिखट असा सॉस), सोया सॉस, पाण्याची छोटी पुडी असा लंच सेट बनवला जातो.
सोबा नूडल्स चे पीठ मळणे हे फार कठीण असते ते टणक मळता आले पाहिजे त्याला जवळजवळ एक तास पूर्ण लागतो आणि एक शंखाच्या आकाराचा त्याचा उंडा बनवता आला पाहिजे. त्यानांतर नूडल्स एका आकारात (जाडीत आणि लांबीत) कापता आले पाहिजे.
जपानीज लोकांचे हे वैशिष्ट्यच आहे कोणतेही काम क्रमाने करावे आणि हव्या तशा पद्धतीनेच त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला त्यांना आवडत नाही. भलेही तो पदार्थ चवीला सारखा होईल पण वेगवेगळ्या क्रमाने केले तर तुम्ही चुकलात समजा.
तर हे अवघड काम सुद्धा मी त्या एक दिवसात शिकले. दिवस मार्गी लागल्याचे सुख, समाधान आणि आनंद वाटला. दिवसभरात दोन वेळचे जेवण आणि घरी निघताना काही गमतीदार खेळ खेळलो लहान मुलांना खेळणी आणि सर्वांना सोबा नूडल्स, ग्रीन टी चे पाकीट देण्यात आले.
अशा प्रकारे जपान मधील शेती करण्याचा सुद्धा आनंद मी लुटला. एक दिवसातही आपण बरच काही शिकू शकतो.

भारतात आल्यावरही मी असा मौका सोडत नाही. पण यात मला वाटेकरू व्हावे असे कधीच वाटत नाही. तरी एक खेद मनाला नक्कीच वाटत असतो हे सगळं जर आपल्या हक्काच असत तरी आपण कंबर कसून किती काळजी पूर्वक काम केलं असत. योग्य पद्धतीने मशागत केली असती आणि मग हाच खेद वर्षभर तरी मनाला वाटू नये म्हणून शेतात काम करण्याची एकेदिवशी मज्जा मी दरवर्षी लुटत असते.
#Happy_forever👩🏻‍🌾🥳
व्हिडीओ कमेंट मध्ये😃

Rajashri Jagtap Rashri Jagtap-Shinde

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...