स्वावलंबन...!
बऱ्याच दिवसांपासून Social sites वर एक लेख फिरत आहे. त्याची लिंक मी
माझ्या लेखा सोबत जोडत आहे. लेखकाचे नाव माहित नसल्यामुळे क्षमा असावी. आणि त्या लेखाच्या आधारावरच मी माझे
विचार मांडत आहे. आणि लेखाचा शेवट सौ.विद्या देशमुख यांच्या मदतीने केला आहे.
https://www.facebook.com/JagtapRajashri12/posts/1916679241966043
https://www.facebook.com/JagtapRajashri12/posts/1916679241966043
नवऱ्याला त्याच्या चुकीच्या गोष्टी
लक्षात येण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा “श्रीनिवास” होण्याइतपत वेळ कधीच येऊ नये. कारण
याचा त्रास शेवटी त्या स्त्री लाच भोगावा लागणार आहे. आणि अशा काही परीस्थितीतील
महिलांमध्ये प्रत्येक स्त्री ला अण्णय्या (मोठा भाऊ) सारखी मदत मिळेलच का.? आणि ती
मदत किती काळासाठी असते..? शेवटी आयुष्य हे एकटीलाच जगाव लागेल ना..! त्यातला
त्यात मुलांची जबादारी असेल तर अशा स्त्री ने किती खंबीर व्हायला हव. त्यासाठी
तिने दुसर्यावर किती अवलंबून राहायचं.? हे ठरवलं पाहिजे. मनातील अशी काही भीतीच स्त्री
ला कणखर बनवू शकते. हे कणखर बनण स्त्रीनेच अवघड करून ठेवलेल आहे. हल्ली बऱ्याच स्त्रीया
या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. अगदी सगळ्याच क्षेत्रात नैपुण्य मिळवून. परंतु
त्याच बरोबर एवढी दुनिया बदलून देखील बऱ्याच अशा स्त्रिया आहेत, ज्या आजही नवऱ्यावर
अवलंबून राहतात. मला त्या स्त्रियांवर फारच दया येते. कारण त्यांची, कारण देखील अगदी
हास्यास्पद असतात. एखाद मुल-बाळ झालेलं असत, आणि त्याच्या जबाबदारीलाच त्या एक
अडचण म्हणून बघू लागतात. सगळ काही खापर त्या बळावर फोडायचं त्या मुला कडे बघण्याचा
दृष्टीकोनच त्यांचा असा काहि होतो कि...,,, ‘नाही ग’... हिच्या/याच्या मुळे कुठे
काय करायला जमत हिला सांभाळण्यातच सारा दिवस निघून जातो बघ.. उठल्यापासून सर्व
आवरासावर करून नवऱ्याच करायचं मग हिची तयारी करून शाळेला पाठवलं कि ती येई पर्यंत
घर आवरून स्वयंपाक आवरून होतंय नाही कुठे तर पुन्हा तिला जेऊ घाला तिचा अभ्यास
घ्या, झोपवा यातच पूर्ण दिवस जातो बघ. इच्छा आशून देखील नाही जमत ग काही करायला, वेळ
कसा निघून जातो हे अजिबातच कळत नाही....
‘असा काही यांचा ठेका असतो. मी विचार
करते, यांना स्वतःच्या आयुष्या विषयी किंवा मुलांच्या भविष्याविषयी खरच कधी भीती
वाटत नाही का...? मला तर हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. जुन्या पिढीतील काही स्त्रियांची
तुलना करत जर बघितलं तर त्यांना चूल आणि मुल या पलीकडे जास्त काही विचार करण्याची
परवानगी नव्हती, पण आता तर तस काही नाही स्वतःला जे हव ते आपण करू शकतो, आपले छंद
आपण निवडू शकतो. आणि त्या आधारावरच स्वतःच्या पायावर उभ राहू शकतो. स्वतःच स्वतःला
सक्षम बनवू शकतो. मग का..? आजही हि परिस्थिती समाजात येते बरं... का? ही श्रीनिवास
च्या बायको सारखी अवस्था आजही स्त्रियांची होते.
