मुख्य सामग्रीवर वगळा

गल्यान सांखली सोन्याची....!


गल्यान सांखली सोन्याची....!



गल्यान सांखली सोन्या ची,       
ही पोरी कोना ची
तू मेरा दिल हैजाने जिगर है
दिल दे दियातुझे दिल दे दिया
तू भी अच्छी लगीदिल कि सच्ची लगी,
दिल है फिदामेरा दिल है फ़िदा
मेरा सपना है तूमेरा सजना है तू
हो ना जुदाकभी हो ना जुदा
दम से है तेरे ये रोशनी
ही पोरी कोना ची
इसकी अदा मेरा दिल ले गई
ही पोरी कोना ची
गल्यान सांखली सोन्या ची,       
ही पोरी कोना ची......
dilhkmantanahi.



           काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्या शालेय जीवनाच्या वेळची गोष्ट. त्या दिवसात एका सोन्याच्या साखळीची(Chain) पद्धत(Fashion) आली होती. आणि तिच्या सोबत एक छोटस पिंपळाच्या(बदामाच्या) आकारच पान(पदक) असायचे. बऱ्याच मुलींच्या गळ्यात अशी पदकासोबत-साखळी दिसत असे. आमच्या शेजार्यांच्या मुलींच्या हि गळ्यात होत्या. त्यांच्या आईने बनवून आणल्या तेव्हा, आमच्या मम्मी ला दाखवल्या. तर ही घरात आल्याबरोबर लागलीच बोलू लागली, “अग त्यांनी अशी अशी साखळी-पदकासोबत बनवून आणली. मलाही फार इच्छा आहे तुमच्या दोघींसाठी बनवायची. तशी माझी इच्छा बऱ्याच वर्षांपासूनची आहे. पण हल्ली हि डिझाईन खूप प्रचलित आहे. त्यामुळे माझ्या मनात बसलीय. चीवे- तू चांगल्या मार्कांनी पास झालीस कि तुला हि मी अशी पदकासोबत साखळी बनवेल”. मी पण फार खुश झाले. अस ती दर वर्षी म्हणत गेली. आता आली माझी १०विचि परीक्षा तेव्हा तर तिने कबुलच केलेल.....     

                   झाला, १० विचा रिझल्ट हि छान आला पण मम्मी तिच्या शब्दांना पुढे ढकलू लागली. यात तिची काहीच चूक नव्हती म्हणा... कारण व्यवहारिक गोष्टी घरातला पुरुषच सांभाळत आलेला आहे. पिढ्यानपिढ्या आणि आजही आमच्या सुद्धा पिढीत तेच चाललय.. मग स्त्री ने कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतलेले का असेनात मग ते त्याच्या कुटुंबासाठी जरी असतील तरी देखील, त्यात त्याचेच विचार घ्यावे लागतात. घरातल कुठलही व्यवहारिक काम हे त्याच्याच हस्ते किंवा विचाराने होत असते, तो म्हणाला हो.. तर ते काम नक्कीच होईल, नाही म्हणाला तर आपण विसरून जायच.. मन, भावना इच्छा, अपेक्षा स्वप्न या सगळ्यांना काडी लावायची.

         त्यामुळे मी तिची हि परिस्थिती फारच समजून होते. म्हणून मला कधी फारसा राग आला नाही तिच्यावर. पण माझी नेहमी अपेक्षा असायची कि तिने तिच्या हक्कांसाठी लढाव तिने भांडाव, इतर बऱ्याच स्त्रिया ह्याच चालीवर संसार करत असतात, तेव्हाच तर त्यांची काही स्वप्ने सत्यात उतरत असतात. पण तिने हे कधीच केल नाही, तिला ते आवडत नव्हत, आणि मला ते जमणार नाही असाच काय तो एकच ठेका तिचा नेहमी असायचा... असोत पण तिने अशा आघाव नवऱ्यासोबत देखील सुखाचा संसार करून दाखवला. संसाराच्या मोठ्या-मोठ्या व्यवहारिक गोष्टीत मात्र तिनेच बाजी मारली, जसे का मुलांचे शिक्षण हवे त्या शाळेत करणे, हवे तिथे शिकवण्या लावणे, घर घेणे, माझ्या लग्नाचा निर्णय घेऊन योग्य ठिकाणी पैसे लावणे... असे अनेक काम तिने नवऱ्याकडून करून घेतले, तिच्या स्वतःची सोडून बर... कारण आयुष्भर ती संयमाने राहिली. जे नवरा देईल त्यातच सुख मानून जगत आली. मग भलेही ते मुलांसाठी झगडन का असेना. उलट ती आम्हालाही तेच शिकवत आली. पप्पांची संमती असेल तरच ते काम करायच.

         पण हा सगळा प्रकार फक्त आम्ही वयात येई पर्यंत नंतर मी फारच बोलू लागले, पप्पांकडे घरातल्या सगळ्यांसाठी भांडू लागले. आम्हा चार ही जणांचे हक्काने सगळे हट्ट पूर्ण करून घेऊ लागेल, मी काही मम्मी सारखी नाही राहिले बाबा....! मी फारच आघाव पणाणे वागते, “मला हवय म्हणजे हवय”. मला माझ्या इच्छा पूर्ण करायचा छंद आहे. मग समोर कुणीही का असेना. आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांच्याच लाडाची मी...

