मुख्य सामग्रीवर वगळा

हिल्सा_फिश_करी...

हिल्सा_फिश_करी....


        हिल्सा हा मासा पश्चिम बंगाल मधील लोकांचा सर्वात लोकप्रिय मासा आहे. आसाम, त्रिपुरा मध्ये देखील हा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. आपल्या महाराष्ट्रात हा मासा आहे कि नाही मला याची काही कल्पना नाही किंवा त्याच नाव काय आहे तेही मला माहित नाही. जपान मध्ये बंगाली कम्युनिटी फार मोठी आहे. त्यांनी हिल्सा मासे संपूर्ण समूहाने एकत्रित मागवले होते. यजमानांच्या मित्राने सहज विचारले तुम्ही घेणार का? मी काही मासे खात नाही. पण, माझ्या बायकोला आवडतात, माझ्यामुळे तिला खायला मिळत नाही. तर तिला विचारतो. मी आपल सहज सहाच्या दरम्यान फोन केला, जेवण काय बनवू? तर त्यांना अस शॉक लागल्यासारखं आठवलं. मीही हसले.. आणा म्हंटल तोपर्यंत मी भात, चपाती, सलाड, किवी ज्यूस वगैरे बनवून ठेवते. एखाद ज्यूस, व्हेजिटेबल सलाड किंवा फ्रुट सलाड मी रोजच्या जेवणात बनवतेच. मासा घरी येई पर्यंत सगळा स्वयंपाक तर झालाच त्याबरोबर मसालाही तयार झालेला होता. म्हंटल आता हा साफ कसा करायचा?.. मी देतो थांब.. नको.ओ.ओ.. राहूदेत मी करते.. मनात विचार केला, हा.. “मी खाणार नाही” अस काही म्हणाला नाही, मग याने जर साफ केला तर.., नकोच आपणच करूया... आता मासा साफ करून बनवायची माझी पहिलीच वेळ होती. कारण घरी मम्मीच सगळ काही करायची आणि इथे आम्ही फक्त जपानीज “साल्मन” आणि “सुशी” याव्यतिरिक्त कुठलाच मासा आणलेला किंवा खाल्लेला नाही. हे मासे साफ करून, कापून पॅक केलेले मिळतात. तसही जपानीज लोक कच्चेच मासे खातात. मासा बराच मोठा असल्यामुळे मी जरा फोटो काढले, डोक आणि डोळे चाकूने कोरायला गेले तर. अगं.ग..ग...! खेळू नकोस त्याच्यासोबत, नको अस नको करूस अजिबात.. खाणार आहेस न?, मग त्याला मान-सन्मान दे...! ग्प्पप्प्प कुठही इमोशनल करू नकोस मला..  मोठा असल्यामुळे अर्धा फ्रीजर मध्ये, अर्धा करी. पण.,मला छान जमला साफ करून कापायला. आणि करी देखील खूप खूप चविष्ट झाली. अगदी जशी माझ्या जिभेवर माशाची जी चव रेंघाळत होती तशीच. आम्ही ठरवलेलं.. नाही चांगला लागला तर, लगेच बाहेर टाकायचा अजिबात विचार नाही करायचा कारण आजारी पडण्यापेक्षा हे चांगल . कुठलाही मांसाहार हा पाहिलांदा करतांना फार काळजी पूर्वक करायचा ह्या सुत्रानेच आम्ही जपानीज जेवण खाण्यास सुरुवात केली होती. रेसिपी मी माझ्या मनानेच बनवली. जे-जे साहित्य मला आवडत ते मी वापरल. पोट भर चार नाही, दहा घास जास्त जेवले मीच नाहीत तर यजमान सुद्धा आणि आहे तो संपवून पुन्हा मागवूया हे हि मी ऐकल मग काय...  घासपूस खाणारे माझे हे, आता चिकनच नाही तर मासे हि खाऊ लागले 
कटेरी मासा असल्यामुळे लहान बाळा सारखा मी त्यांना सोलून दिला. मी तर खूप खुश झाले.  शेवटी हि सुगरणीची कला हो.... 

साहित्य आणि कृती:-- 
हिल्सा मासा (नसल्यास दुसरा कोणताही आवडीचा), धने, जिरे, लवंग, दालचिनी, तेजपान, चक्रीफुल, अद्रक, लसून, खोबर, मीठ, कोकम, कांदा, टोमॅटो, तेल, लिंबू, कडीपत्ता, कोथिंबीर,
माशाला लिंबू आणि मीठ लावून मैरीनेट करत ठेवावा, तोपर्यंत सगळा गरम मसाला(खाडे मसाले) एकत्रित तेल न वापरता अद्रक, लसून आणि खोबऱ्याच्या तुकड्या सहित भाजून घ्यावे. खरपूस भाजल्यानंतर छानशी मीठ घालून पेस्ट करावी, आता मासे तेलात थोडेफार दोन्ही बाजूने तळून घ्यावे, जास्त नाही हलकेसे. त्याच तेलात कडीपत्ता, कांदा चांगला परतून घ्यावा मग टोमॅटो थोडा परतला कि कोकम आणि मसाल्याची पेस्ट घालावी. मीठ माशाला आणि पेस्ट मध्ये असल्यामुळे पुन्हा येथे वापरू नये. चांगली उकळी आली कि मासे अलगद करीमध्ये सोडावे. पुन्हा एक उकळी देऊन छानशी कोथिंबीर पसरवावी. आमच्याकडे कोथिंबीर कडीपत्ता नसल्यामुळे मी पुदिना वापरला. तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, भात आणि हो ब्रेड सोबतही हि करी खूप छान लागेल नक्कीच बनवून पहा... 
टीप:- मी लिंबू कोकम टोमॅटो तिन्ही वापरले सगळ्यांची चव वेगवेगळी असते, त्यामुळे करी अजून चटकदार होते. आपल्या सोई नुसार जे उपलब्ध असेल ते वापरावे. जास्त फोटोज नाही काढले करी कडे बघून भूक वाढत होती....😂😋

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...