मुख्य सामग्रीवर वगळा

26/11/2008


26/11/2008

          “ताज हॉटेलच्या” पाठीमागेच “कुलाबा पोलीचे स्टेशन”, त्यालाच लागून “पोलीस लाईन” च्या बिल्डींग मध्ये आम्ही राहत होतो. कुलाब्यातील “ओम कंप्यूटर इंनस्टीट्युट” मध्ये “ऑटो कॅड” चा माझा कोर्स ८ ते ९ च्या ब्याच मध्ये चालू होता. क्लास सुटला पाच मिनिटे बाहेर हाय-बाय झाले. ९.१५ पर्यंत मी घरी पोहचले. नुकतेच जेवण आटोपले आणि भांडी घासायला निघाले तोपर्यंत एका मित्राचा मेसेज आला. कुठे आहेस? बाहेर जाऊ नको? म्हंटल, घ्या...! मुलांशी जरा मैत्री केली नाहीकुठे तर लगेच... मी कानाडोळा करत आपली निघाले माझ्या कामाला. तर फोन आला. उचलून जरा दारात गेले बोलायला तर पुन्हा तेच.. बाहेर कुठे जाऊ नकोस, डोक फिरलंय का?, अग तस नाही..., आपण आता जिथे उभे होतो तिथून तुम्ही मुली गेलात आणि तिथे गोळीबार झाला. मला काहीच कळाल नाही., म्हणजे? म्हणजे अग..! कुलाब्या मध्ये फायरिंग होत आहे.. अगदी आपल्या क्लासच्याच बाहेर., नरीमन हाउस मधून... बापरे....!... मग तुम्ही लोक कुठे आहात आम्ही क्लास मध्ये पळालो. आता घरी जाता येणार नाही. ठीक आहे काळजी घ्या सर्व, फोन करत रहा. तसाच फोन ठेवला, बातम्या लावल्या तेव्हा कळाले बॉम्ब हल्ला, फायरिंग सुरु आहे, संपूर्ण कुलाबा परिसर हादरून गेले. काही कळायला मार्ग नव्हता बातम्या पूर्ण सांगत नव्हते, आधी भावाला शोधायला गेले, बाहेरच खेळत होता. तोही तिथून घाबरून ओरडत, रडत आला.