         तर सांगायचा उद्देश असा कि मी माझ्या पदवी शिक्षणानंतर ज्या नोकरीला लागले त्यात मम्मीची आणि माझी इच्छा पूर्ण केली. शेवटी मी ती साखळी आणि पदक घेतलच, त्या दिवशी मम्मी फारच खुश झाली हा.....! अशीच... अशीच चीवे....! माझ्या मनात अशीच... डीझाईन होती.. ती भलतीच खुश झाली. मला हि फार बर वाटल...

        आता पुढचा किस्सा सांगायचा असा कि, ह्याच बाईने माझ्या लग्नात मला काही दागिने बनवायची तसदी घेतली नाही पण जावयाला मात्र भारी अंगठी आणि साखळी केली तेव्हा मात्र नवऱ्याशी भारीच डोक लावल हं...तिने..!, तेव्हा मात्र घाबरली नाही. पण मी आघाव पणा करायला कधीच कमी पडत नाही ना त्यामुळे इथे गप्प बसेल अस वाटत का...? हो पण असा आघाव पणा करायचा कि जो कुणाच्याही लक्षात आला नाही पाहिजे. हा..हा...हा.....आ....! हि.ई..ई...ई.....

        पप्पांनी विचारल काय ग? काय घ्यायच तुझ्या नवऱ्यासाठी..? वाआव्व्व...! काय “Golden” चान्स आहे राव.. द्या दणका.... म्हंटल एक अंगठी आणि साखळी.. हो अर्ध्या तोळ्याची अंगठी आणि अर्ध्या तोळ्याची चैन बस ना...? आ...आ... काय..? तुम्हाला बाळ नाही होत आहे, जावई भेटतोय जावई... एक तोळ्याची अंगठी आणि दोन तोळ्याची साखळी करा. त्यावर त्यांनी माझी थोडी विकेट घेतली, पण नंतर मम्मी गंभीरपणे म्हणाली बर मस्करी थांबवा आणि आपल्याला खरच हे कराव लागेल याचा विचार करा. तेही हो म्हणाले.. थोड्या वेळाने हो..लगेच नाही, हेही त्यांना थोड पटवून द्याव लागल. जावई आल्याबरोबर त्याच दिवशी त्याला दुकानात घेऊन गेले आणि “माझ्या पसंतीने” सर्व वस्तू घेतल्या... नाही म्हणजे, माझ्या पसंतीने हे जोर देऊन का बोलली ते कळाल असेलच एव्हाना तुम्हाला.. घेतांना मी थोडी मनात पुटपुटत होते म्हणा, माझ्यासाठी काही घेतांना काय-काय कारण द्यायचे हे लोक आणि आता जावयासाठी लगेच दोघे पण तयार झाले.., काय गम्मत केली यांनी माझी कित्तेक वर्षे राव....! जाऊदे राजू दुखीः नको होऊ, जे जावयाच आहे, ते मुलीच आहे. हाहाहः.... Yo-Yo...Hooney सिंगा..आ.... ThanQ..G...

         वर्ष भर मी विसरून गेले माझ्या काही मनातहि राहील नाही. कारण वस्तू कुठेही का असेना ती आहे न याच समाधान बसं.... मग एक वर्षाने भारतात आलो. माहेरी जायला मी दागिने घातले, मग नवऱ्यालाही हौसेने घालायला लावले. तिथे असे पर्यंत जबरदस्तीने त्याला घालायला लावले त्याला काही रस नाही दागिन्यान मध्ये पण राव, मला आहे ना...! आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्या साखळीत तसच पण मोठ्या आकारच म्हणजेच साखळीला शोभेल एवढ पदक मी त्याला गिफ्ट दिल आणि जपानला येई पर्यंत त्याच्या अंगावर ते होत, जपान ला आल्याबरोबर दुसर्याच दिवशी ल्याब ला जायच म्हणून काढून ठेवले, म्हंटल राहूद्या छान वाटत आहेत, तर नको मला नाही आवडत, नको, नकोचा पाढा लावला, म्हंटल द्या मी घालते, दिली ना बाई....! साखळी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालून... आता जा म्हंटल, विसर आता...! हो पण अंगठी माझ्या बोटात येत नाही, किती वाईट ना..?
खबरदार परत नाव काढशील तर इथून पुढे माझ्या मम्मी पप्पांनी बनवली आहे मीच घालणार आता. ह्म्म्म....! बिचाऱ्याने परत कधी नाव काढले नाही... 

         थोडक्यात मम्मी-पप्पांच्या लाडक्या जावयाच्या वस्तू सगळ्या माझ्याच आहेत.... तस पण ते तुझच स्वप्न होत ना ग मम्मी....हाह्हाहः.....

गल्यान सांखली सोन्या ची,       
ही पोरी कोना ची
तू मेरा दिल है, जाने जिगर है
दिल दे दिया, तुझे दिल दे दिया
तू भी अच्छी लगी, दिल कि सच्ची लगी,
दिल है फिदा, मेरा दिल है फ़िदा
मेरा सपना है तू, मेरा सजना है तू
हो ना जुदा, कभी हो ना जुदा
दम से है तेरे ये रोशनी
ही पोरी कोना ची
इसकी अदा मेरा दिल ले गई
ही पोरी कोना ची
गल्यान सांखली सोन्या ची,       
ही पोरी कोना ची......




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...