अग...अ..., हेच स्त्री स्वतंत्र
मिळवून देण्यासाठी जगात कित्तेक लोकांनी कशा-कशा प्रकारे धडपड केली आहे हे काही तुला
नव्याने सांगायला हवय का..? आणि आज तू त्याच स्वातंत्र्याला मुलाच्या काही
जबाबदारीच्या नावाखाली दडून टाकतेय. स्वतःच्या हक्कासाठी स्त्री आजवर लढत आली. आणि
आज ती मिळाली आहेत, तर आपण पुन्हा तिला माघारी घेऊन जातोय. काही स्त्रिया तर नवरा
चांगला कमावता आहे, त्याची चांगली पोस्ट आहे याच समाधान मानून मला काय गरज काही
काम, नौकरी, बिजनेस करायची सरळ सरळ निर्लज्ज पणे नवऱ्याच्या जीवावर फक्त एन्जोय्यमेन्ट
चालू असते. मी अशा स्त्री ला विचारू इच्छिते तुला उद्या कधीही हा प्रश्न पडणार
नाही का ग?, कि तू आयुष्यात काय केल..? तुझी स्वतःची ओळख काय..? तुझ आत्मिक
परीक्षण कधी करत नाही का ग तू?....! नवऱ्याच्या जीवावर खरोखरच आयुष्य किती बळकट
करू शकतो आपण..?.. त्याच्याकडून Life secure करण्यासाठी काही गोष्टी त्याच्याच
जीवावर आपल्या कलेने करुनही घेऊ शकतो. बस्स... कारण श्रीनिवास सारख वागणारा पुरुष
हा कधीच बदलू शकत नाही. बायको पासून आपले व्यवहार लपवून ठेवणे, तिला आपल्या
निर्णयात सामील करून न घेणे हि एक प्रकारची त्यांची मनोरुत्ती झालेली असते, बहुतेक
वेळेला काही कारण नसताना ते अशा प्रकारे वागतात. मग आपण खरच अशा व्यक्ती वर किती विश्वास
ठेऊ शकतो..? ते कितपत योग्य आहे..? अशा माणसाकडून कडून तो बदलण्याची अपेक्षा ठेवण
बरोबर आहे का..? अण्णय्या सारख्या माणसाला
आपली चूक लक्षात आली पण सगळ्याच पुरुषांना ती लक्षात येत नाही. त्यांनी ती अनुभवली
श्रीनिवास च्या बायको मध्ये आपल्या बायको ची परिस्थिती त्यांना दिसली म्हणून
त्यांचे विचार बदलले परंतु काही पुरुष फारच निगर गठ्ठ असतात. त्यांना हे सगळे
विचार देखील कधी भीती घालू शकत नाही. ते आपल्याच जोमात पुढे चालत असतात.
याकरताच स्त्रियांनी कोणावरही अवलंबून न
राहता स्वतःच्या भविष्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. नौकरी करा, बिसनेस करा, काही
ना काही उद्योग करतच रहाव ज्याने कधीही स्वतःवर कुठल्याही प्रकारची वेळ आली तरी ती
निभावतांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे. भावनिक त्रास हा कधीच कुणीच कुणाचा कमी
करू शकत नाही, पण प्रत्यक्ष व्यवहारातील त्रास हा स्वतःच स्वतःचा कमी केला जाऊ
शकतो. पुरुष कधीही नौकरी शिवाय राहू शकत नाही, त्याचं आयुष्य कमविण्यापलीकडे नसतच,
मग ती इज्जत असो, पैसा असो कि नाव असो.. त्यांनी कधी स्वतःच्या करीयर ला दुय्यम
स्थान देताना पाहिलंय का..? बोलताना लाख बोलतील हो,. “काय फरक पडतो बायको ने काम
केल आणि नवऱ्याने घर सांभाळल तर,..!” पण सत्य परीस्थिती पाहता ते खरच हि गोष्ट
स्वीकारतील का..? नाही स्वीकारणार ते... कारण त्यांचा तो स्वाभिमान आहे, मग
स्त्रियांनी का स्वतःच्या करीयर ला दुयय्म स्थान देऊन ठेवलय. वेळ असेल तर, जमल तर,
जास्त शिक्षण असेल तर, काही-काही समर्थन(सपोर्ट) असेल तर.., का अशा अशाप्रकारची
करणे देऊन स्वतःच नुकसान करून स्वतःलाच दुय्यम स्थानी ठेवलंय..