        १ नोव्हेंबरला पप्पांची बदली बुलढाणा येथे झाली होती. आणि आम्ही चौघे शालेय वर्ष चालू असल्याने मुंबईतच होतो. त्यामुळे तेही फोन-वर-फोन करू लागले. ९.३० किंवा त्याआधीपासूनच मुंबईत जी दहशत माजली होती ती भयंकर होती. “ताज प्यालेस टावर, ओबेरॉय त्रीडेंन्त हॉटेल, हॉटेल लिओपोल्ड, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, सेंट झेवियर्स कॉलेज, माझगाव, विलेपार्ले इत्यादी ठिकाणी दहशत पसरली होती. संपूर्ण मुंबई विस्कळीत झाली. गोळीबाराच्या आवाजाने कानठळ्या बसत होत्या. सगळ्या नातेवायकांचे फोन-वर-फोन, आमची पोलीस लाईन असल्यामुळे चार माळ्याच्या १६० खोल्यांमध्ये फक्त आणि फक्त स्त्रिया आणि लहान मुलेच होते. कारण सगळ्या पोलीस वाल्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचा हुकुम होता. अगदी ज्यांनी डे केलीय, ज्यांची सुट्टी आहे, आजारी आहे अशे सगळे..सगळे....सगळे.... पोलीस हजर..... अकरा वाजेपर्यंत आम्ही बिल्डींग च्या गच्चीत जाऊन बघत होतो, अक्षरशा "ताज" जळतोय पाहून आरडाओरडा सुरु होता. त्याच्याकडे बघून रडत होतो. “शानदार ताज” ची आज हि अशी अवस्था बघवत नव्हती... भीषण आग पेटलेली होती, आगीचे लोळ उठत होते. त्याचे काही पत्रे वगैरे जोरात उंच उडून पडत होते. अगदी जवळून बघितलेली हि घटना मन खिन्न करून टाकत होती. आमची पूर्ण बिल्डींग गच्चीत जमा झालेली होती. आकाशाकडे पहिले तर मोठ्या प्रमाणत हेलीकॉप्टर फिरत होते. पप्पांचे फोन सारखे चालु होते. त्यांनी सांगितले घरातून बाहेर जाऊ नका. गच्चीतही जाऊ नका. कारण जे हेलीकॉप्टर फिरत आहेत ते नेमके आपलेच आहेत कि आतंकवाद्यांचे? हे आपल्याला माहित नाही, हेलीकॉप्टर मधून देखील बॉम्ब हल्ले होऊ शकतात. तर घरातच बसा, काही होणार नाही. सगळ काही कंट्रोल मध्ये येईल. आमची काळजी करून त्यांचा जीव तुटत होता. आज जर ते कुलाब्यात असते, तर त्यांना आम्ही कोणत्या परिस्थितीत आहे याची काही चिंता वाटली नसती, कारण ते स्वतःच त्या बंदोबस्त मध्ये हजर असते. तेव्हा आपल्या कुटुंबाचा विचार कादापही ह्या पोलीसवाल्यांना येत असेल. “शरीरावर खाकी वर्दी चढवली कि तो माणूस कुणाचा कोण लागतो याला काहीच महत्व उरत नाही”. आणि असे फक्त पोलिसच नाही, तर आर्मी, नेव्ही, कमांडो, फायर ब्रिगेड... ह्या सगळ्याच लष्कराबद्दल आहे. पप्पांनी आम्हाला सांगितले होते कदाचित टी.व्ही. फोन लाईट सगळच बंद होईल घाबरून जायच नाही. सकाळ व्हायची वाट पहायची....! आणि खरच तसच झाले सगळ काही बंद पडले तसहि टी.व्ही, वरील बातम्या सांगणे बंद केलेले होते. कारण टेररीस्ट लोकांना त्यातून मदत मिळत होती. कुठे-कुठे सुरक्षा दल पोहचलेत, काय-काय बंदोबस्त सुरु आहे याची त्यांना माहिती मिळू लागली होती. त्यामुळे हे सगळ बंद करणे फारच गरजेचे होते. संपूर्ण मुंबई बंद पडली. भाऊ घाबरून रडत पप्पा-पप्पा करत रडत होता, तो मला गुपचूप म्हणाला दीदी बर झाल ना?, आपले पप्पा इथे नाहीत, ते लांब आहेत सेफ आहेत ना?, नाहीतर त्यांना पण कामावर जाव लागल असत नाआआ...! ए..! शू.शू..शू... अस नाही बोलू, कामावर गेलेले, ते सगळ्यांचेच पप्पा आहेत ना?, त्याला अजून रडायला आले. मम्मीने आम्हा तिघांना जवळ घेतल आणि सांगितलं जर आपल्यापैकी कोणालाही काही झाल तरी घाबरायचं नाही. आणि मला काही झाल तर पप्पा येई पर्यंत तिघांनी एकत्र राहायच. कुठे किती बॉम्ब हल्ले, फायरिंग होईल काही माहित नाही. काही झाल तरी एकमेकांना शोधायचं. रडत बसून घाबरायचं नाही... आणि तेव्हा पासून आम्ही जे रडायला लागलो..... ते ३,४ वाजेपर्यंत आम्ही जास्तच घाबरलेलो होतो. कारण त्या शब्दांच दृश्य फारच भयानक वाटू लागल, त्याची तीव्रता जाणवू लागली. त्या रात्रीत कुणाच्याही डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. अडीच तीनच्या दरम्यान बहुतेक फायरिंग चा आवाज बंद झालेला होता. दुसऱ्या दिवसापासून बातम्या पाहायला सुरुवात झाली तेव्हा कळाल कि आपण तर फक्त घाबरलोच होतो. चिंतेत होतो, रडत होतो. परंतु बाहेर लोकांचे काय हाल झाले. संपूर्ण लष्कर प्राण पणाला लावून लढत होते. आपण अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे घाबरत होतो. परंतु ह्या सगळ्या लोकांची काय अवस्था झालेली ते हळूहळू ऐकायला पाहायला भेटू लागल.

