मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  प्रत्युष च प्राण्यांवरील प्रेम .... हंबाआ हंबाआआ ....,  मैंऐऐऐ ....,  भू ... भू .. भू ..  माऊमाऊमाऊ ....,  बट ... हूँ ... हूँ ....( बटरफ्लाय उडाली )  हे असे प्रत्युष चे शब्द .  लहान बाळाचे शब्द म्हणजे हे उच्चार नैसार्गिग रित्या येत असतात .  बाळाने प्राण्यांची हि बोबड्या प्रेमाने ठेवलेली नावे ...  हंबा पाहिल्या कि त्यांच्याकडे झेपा घेतो .  हंबा वर बसायचा हट्ट आणि आपण घाबरत घाबरत बसवलं तरी तो उतरायचं नाव अजिबात घेत नाही .  आणि त्या हंबा काही पाळीव नाहीत तरी सुद्धा आपण मुक्या जनावरांवरती विश्वास ठेवू शकतो .  त्या रस्त्याने नेहमी फिरत असतात पण कधी कुणाला मारत नाहीत .  प्रत्युषच्या त्या चांगल्या मैत्रिणी झाल्या .  त्याचबरोबर सकाळीस बकऱ्या सुद्धा येतात त्या पण बघायला त्यांना हात लावायला त्याला खूप आवडते .  दुदू पी त्यांचं म्हंटल कि गोड हसतो .... कॅबिला तर त्याची खूप खूप आवडती मैत्रीण तिला जेवायला देतो त्याच्या हातात काय असेल ते तिला खाऊ घालतो .  पीई .. पीई .. पीई .. जबरदस्तीने पाणी पाजतो .  अरे बाळ ती ग्लास...
 #प्रत्युष_अँड_फ्रेंड_सर्कल..... कुठलाही सण येणार असला कि लहान मुलांची लगबग सुरु होते त्यांना सण साजरे करण्याची फार उत्सुकता असते. आणि त्यांची उत्सुकता पाहून मला सुद्धा फार आनंद होतो, त्यांच्या सोबत त्यांच्या वयाप्रमाणेच बागडावस वाटत. त्यात आता माझं छोट कांगारू टुणटुण उड्या मारत इथून तिथून लुडबुड करत फिरत. एक वर्षाचं चुणूकल पण चार पाच वर्षाच्या मुलासारखी मस्ती, खेळ आणि सुसाट पळत सुटायला त्याला आवडत. सकाळ होतेय नाही कुठे तर दिवभर मोठ्या मोठया मुलांमध्ये खेळतो आणि ह्या मुलांमध्ये हाच लहान असल्यामुळे तेही केवळ तो झोपेल तेव्हाच गायब होतात नाहीतर त्याची अंघोळ खाणंपिन होई पर्यंत आमच्या घरात मुलांचा नुसता कल्ह्हा चालू असतो. सतत हल्ला बोल चालू असतो.  आणि लहानग्यांची हीच मज्जा मस्ती पाहून मी ठरवलं आपण दहा दिवस दांडिया ठेवूया. तस पण लॉकडाऊन मध्ये मुलांची शाळा नव्हती तरी देखील त्यांना सुट्टीचा आनंद काही घेता येत नव्हता. मग आता बाहेरील वातावरण थोडस बदलत आहे तर मुलांची हि हौस होऊनच जाऊदेत असा काही निश्चय मी केला आणि कामाला लागले.  त्यात सगळ्यांना रोज हलका फुलका नाश्ता ठेवू, काही स्पर्...
झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...