मुख्य सामग्रीवर वगळा

मैत्री...!

                
           मैत्री हे नात जगात प्रत्तेकासाठीच खूपच जवळ असत. पण मनाच्या जवळ चे मित्र मैत्रिणी मिळण्यासाठी देखील भाग्य लागत. आणि यात देखील मी भाग्यवान ठरले. मैत्रीच सौख्य मला फारच छान लाभलेलं आहे. अगदी विदेशात येऊन देखील मला कधीच परकेपणाची जाणीव झाली नाही ती केवळ मला लाभलेल्या मैत्री मुळेच. इथे मला बऱ्याच देशातील विविध मैत्रिणी मिळाल्या. त्यातला त्यात Akiko-San या जपानीज फारच जिवलग आहे. आमची भेट एका Event मध्ये झाली. माझ्या जपान मधील पहिल्या मैत्रिण ह्या Nishikawa-San त्यांनी एक Event आयोजित केलेलं होत. “थानाबाता” हा एक जपानीज सण आहे. तो एका मुलीच्या प्रेम कहाणी वर आधारित ते साजरा करतात. ती संपूर्ण प्रेम कहाणी वाचून दाखविणे असा Event असतो. त्यादिवशी “Origami” म्हणजेच कागदापासून बनवलेल्या गोष्टी तसेच दागिने बनवून ते एका छोट्याशा झाडाच्या फांदीला लटकवतात आणि मनातील इच्छा व्यक्त करतात. Akiko-San ह्या Event च्या सूत्रसंचालक होत्या. Nishikawa-San यांना माहित होत कि मी Jewellery Designer आहे. त्यामुळे त्यांनी लगेचच माझी ओळख Akiko-San सोबत करून दिली. आणि मला जपानीज अलंकार शिवण्यास सांगितले. दोन-तीन दिवसातच Akiko-San ह्या मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आणि बरेचसे दागिने शिवण्यास सुरवात केली. तेव्हापासूनच आम्ही खूप छान मैत्रिणी झालो. 
         
         
आज त्या ५५ वर्षांच्या आहेत. त्या माझी नेहमी मुलीप्रमाणेच कळजी घेता. मला कधीही कुठेही जायचं असेल तर आम्ही सोबत जातो. मी बरचसं जपान त्यांच्याच मुळे अन्वेषण (Explore) करू शकले. बऱ्याचशा Party’s, International Culture Exchange Program, Japanese Events, Japanese Movies, Japanese Food(Restaurants), Shopping, Places, Photography इत्यादी बरचसं Japanese Culture मी त्यांच्या सोबत अन्वेषण केल. जपानीज भाषा देखील त्या नेहमी भेटल्यावर शिकवत असतात. जपानीज ड्रेस कसा घालायचा, त्यांची नाव, प्रकार हे सगळ त्यांनी मला शिकवलं. माझ्या वाढदिवसासाठी जपानीज ड्रेस Select करायला देखील त्या आलेल्या. त्या नेहमीच माझ्यासाठी वेळ काढतात. आमच काही खास अस Planning नसत. एक दोन दिवस आधी एखादा मेसेज केला तरी आम्ही एकमेकींसाठी तयार असतो. पण एकदा ठरल्यानंतर आमचे Plan कधी बदलत नाही. तस जपानीज लोकांची ही खासियतच आहे. एकदा दिलेला शब्द ते मोडत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या मदतीस ते तत्पर असतात. मग मैत्रीसाठी हे सगळ त्या खूपच मनापासून सगळ काही करत असतात. मी दोन वर्षात दोनदा जपान मधून भारतात गेले, दोन्ही वेळेस त्यांनी हाताने काही जपानीज अलंकार बनवून दिले. खास माझ्या मम्मी आणि बहिणीसाठी. एक सुंदर अशी Origami ची Handmade Frame त्यांनी मम्मीसाठी दिली. Facebook ला माझे संपूर्ण कुटुंब त्यांना Join आहे, तसेच त्यांना माझी बहिण खूपच आवडते. आम्ही भेटलो कि तिला आवर्जून Video call करतोच. सुरवातीलाच पहिल्या दुसऱ्या Call मध्येच त्यांनी माझ्या बहिणीला त्यांच्या मोठ्या मुलासाठी विचारल होत. मला फारच छान वाटलेलं पण माझ्या घरच्यांनी नाही म्हंटल. असोत.. माझ्या आठवणीतला क्षण म्हणून जोपासून ठेवेल.

         त्यांना जेवढ्या काही कला अवगत आहेत तेवढ्या त्या मला शिकवत असतात. माझ्याकडे ज्या काही कला आहेत त्या मी त्यांना शिकवते किंवा त्यांच्या साठी करते. जसे मेहंदी काढण, पुन्हा आपल भारतीय जेवण शिकवण पुरणपोळ्या केल्या तर आवर्जून त्यांना देते. पाणीपुरी मधील सर्प्रकारचे चाट मी त्यांच्यासाठी बनवले, इडली, वडापाव पुन्हा बऱ्याचशा भाज्या अपल्या पद्धतीने बनवून दिल्या. त्यांना पावभाजी खूपच आवडते ती त्यांनी शिकून घेतली आणि मसाले माझ्याकडून घेऊन गेल्या. मी पावभाजी बनवतानाचा Video काढून त्यांना पाठवला. तो Follow करून त्यांनी सुद्धा एकदम चविष्ट अशी पाव भाजी बनवली.

          हल्ली काही दिवसांत मी खूपच व्यस्त असल्यामुळे मला घरातल सगळ आवरून दोन वेळच जेवण, दोन वेळचा नाश्ता बनवण्यात फारच धावपळ होऊ लागली होती. जपानीज लोकांचा आहार हा जो ते घरी बनवतात तेच Restaurants मध्ये देखील असतो. उदा. आपल्याकडे भाजी-चपाती, डाळ-भात हे आपल रोजचच जेवण असत तस हे लोक रोजच Nodles, Soup, Fish-Mutton-Pork-Beef हे बऱ्यापैकी कच्च्च खातात. कधीतरी Fry केलेल असत. पण Row Food ची संकल्पना जास्त चालते. मग एके दिवशी मी विचार केला. आपण जापनीस पद्धतीने जेवण बनवून डब्याला नेत जाऊ. ते पदार्थ बनवण्यासाठी जास्त काही वेळ खाऊ नसतात. आणि पौष्टिक सुद्धा असतात. Akiko-San ला सहजच विचारले, मी Short time मध्ये काय-काय बनवू शकते?. तर त्या म्हणाल्या तुझी ऑफ केव्हा आहे. त्या दिवशी भेटू, मी हि Ok म्हंटल.. आणि ठरलेल्या दिवशी त्या ३कि. जपानीज तांदूळ, “Tunna” Frozen माश्याची एक डबी, काही Sauce अशा अनेक गोष्टी त्या घेऊन आल्या. आल्याबरोबर त्यांनी माझा इलेक्ट्रिक कुकर काढला आणि तांदूळ धुण्यापासून ते Rice balls बनवण्या पर्यंत त्यांनी मला सगळ शिकवल. त्या अगोदर आम्ही कुकर ला भात लावून काही Frozen Food घेण्यासाठी गेलो. असे Food जे खाण्याअगोदर काही थोडावेळ आधी Freezer मधून काढून Microwave केले जाते. Ready to Eat.. अस बरचसं काही घेऊन आलो. अशा प्रकारे मला त्यांनी जपानीज जेवण शिकवलं. 
   
       
अशी आमची हि मैत्री नेहमीच आम्हाला एकमेकींना काही-ना-काही शिकवत असते. मला परदेशात अशी साथ लाभण हे माझ अहोभाग्यच आहे... आयुष्यात कधीही न विसरण्यासारखी माणस भेटावी...! 
  
तुझ्या वाढदिवसाची भेट                   
म्हणून हे एकच वाक्य                            
मी तुला विसरणं 
कधीच नाही शक्य !!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!


It is hard to pick a favourite memory that I share with you...looking back...each day is a wonderful memory; Happy birthday to my best friend.





टिप्पण्या

  1. That's so sweet! You are lucky to have met such a wonderful person.

    Amchya lab madhe pan ekda 3 Japanese exchange students ale hote. Tyanna amhi idli sambar khayla ghatla. Tyatlya ekala te itka awadla ki tyane ektyane 18 idlya khallya, that too for the first time in his life! Dusre ek kaka hote 62 years old. Oku-San. Te mala email madhe ''Dear Shantanu-san" mhanayche, mag mi reply madhe "Dear Shri Oku" vagaire lihaycho. :D

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा