मुख्य सामग्रीवर वगळा

Beuty_Spot....!

Beuty_Spot....! 

               
                       डोंबिवलीत मातृमंदिर होस्टेल वर राहत होते, रात्रीचे आठ वाजले होतेमुसळधार पाऊस पडत होता. तेव्हढ्या पावसात म्याडमच्या घरी तक्रार घेऊन गेले होते. मुलींच्या रूम मध्ये पाणी गळत होत. पण पुढाकार कोणी घेत नव्हत. मीच गेले जायला अर्धा तास लागला. घर पण मोठ्या मुश्किलिवर सापडल. डोंबिवली फारच वर्दळीच ठिकाण. शेवटी कसतरी पोहचले. जाऊन तिने मला एक तासाला जास्त वेळ   बसवल. आणि काही कामत वगैरे नव्हती ती... फोन वर बोलली, नंतर कुणीतरी आले 20, 25 मिनिटे फॉरेन च्या गोष्टी चालल्या होत्या. त्यांच्या बोलण्याकडे माझ काही लक्ष्य नव्हत कारण पावणे दहा वाजले होते मला पुन्हा एवढ्या लांब परतायच होत आणि त्यातल्यात्यात रास्तेही माहित नव्हते. तीच मला फार आश्चर्य वाटल. तरी राग मात्र आलेला नव्हता. कारण होस्टेलवर मूली खरच त्रास फार सहन करत होत्या. शेवटी तासाभरा नंतर ती माझ्यासोबत बोलली माझ सगळ ऐकून घेतल आणि त्यावर इतक्या उद्धटपणे उत्तरली कि मला रडू येऊ लागल कारण मोठ्या उम्मेदिने मी एवढा वेळ बसले होते. तीच म्हणणे होत कि आम्ही देणग्या मागाव्यात. माझ मत होत तुम्ही संस्थेच्या होस्टेल च्या फिया वाढवा आम्ही द्यायला तयार आहोत. मुलींना नोकरी करुण अभ्यास करावा लागतो. तर एवढा वेळ मिळत नाही. पण एवढ बोलून सुद्धा तिने बरोबर गप्प केल. तेव्हा मला कुणालाही उलट बोलता येत नव्हते.  उदया आपटे बाईना सांगते म्हणाली आणि मी एकदा येते होस्टेल वर येते. बघू काय करायच ते. आणि मी तिथुन एवढी निघाले कि मला काही सुचत नव्हत. केवळ हया विचरणांनी कि कुणी अस सुद्धा वागु शकते का? यांच्यावर मुलींची एवढी जबाबदारी असतांना हे अस कसे बोलू शकतात. विचरांच थैमान माजल होत. दहा वाजले रिक्शा मिळत नव्हती. 15,20मिनिटे भटकले तेव्हा मिळाली ती पण स्पेशल करावी लागली. रिक्शात बसल्या बसल्या खुप रडले. पप्पांना फोन केला. तर ते म्हणाले संस्था चालवणारी लोक असेच असतात. तू सोबत कुणालाही नेल नाहीस. कुणी आलेल नव्हत होस्टेल वर मग निघाले मीच. वेळ किती झालाय काही गरज नव्हती तुला जायची. काही नाही पप्पा मी पोहचेल बरोबर. त्यात संस्थेच्या लोकांविषयी बरच काही मला माहिती झाले. रिक्शातुन उतरले. पाऊस म्हणतो मी. डोंबिवलीत ईतक पाणी भरलेल होत. 11.30 ला पोहचले आले कडक पाण्याने अंघोळ केली. जेवण करायची इच्छा नव्हती. पायाच्या नखांमध्ये माती अडकलेली. आजूबाजूला पाहिल तर कम्पोस कर्कटक डिसल घेतल आणि नख कोरले. त्याच विचारात अजूनही होते मी कर्कटक जोरात अंगट्याच्या नखात गेल. आणि बोट रक्त बंबाळ झाल. फार कळवळले रडले, खुप वाइट दिवस गेल्यासारख वाटल. तसच बोट करकसुन बांधल गोळी घेतली आणि झोपले. सकाळी कामावर गेले पण मला खुप यातना होत होत्या बारा वाजेपर्यंत सहन केल. मैत्रीण क्लिनिक मध्ये नोकरीला होती तिला फोन केला ती म्हणाली मी तुझ्यासाठी लवकर क्लिनिक उघडते ये तू पण डॉक्टर 2 नंतर येतील. सरांना विनंती केली आणि 1 पर्यंत पोहचले तिहि तिथे पोहचली. बांधलेल बोट सोडतासोडता काय हे? काही करत असते तू...! लहान आहेस का कळत नाही तुला एवढ्या प्रेमाने बोलली माझ अर्ध दुखन कमी झाल . सर येईपर्यंत आम्ही छान गप्पा मारल्या. सर आल्यावर पुन्हा त्यांनी बोटाच क्लीनिंग केल माझ्या उजव्या पायाच्या अंगठयावर जिथे लागलेल त्याशेजारीच छानसा "Beuty Spot aahe". हे पण लागलय का? दोघी एकदम उत्तरलो नाही सर "तीळ" आहे. Ohhhh Beuty Spot?..., विदेश दौरा आहे बर.अं....! आम्ही दोघीही खुश होऊन हसलो. या काही सेकंदात मिनिटांत माझ बोट अजिबात दुखल नाही मी चक्क दुखन विसरून गेले.
आणि आज मी विदेश दौराच नाही तर, विदेशात राहते. त्याचबरोबर आता नवऱ्यासोबत विमानात बसले "होकाइदो" शहरात जाण्यासाठी. लग्न ठरल्या वेळी आणि जेव्हाही विमान प्रवास करते म्हणजे एरवी सुद्धा बर.. पूनम आणि सरांची ची आठवण येते.. कुणाच्या तरी मुखतले बोल आपल्या आयुष्यासाठी चांगले ठरले याची जाणीव काही औरच आहे. डॉ. शशांक मुळगावकर नाव त्यांच चरणी रोड गायवाडी
आणि त्या गेलेल्या वाईट दिवसाची तर नेहमीच त्यामुळे मी असाच विचार करते कुठली वाईट वेळ ही भविष्यासाठी चांगली ठरु शकते सांगता येत नाही. त्यामुळे जिंदगी के मजे लेलो भाई लोग.... चलो फ्लाईट टेक ऑफ होतेय बाय-बाय 🙋🏻‍♀️🙋🏻‍♀️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...