माझं घर माझा संसार २०१६...... लग्नांनंतर अवघ्या तेरा दिवसातच जपानला आले, त्यामुळे माझ्या संसाराची सुरवात हि ल्यक्स सेंघेन, त्सुकुबा इबाराकी, जपान. इथूनच झाली. विदेशात असल्यामुळे रेंटल हाउस होते. भाड्याने घेतलेलं घर हे काही दिवसानंतर बदलावच लागत, त्याची कारणे अनेक असतात. त्या घरात घडलेल्या बऱ्याच आठवणी तिथून घेऊन जातांना जेवढा आनंद होतो तेव्हडाच मात्र जीव कासावीसही होतो. पण हा नैसर्गिक नियमच आहे कुठलीही जागा सोडताना दुःख उराशी बाळगावच लागत. भविष्यातील येणाऱ्या सुखद आठवणी ह्या जुन्या, चांगल्या वाईट, गोड कडू आठवणींना जोडून पुढे चालावच लागत. जपान मधून भारतात पिल्लूला घेऊन जातांना थोडफार मनावर दडपण आले होते कि पुन्हा जपान मध्ये यायला मिळेल कि नाही किंवा मिळालेच तर आपल्या ह्या घरात पुन्हा राहायला मिळेल कि नाही. कारण एकदा सहजच नवऱ्याला म्हंटल होत हे घर आपल्याला आता फार छोट पडत, पिल्लू आल्यावर आपण मोठ घर घेऊया..! त्यावर नवरा उत्तरला हा...! काय गरज आहे? आहे ते छान आहे मोठ घर घेणे म्हणजे मोठे पैसे मोजणे... अशा हेके खोर माणसाला ना त्याच्या वेळेवर सोडून दिलेल क...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....