कुणाचे आयुष्य किती असेल यावर कुणीच
काहीच मत मांडू शकत नाही. आणि आपल्यावर वाईट वेळ येईल त्यासाठी स्वतःच्या पायावर
उभ राहू हि संकल्पान देखील चुकीची आहे. हा विचार येण्याआधीच स्वतःला एक महत्वाच
स्थान देण हे आपल्याच हातात आहे. आजच्या दिवसात बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी
ह्या सगळ्या गोष्टी हयातीत नसतातच मुळात हे सिद्ध करून स्त्री जातीला एक मानाचा
दर्जा प्राप्त करून दिलाय. त्यात आपल काय मोलाच सहकार्य आहे हे ठरवाव कि आपण
खरोखरच कुणाच तरी ओझं आहोत...? स्त्री जातीला एवढही झुकवू नकोस ग, कि नवरेशाहीची
हुकुमत आपल्यावर राहील.
सांगायचा उद्देश
एवढच कि प्रत्येक स्त्री ने “स्वावलंबी” रहाव....
कुणाचे आयुष्य किती असेल यावर कुणीच
काहीच मत मांडू शकत नाही. आणि आपल्यावर वाईट वेळ येईल त्यासाठी स्वतःच्या पायावर
उभ राहू हि संकल्पान देखील चुकीची आहे. हा विचार येण्याआधीच स्वतःला एक महत्वाच
स्थान देण हे आपल्याच हातात आहे.आणि
श्रीनिवास
सारख्या पुरुषांची मानसिकता बदलायला हवीय .
स्त्रीयांना जरीही पुरूष ,पती म्हणून सर्व सुखसोयी देवू शकत असेल तरीही तिला स्वतःच्या पायावर
उभं रहाण्यास उद्युक्त करायला हवंय.
स्त्रीयांना मानसिकदृष्टीने अधु अपंग करून
भविष्यातील संकटांना तोंड देण्यापासून रोखण्याचं कामच जणू श्रीनिवास सारखे स्वतःला
सर्वेसर्वा समजणारे पुरुष करतात.
अशावेळी अशी मानसिक दृष्टीने खचलेली स्त्री
भविष्यातील अंधार मार्ग पाहून खचून जाऊन कुठलेही वेडेवाकडे पाऊल उचलू शकते .अचानक
उद्भवलेल्या संकटात तिच्यातील तोकडा आत्मविश्वास आणि हतबलता याला श्रीनिवाससारख्या
पुरुषाचं अतीप्रेम व अवाजवी आत्मविश्वास हाच कारणीभूत ठरतो
प्रत्येक विवाहित स्त्री व पुरुषाने आपला
जोडीदार आयुष्यभर आपली सोबत करेलच अशा भोळ्या समजुतीमधे राहू नये.
श्रीनिवासने
जर सुरूवातीपासूनच सर्व व्यवहार विषयक माहितीत पारदर्शकता ठेवली असती तर त्याच्या
पत्नीला नंतरच्या मनस्तापाला समोर जावं लागलं नसतं.
आपल्या जोडीदाराच्या मतांचा आदर आणि
एकमेकांचे सर्व व्यवहार यामध्ये मोकळेपणाने चर्चा व्हायलाच हवी.
श्रीनिवाससारखी
माणसं बेभान होऊन जगतात आणि बेसावध क्षणी काळ त्यांचा घात करतो.
या साऱ्यात अत्यंत जवळची व्यक्ती दुखावली
जातेय..जाईल , होरपळली जाइल याचे भान ही त्यांना नसते
ही फार मोठी गोष्ट आहे.
राजश्री जगताप.....

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा