मुख्य सामग्रीवर वगळा

 प्रत्युष मोर🦚


पाऊस असो, वारा असो, वादळ असो अथवा उन्हाळा असो,मात्र बाहेर खेळायला जाण्याचा आपला हट्ट मम्मा पूर्ण करणारच आहे हे नक्की. चुंटुकले पुंटुकले हे, ह्यांना बरोबर माहित असत गोंडस हट्ट कसा पूर्ण करून घ्यायचा ते🥰.... त्यातल्या त्यात पावसात खेळायला जायचं म्हणजे मज्जाच मज्जा☔️. पण हल्ली सर्दी ताप हे शब्दच भयंकर वाटतात. त्यामुळे बाहेर जाऊया पण रेनकोट घालून मग काय आपल्याला बाहेर जायचं आहे हे महत्वाचं उद्धिष्ट, मग आता काय रेनकोट घालून पावसात खेळू पण खेळूच, बाहेर जाऊच🥳. अय्या पिल्लू तू किती क्युट दिसतोय💕😘 चल जाऊ बिनधास्त पावसात खेळू आपण दोघे. जादू आहे माझी तू पिल्लुडी मला खुश करतेस ल्ब्यू बाबू❤️😘 पिल्लू तू कसा दिसतो माहितीये?🥰 जादू.....😘जादू दिसतो तू जादू❤️ दादू😙....हाहाहाआ🤣😂😆 दादू नही रे जादू जादू😂 दादू दादू🤦🏻‍♀️😁😘 लहान बाळाचं कौतुक केलेलं त्यांना खूप आवडत जेवढं कौतुक तेव्हढ्या ते आपल्या गोष्टी ऐकतात. मग काय पुढे एकदा एखाद्या वस्तूच नाव माहिती होऊद्या बस्स "नेनोट नेनोट"(Raincot) सुरु. अंबेला अंबेला मम्मा मम्मा अंबेला(Umbrella) छती छती(छत्री) घेऊन नाचायचं. पाऊस आला म्हंटल कि हा छोटा मोर बागडायला तयार🦚 आई प्रेमाने पिल्लूला मोरच म्हणते. आईने सगळ्यात आधी पिल्लाला इथं इथं बसरे मोरा गाणं शिकवलं, तिने मोरा म्हणून हाक मारली कि हे वेड कोकरू जाऊन तिच्या समोर बसायचं😂 मग त्याला पुन्हा मोराच गाणं म्हणून दाखवायचं🥳 जपान मध्ये पाऊस हा बाराही महिने असतो मे जून दरम्यान चा पाऊस म्हणजे येथील पावसाळा, हल्लीच्या ह्या दररोजच्या पावसामुळे माझा मोर स्ट्रॉलर मध्ये मस्त बसून स्वतःची छत्री बरोबर सांभाळतो, त्याला कुठलीही गोष्ट एकदा दाखवली किंवा त्याने पाहिली कि तो ती कुतूहलाने स्वीकारतो. अगदी आनंदात बागडत सगळं ऐकतो, ऐकून अगदी बरोबर त्या कृती हुबेहूब तो करतो. तुझं बालपण असच बागडत राहो माझ्या मोरा🦚😘 बुद्धिवंत हो भाग्यवंत हो माझ्या प्रत्युष मोरा..... छोट्या मोराचे बागेतील फोटो 👇 https://www.facebook.com/100003623217859/posts/2311518005645617/?d=n


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...