मुख्य सामग्रीवर वगळा


लगबग लगबग सासूबाई बघ बघ,
सूनबाई आणली नांदायला.....
       आणली त बरी आणली.., ती कुड म्याह्या चुलीपाशी रांधायला ठीवलीय तवा... 
अन सुनबाई आणली ती, म्याच आणली. मला काय सांगती...!
पोरायेंचे शिक्षण चांगले झाले का त्ये बायका करीत्य, अन जात्या आपल्या आपल्या बायकांना घेऊन... इड गावातल्या महा बराबरीच्या बाया पाण्याचा तांब्या उचलती नही सगळ आयत जागच्या जागी मिळवीत्या.... असा काही तगादा त्या सासूचा सुरु होतो, अन छोट्यामोठ्या अपेक्षांनपाई मुलाकड कुरबुरींना सुरवात होते. 
आता मग,  सुनबाईच्या पण अपेक्षांचा तगादा नवऱ्याकड सुरु होतो. तू सुशिक्षित आहे तू आईला समजवल पाहिजे, जे मुल शेती-भाती करतात, राहत्या शहरात नोकरी करतात, आई-वडिलां जवळ राहतात त्यांच्या बायका हेसगळ करतीलच ना?, आमच्यासारखे विदेशात राहणारे स्वदेशात आपल्या घरी कधीतरी येतील-जातील, आमच्या बायकांना म्हण किंवा विदेशात राहणाऱ्या ह्या पोरींना म्हण वर्षाभरातून किंवा चार दोन वर्षातून एकदा माहेरी जायला भेटत. आपल आयुष्य इतर कुटुंबांपेक्षा वेगळ आहे, त्यामुळे आपल्या घरातील पद्धती देखील वेगवेगळ्या असतील ना?,  
       सासूला माझ्या नेहमीच सगळ्याच गोष्टींची लगबग लगबग, असोत तू तर काही आईला समजवू शकत नाहीस, मीच बघते कस समजवायचं ते... विदेशात घेऊन येते माझ्यासोबत म्हणजे तिच्या डोळ्यान पाहिलं ती तिच्या मुलाला कस सुखात ठेवते, कस सांभाळते, कशी काळजी घेते, कसा संसार सांभाळते. आपल्या मुलाचा संसार सुखाचा चाललाय तो कसा काय बरं?... तिला माझ्या हातचे नवीन नवीन पदार्थ खाऊ घालते. नाहीतरी इथ जे मित्र मैत्रीण होतात त्यांच्यासाठी आपण कर पुरणपोळ्या कर, मटन, चिकन जेवणाच्या मेजवान्या आणि थोड्या दिवसांनी त्यांची बदललेली वागणूक हे पाहून तर इथ मी हैराण आहे. काय रे आपण आपल्या आई बापाला किती पंचपक्वान करून घातलेत जेवढे इथ भेटणाऱ्या अनोळखी माणसांना आपण घालतो. 
खरयं, नही आता तू थांब मी खरोखरच विचार करतोय आई नानांना थोड्या दिवस आणि मामा मामींना थोड्या दिवस अस अधून मधून आपल्याकडे घेऊन यायचं. आपण लाख विचार करू रे पण हे बुढा बुढी तयार होतील का? ह्या म्हाताऱ्या लोकांना आपल घर, शेती, मुल, नातवंड सोडून दुसऱ्या जागी काही दिवस अथवा महिने राहणे फार कठीण वाटते, वर्षभराच तर बोलूच नको...
आणि मग काय अशा काही अनेक कारणांपाई काही अपेक्षा.. शब्द... काही वाक्य..... काही रुसवे-फुगवे.... अशातून सासू सूनेच नात हे थोडस गुंतागुंतीच नात तयार होत चालत.
       पण, तरी देखील दोघींचं एकमेकिन सोबत आपसात किंवा तोंडावर कधीही भांडण नाही, कधी वाद नाही. जे डोक खायचं, जे भांडायचं ते तिन्ह तिच्या मुलाशी., अन हीन हिच्या नवऱ्याशी. मात्र दोघी भेटल्या तर गुळाच्या भेल्या नुसत्या.
         दोघींच्या बाकी इच्छ्यांच गणित तर माहित नाही कोणी कोणाच्या पूर्ण केल्या किंवा नाही. पण “मला नातू पाहिजे, नातू” अस हसत हसत हळूच सुनेकडे व्यक्त केलेली हि इच्छा सूनेन मात्र मोठ्या अद्बेन पूर्ण केली. जपान मधली जपानी गुडिया(जपानी बाहुली) सासूला भेटवस्तू म्हणून दिली तेव्हा आता पुढच्या वेळेला आली कि खरीखुरी जपानी गुडिया घेऊन ए मला “नात पाहिजे नात”.... 
नात तर मी देईल, पण तिला घेण्यासाठी आता तुलाच जपान ला घेऊन जाईल थांब, नाही नाही माझी सेवा करायला मुळीच नाही तुझे दोन्ही नातवंड सांभाळायला.....
सासूला जपान ला घेऊन यायचं, सूनेन थाटलेला मुलाचा संसार दाखवायचा, नातवंड तिच्याकड सांभाळायला द्यायचे हे सगळे स्वप्न अधुरे राहून गेले. आयुष्यात भेटणाऱ्या माणसाला एकमेकांविषयी विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास मिळविण्यासाठी माणूस निदान काही काळासाठी एकत्रित राहणे हे आवश्यक आहे. आणि ती वेळ सासू-सुनेने कधीही एकत्रित घालविली नसल्यामुळे हे नात नाजूक राहून गेल. 
        आज मुलाच्या लग्नाला पाच वर्षे झाले. पाच वर्षापूर्वी ०१/०५/२०१६ मोठ्या आनंदात वाजत गाजत आक्ख गाव वरात घेऊन येणारी बाई आजच्या दिवशी आम्ही तीच दहाव घालाव अशी वाईट वेळ आमच्या कुटुंबावर आली आहे. खरच आपण पाप करतोय कि पुण्य करतोय असा प्रश्न आज पडलाय.   
प्रत्येक गोष्टीत नेहमीप्रमाणे लईच लगबग लगबग केली सासूबाईनि. वय वर्षे ६१ ताटम निरोगी शरीर. कुणीही तिला पहिले किंवा भेटले किंवा फोटो जरी पाहिला तरी म्हणायचे तुझी सासू किती ताटम वाटते, एवढ वय असेल असे वाटत नाही. हो मग, अजून पंधरा ते वीस वर्ष आरामात जगेल अशी आहे माझी सासू. 
आत्ताच तर संसाराला सुरवात केली होती आम्ही, आत्ताच तर सुनबाई आणली होती ग सासूबाई तू. एवढी लगबग लगबग करण्याची काय घाई होती ग बाई... अजून थोड्या वर्ष थांबली असती आपण दोघींनी मिळून तुझ्या मुलाच डोक खाल्ल असत, मिळून त्याला त्रास दिला असता गं... 
लगबग लगबग सासूबाई बघ बघ,
सूनबाई आणली नांदायला.....
चुल्हीपाशी ठेवली रांधायला......


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...