मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय जेवण...!


भारतीय जेवण...!

          या जेवायला... नाही म्हणजे आमच जेवून झालय.. आपल्या भारतात तशी पद्धत आहे समोरच्यांना जेवायला बोलवायची., येणार नाहीत हे माहित असत हो.    हाहाहः...


         
          काल सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर मॉल मध्ये भटकंती काढली. मी मस्त-मस्त..पिंकी-पिंकी शुज घेतले, एक सुंदर ब्लू फ्रॉक ट्राय केला पण कलर पिंकी-पिंकी हवा होता म्हणून नाही घेतला. मग रात्रीच जेवण बाहेरच करून परतायचं ठरलं, काय जेवायचं..? तर, आज भारतीय जेवण जेवूया म्हंटल. एक नवीन Restaurant मध्ये बघूया कशी चव आहे ती. भारतीय थाळी मागवली, पण चवी मध्ये साहेबांचा थोडा हिरमोड झाला. मग म्हंटल चल मी उद्या तुझ्यासाठी शाकाहारी थाळी बनवते. तस एक-दोन महिन्यातून हा बेत असतोच, आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही असतात. जपान मध्ये माझ्या बऱ्याच राज्यातील मैत्रिणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी साउथ-इंडिअन, पंजाबी, बांग्लादेशी, उडीसा, असे अनेक प्रकारचे पदार्थ इथे शिकले.

ह्म्म्म., ठीक आहे... ThanqQ wifieeee..

           घरी आल्याबरोबर ठरलं “सांबर, मेदुवडा, पालक-बटाटा, जीरा-रीईस, मिक्स व्हेज, दही कोशिंबीर, लच्चा पराठा, छास, खीर, उन्हाळी फराळ(पापड्या) अशी थाळी म्हणजे जे आपल्याला आवडत ते विशिष्ट राज्याची नाही. काय सामान आहे, काय नाही ते तपासून.. नसलेल्याची यादी करून दिली आणि सकाळी मला एवढ आणून द्या म्हंटल हो म्हणाले.. मी मेदुवड्यासाठी डाळ भिजत घालायला विसरले. साहेब २ वाजेपर्यंत Match, सिनेमा पाहत बसले, २ वाजता म्हंटल ओ जरा डाळ भिजत घाला मी विसरले. कशासाठी..? मेदुवड्यासाठी... अग थाळीत कुठे असतो का वडा..? आणि तस पण खूप तेलकट असतो तो मला तर नको. अं..अअअ...! फोटो दाखवले हे बघ.. हे बघ...अअ थाळी याला म्हणतात. कहर ए बाई...! माणसाला येवढा आळशी पणा नसावा कि त्यापायी खाणच नको... धन्यय तुम्ही बाबा.. लग्ना आधी असा आळशी पणा करायला काही चान्सच नाव्ह्ताना...? बायको असल्यावर नवरेशाही कि कमालीचीच असते बाई.. म्हणजे त्यांच्या कडे जी काही कारण असतात ती जबरदस्त असतात. काहीही विचार न करता लबाड्या करतात ते. म्हंटल जा मी पण नाही टाकणार राहूदेत मला हि नाही खायचं... तस डाळ काय दोन-तीन तासात छान भिजते आणि सुरवातीलाच ती भिजवू अस ठरलेलं माझ पण मी सांगितलं नाही, म्हंटल बघू आळसाला किती कारणे असतात ते.... भयंकर कारण निघाल बाई.. धन्य झाले मी...

           अकरा ला ते समान आणण्यासाठी गेले मी थोड घर आवरून, आहे त्या सामग्रीत सुरवात केली. तासाभरात अर्धा स्वयंपाक झाला. तोपर्यंत बाकीच्या सामग्री पोहोचल्या. अशा पद्धतीने अवघ्या दोन तासात संपूर्ण थाळी मी तयारी केली एक वाजता जेवायलाही बसलो...

           आणि हो सर्वच पदार्थ चविष्ट झाले बरं.....

ThanQ Wifieeee, मस्त जेवण बनवल सगळच छान, एकदम झकास... Indian Reastaurant घरातलच छान आहे बाबा... हो,.. फक्त दोन तास आधी ऑर्डर द्यावी.. प्रेमाचा रस्ता नवर्याच्या पोटात असतो अस काहीतरी म्हणतात, ते काहीतरी नाही, अगदी खर आहे.

हे सगळ लिहिण्या मागचा एकच उद्देश कि “नवरेशाही” त्यांना जिथ वाटेल तिथच ते मदत करतील, नाहीतर बाकी सगळ आपलं चुकीच असत.., नाही म्हणजे मलाही मदत केली तशी त्यांनी, पण काय जाऊ देत आता,. परत असा आळशी पणा केला ना...! तर मीही काही बनवणार नाही.... समजले... चांगलेच समजले असेल..... You understand..? You better understand....!  



तुझी श्रीदेवी......    
         


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...