बुद्ध पौर्णिमा...... एकदा असच सुपर मार्केट “सेयु” मध्ये सगळं सामान घेतलं बाहेर निघतांना पिल्लूला तेथील अंडर ग्राऊंड मधील गेम्स च्या सेक्शनला खेळायला जायचं होत, ड्याडी आणि पिल्लूला म्हंटल तुम्ही दोघे गेम खेळून या मम्मा इथे बसते. तोपर्यंत तिथे एक जापनीज कुटुंब आलं अन मी फोन मध्ये असतांना अचानक आवाज आला Excuse me? Can I seat here? Yes yes sure! म्हणत मी तिच्याकडे बघितलं, तर ती गरोदर, सोबत तीन वर्षाची मुलगी आणि नवरा. मग काय पुढे पाच दहा मिनिटे गप्पा केल्या आम्ही छान मैत्रिणी झालो तिचे नाव “हारुका” आणि ती लहानमुलांच्या मुझीयमसाठी चे संशोधन करत असल्याची माहिती मिळाली, अधिक तिचा स्वतःचा एक वैयक्तिक उद्योग असल्याचे देखील समजले. तेवढ्यात आमचं कुटुंब खेळून बागडून आलं, आणि मग काय दोन्ही कुटुंबाची ओळख झाली आणि येत्या शनिवारी मुलांना एकत्रित खेळण्यासाठी आमच्या जवळील पार्क मध्ये भेटण्याच ठरल... दोन तास मुल छान खेळली, एकत्रित पार्क मध्ये बसून जेवण केले. मुलांचे काही फोटोज काढले. पुढे आम्ही दोघी मैत्रिणी नेहमी भेटू लागलो, एकमेकींनकडे असणारे ज्ञान वाटू लागलो. नक्कीच हारुका मुळे मला ख...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....