मुख्य सामग्रीवर वगळा

#एक_आगळ_वेगळं_नूतन_वर्षाचं_स्वागत🎉🥳🎊




 #एक_आगळ_वेगळं_नूतन_वर्षाचं_स्वागत🎉🥳🎊 


             घरात बाळ असलं कि मोठे मोठे दुःख मोठ्या समस्या यांचं कस सुखात रूपांतर होत असत हा अनुभव आमच्या परिवाराला आज आला. 

२०२० वर्ष्याच्या शेवटी नाना आम्हाला सोडून गेले. तेव्हापासून प्रत्युष(प्रबुद्ध) माझं छोटस बाळ त्याच्या सह घरात सगळेच दुःखी होते. तो त्या दुःखी वातावरणात पहिल्या दिवशी काही वेळेपुरताच उपस्थित होता. पण तेव्हा पासून त्याने रडणे सुरु केले तर जवळपास नऊ दिवस सारखा रडत असे, खूप त्रास त्याला होत असावा बहुतेक.  घरातील आम्हा सर्वांना त्याने सतत अंगावर घेऊन फिरा बसा, खेळायचं नाही, रडरड करायची सतत दुःखी राहिला. काही दुखतंय का काही त्रास होतोय का घरातल्या म्हाताऱ्या नजर काढताय, पण दिवसभरात खूप कमी वेळ खेळायचा. 

आणि अचानक नानांच्या जलदान विधी म्हणजे दहाव्याच्या दिवशी सकाळी लवकर बाळ झोपेतच असताना त्याची तयारी केली तेवढ्यात तो खूप रडायला लागला, तस आमच्या सगळ्यांना भीतीचे शहारे फुटले. आता बाळ खूप रडू शकते. कार्यक्रमा पुरत कस तरी नेऊ आणि लगेच आई बाबांकडे घेऊन येऊ. शक्यतो तो एवढा कधीच रडत नाही त्यामुळे त्याच थोडस रडणं सुद्धा कुणालाच आवडत नाही. मुळात त्याला कुणी रडूच देत नाही. 

ऐ पिल्लू चल आपल्याला फिरायला जायचं चल शेवग्याला जायचं.. तरी छेअव छेअव करून रडत होता. ऐ पिल्लूचल तुला पापड भाजून देऊ? होअअ....! पिल्लाचा मोठा हो ऐकला आणि मनाला समाधान वाटले. 

नागलीचा पापड भाजून दिला गडी खुश मस्त तयारी करून फिरायला निघाला. 

शेवग्याच्या घरी पोहचल्या बरोबर सगळ्यांना खुश करून दिले. बुद्ध वंदनेची तयारी सुरु असतांनाच मोठ्या काकांसोबत छोटीशी वंदना घेतली नानांच्या फोटोला हार घातला. संपूर्ण वंदना घेई पर्यंत पिल्लू एवढं गुपचूप शांत मेणबत्ती घेऊन उभे राहील जेवढं मोठं माणूस सुद्धा करत नाहीत मोठी माणसे सुद्धा महत्वाच्या कार्यक्रमात चुळबुळ करतील, गप्पा मारतील पण ह्या लेकराने संपूर्ण ध्यान मन लावून कार्यक्रम पार पाडला. जसे संपूर्ण दहाव्याचा कार्यक्रम ह्या छोट्या लहानग्या पिल्लानेच पार पाडला. नातवाच कर्तव्य अगदी सुरळीत पार पाडल. 

सगळ्यांनी त्याच्या वयोमानानुसार तो खूप हुशार असल्याचं तोंड भरून कौतुक केलं. 

मला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडला कि खरंच एक वर्षाच बाळ एवढं गुणी आणि समजदार असते का? मी सुद्धा माझ्या बाळाच्या कौतुकात न्हाऊन निघत होते. म्हणूनच तो माझा "प्रबुद्ध" आहे.

तिथून पुढे दिवसभर जे खेळाल बागडला लागलं भरपूर खाऊ खाल्ला झोप घेतली. कार्यक्रमात आणि घरात येणाऱ्या सर्व पाहुण्यांसोबत गप्पा मारल्या ज्या ज्या कला स्वतःला येतात त्या सगळ्या त्याने करून दाखवल्या. तिथे चिऊ काऊ नावाच्या दीदी आणि नांटूहून थोडा मोठा दादा छान फ्रेंड्स ची खूप आतुरतेनंतर भेट झाली. 

घरातील सदस्य किंवा पाहुणे यांना कुणालाच असे जाणवले नाही कि हा दुःखाचा कार्यक्रम आहे. दुःख विसरण्याची किंवा सहन करण्याची शक्ती त्या सगळ्यांना ह्या बाळाने वाटली. 

आणि वर्षाचा शेवट हा दुःखी नकरता आनंदी केला. अर्थात नवीन वर्षाचे हे आगळ वेगळं स्वागत ह्या बाळाने केले. 

घरी येतांना चिऊ काऊ दीदी आणि दादा ला जबरदस्तीने घेऊनच आला. आल्याबरोबर आधी त्याच्या खेळणी त्यांना वाटून दिल्या भरपूर खाऊ दिला. शिंदे आणि जगताप परिवार तसेच संपूर्ण पाहुणे एका आनंदी कार्यक्रमाला येऊ गेल्याच त्यांनी व्यक्त केले.


छोट्या प्रबुद्ध (प्रत्युष) कडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२१ हे वर्ष सर्वांना आनंदी भरभराटीच आणि उत्तम आरोग्याचं जावो🎉🥳🍫


   मोठ्या काकांसोबत घेतली बुद्ध वंदना आणि नानांना केलेले वंदन💐🙏


Rashri Jagtap-Shinde Rajashri Jagtap Shinde Satish

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...