        त्यात आमचा शनिवारी टायपिंग चा पेपर होता. माझा मराठी टायपिंग४०WPM असल्यामुळे मला माझी चार महिन्याची मेहनत वायाला घालवायची नव्हती. मला कुठल्याही परीस्थित जाणेच होते. परीक्षेच्या दिवशी सेंटर मधून फोन आले आम्ही आलो आहोत, तुम्हाला जर यायचेच असेल तर येऊ शकता परंतु आपल्या-आपल्या जबाबदारीवर यावे.. गाड्या खूप कमी आहेत. विचारपूर्वक यावे, नसेल जमणार तर येण्याचा ओढा करू नये. जे येणार नाहीत त्यांना पुढच्या परीक्षेला विनामूल्य बसता येईल. पण पुन्हा चार पाच महिने टायपिंग आणि तीच? नको!, जायच म्हंटल. रस्त्यावर अगदीच कुणीच नसेल तर, परत येऊ पण जायला काय हरकत आहे. खाली जाऊन सिग्नल पर्यंत जाऊया वाटल्यास परतीच बघू...! घरातून मम्मीला सांगितलं मैत्रिणी आहेत २,३.. ओरडा खाऊन निघाले. संपूर्ण रस्ता पोलिसांनी भरलेला होता. सगळ्यांची चौकशी केल्याशिवाय कुणालाही सोडत नव्हते. एल्फिन्स्टन कॉलेज पासून ट्याक्सी चालू होती. पण पैसे वाढवून. आणि खूप कमी. मी काही कुठेच घाबरले नाही. इलेक्ट्रिक हाऊस पासून एल्फिन्स्टन कॉलेज पर्यंत बिनधास्त गेले पेपर दिला आणि पुन्हा तिप्पट पैसे देऊन ट्याक्सी केली. घरी आल्यावर पप्पांना सांगितलं, तर ते हसून म्हणाले बहादूर....बाई.!... परत अस करू नकोस...

        सगळ शांत झाल्यवर लक्षात आले, आपल्याला तर कुठल्याच वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले नाही. आपण सुरक्षित होतो. सामोरे गेले ते लोक जे त्या-त्या ठिकाणी होते. मुंबई दोन, दिन दिवसात अगदी सुरळीत सुरु झाली. मुंबई कर घाबरणारे नाहीत. ते कुठल्याही परिस्थितीत थांबत नाहीत. याचा अजून एक मोठ्ठा पुरावा म्हणजे हे दिवस...

        लढणाऱ्या पोलीस, आर्मी, नेव्ही, नेशनल सिक्योरिटी गार्ड, एंटी टेरेरीसम स्क्वाड, मरीन कमांडो फोर्स, मुंबई फायर ब्रिगेड... यातील संपूर्ण लष्करला तसेच ह्या वाईट रात्रीला सामोरे गेलेल्या जनतेला “सलाम”.... कुणाचेही नाव यासाठीच घेणे मला योग्य वाटत नाही. कारण इथे कुणीही लहान किंवा मोठ्ठा अशी पदवी देण्यासारखी गोष्ट नाही. कारण खरच आपल्यालाला सगळ्यांचीच नाव माहिती असतील असे नाही.

        सगळ्याच पोलिसांच्या रजा बंद असल्याकारणाने १५ दिवसाने पप्पा घरी आले, आल्यावर आमची चर्चा झाली. पप्पांची बदली दुसऱ्या शहरात झाली होती, तरीदेखील आम्ही शिक्षणासाठी मुंबईतच राहणार होतो. पण ह्या दुर्घटनेमुळे मम्मी-पप्पांनी विचार बदलवला. आणि वार्षिक परीक्षा आटोपताच आमची उचल बांगडी नाशिक शहरात केली, जी मला अजिबात मान्य नव्हती....  
     
“अशी हि काळरात्र ओसरली परंतु, तिचे निशाण मात्र अनेकांच्या आयुष्यात ठेवून गेली”.....

        आता या सगळ्या नंतर सगळ्यात जास्त राग येतो तो म्हणजे समाजातील त्या लोकांचा जे त्यांच्या दीड दमडीच्या नोकरीत--ऑफिसात--मोठ्या ऐटीत--खुडचीत बसून फुशारक्या मारतात, कि पोलीस असे, पोलीस तसे, सगळीकडे उशिरा पोहचतात...अस म्हणणाऱ्या “भाडखावांनो” तुमचा बाप अशा ठिकाणी का नाही गेला मग.......... यांची काडीची लायकी नसते, पण पोलिसांना वाट्टेल तस बोलतात.... अशा लोकांनी आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाचा थोडातरी विचार करून बोलाव....

जय हिंद.....!
राजश्री जगताप....

फोटोज गुगल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...