अशी हि दिवाळी....!“दिवाळी” म्हणजे सगळ्यात भिकारडा सण, अशी काही मनोधारणा माझीबरीच वर्षे झाली होती.आमच्या घरात लहान पणापासूनच हे सगळ काही सुख छान आणि हव्या तेवढ्याप्रमाणात आम्हाला मिळत आल. म्हणजे फार काही हालाकीचे दिवस होते किंवा हे नाहीमिळालं, ते नाही मिळाल अशी काही फारशी तक्रार कधी मला कुणाकडे नव्हती.न वेळेकडून, न आपल्या माणसांकडून. हो त्या-त्या वयात मात्र सगळ्याच प्रकारचेअट्टहास केले. ‘तेव्हा काय एवढ समजत’? अस म्हणू शकतो. मी घरात एकटीचलहान असल्यामुळे माझे भयंकर लाड झाले.त्यातल्यात्यात आजी-आजोबांसोबत सोबत राहिले म्हंटल्यावर अजूनच लाडाची.सगळ्याच सणांचे आनंद लुटले. दिवाळी म्हंटल कि सगळ्याच प्रकारची मज्जाअनुभवास मिळाली. अगदी न चुकता दरवर्षी... पण शालेय जीवनातली एक दिवाळीमला आठवते. मम्मी पप्पांना पैशांची थोडीफार अडचण भासली होती.त्यावेळेस त्यांनी दागिने मोडून आमची दिवाळी साजरी केली होती. हे काही आम्हालामाहित नव्हत. आम्ही काय आमचे प्लान तयार केलेले होते. असा ड्रेस घ्यायचा,तशी तयारी करायची, हे फराळ बनवायचं ते फराळ बनवायचं, मम्मी ह्या वर्षी आपणअजून एक दोन फराळाचे आयटम बनवूयात नेहमी पेक्षा जास्त. मोठ्ठी दिवाळी करूया..ती काय सवयी प्रमाणे हो ला हो म्हणत असे. बाकी काय अडी-अडचणी आम्हालासांगत नसे. झाली, आली दिवाळी! सगळी शोप्पिंग, फराळ, रांगोळ्या, फटाके सगळमोठ्या दणक्यात सुरळीत झाल. त्यावर्षी आम्ही दोघींनी पटीयाला ड्रेस घेतले.खूप सुंदरहोते. राणी मुखर्जीचा बंटी और बबली यातून ती फॅशन प्रचलित झालेली. मोठ्याआनंदात दिवाळी साजरी झाली.जेवायला बसलो असता.. आता जशी दणक्यात दिवाळी झाली तसचदणक्यात अभ्यास करायचानाहीतरी एक-एकला असा दणक्यात हानील ना का बास रे बास....! आक्खी दिवाळीबाहेर काढेल तुमच्या तिघांची. आणि तू? ह्या तीन पोरांची आई, तू.. तू... जर त्यांच्याअभ्यासात लक्ष नाही दिल तर तुझापण चांगलाच अभ्यास घेईल... काय? हो, नक्की?का नुसत होच?... सांगितल का यांना तू? नाही.. नाही..! तर सांग मग आत्ता.. सांगातुम्हीच.. तोपर्यंत आम्ही तिघे एकमेकांकडे बघतोय. काय सांगणार आहेत हे आपल्याला?मोठी धाकधूक... हे तुमच्या हौसे साठी आम्ही काही दागिने मोडले आणि तुमची दिवाळीसाजरी केली. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा कि, याची जान मुलांना नेहमीअसावी,आणि त्याबदल्यात त्यांनी स्वतःहा त्यांच्या आयुष्यात नेहमी मेहनत करून यशस्वीव्हाव.. तर लक्षात घ्या सगळी सुख कमवावी लागतात. ती अपोआप आकाशातून पडतनाहीत. त्यासाठी हि सगळी तडजोड करावी लागते. आम्ही शांतपणे तिघे ऐकत होतो.फक्त एवढच करा अभ्यासात मेहनत करत रहा. बाकी मग, तुम्हाला तुमच्या आयुष्यातकुठलीही तडजोड करावी लागणार नाही.त्यांच्या ह्या वाक्याचा असर काही दिवस अथवा महिने असावा.पण खेळकर बुद्धी असल्याने.... ठीक आहे...काही वर्षांनी मात्र मी नोकरीला असतांना पप्पांनी सगळ्यांना स्ट्रीकलीसांगितलेलं, काही दिवाळी बिवाळी करायची नाही. कारण, मी मुंबईत होते सोनी-सोन्या,मम्मी नाशिक मध्ये, पप्पा अकोल्याला मग कुठे काय करायचं.?, कुणाला काही त्याचवाईट नव्हत वाटल, पण मी दिवाळीच्या दोन दिवस आधी घरी जात असतांना ठरवूनचगेले पप्पा बोलले तर बोलूदेत मी सर्वांना कपडे घेईल, मला बोनस छान झालेला होता.मम्मी ने संपूर्ण घराची साफसफाई आटोपलेली होती. मग मी तिला म्हंटल चल आपणसगळ्यांना कपडे आणूया आणि पप्पांना सरप्राईज देऊया. ती म्हंटली, अग दीदी त्यापेक्षाघरातल फाराळाच सामान आण.ना.!, माझे हात शांत बसत नाहीये गं....! मग तिलाविचारल किती लागतील तुला काही हजार म्हणाली. म्हंटल तेवढच न?, मग आहेत नमाझ्याकडे मला येवढा-येवढा बोनस झालेला आहे. आ.आ..आ... शहाणी मला सांगितलेनाहीस.? हा.हा..हा... मस्त सगळी तयारी आम्ही दोन दिवसात केली. आम्ही खुश झालोआणि पप्पांना याच तुम्ही असा आग्रह केला बघतो-बघतो करत करत त्यांनी सुट्टीमिळवलीच आणि बरोबर लक्ष्मीपुजन ला आले. आता खर आम्ही खुश झालो. आम्हीपप्पांना सगळ काही घाबरत-घाबरत दाखवल.त्यांना मी घेतलेला शर्ट पण इतका आवडला कि म्हणाले यावर प्यांट घालायची नसतेका?, हा.हा..हा... सगळ्यांनी सुटकेचे उसासे टाकले. आणि म्हणालो तुमची साईज माहितनव्हती ना, चला घेऊन येऊ. आता नको मी दमलोय उद्या जाऊ. मला म्हणाले तूच चलतुझी चॉइस छान आहे. खूप छान अशी कधीही न विसरता येणारी दिवाळी साजरी झाली.आणि दोन दिवसात सुट्या संपल्या. भाऊबिजेच्या दिवशीच मला पुन्हा जाव लागल.पप्पाही दुसऱ्या दिवशी निघणार होते. मोठ्या मुशकीलीवर मी माझ्या मनाला सावरलघरातून पाय काढायची अजिबात इच्छा होत नव्हती, आत्या, काका, भावंडे सगळे जमलेलेअसतांना मला निघायच म्हणजे माझ काळीज चिरत होत. पण नाविलाज होता. शेवटीमम्मी पप्पांनी त्यांच्या चेहऱ्यावर काही न दाखवता शब्दातून धीर दिला..ट्रेन मिळाली पण गाडीला तुफान मरणाची गर्दी, पाय ठेवायला देखील जागानव्हती. मी बारीक असल्यामुळे मला सीट मिळवण्यासाठी जास्त तसदी लागत नसे.स्लीपर वर जागा मिळाली. शरीराला जागा मिळाली पण मनाला मात्र थारा लागत नव्हता.मला खूप रडायला येत होत. खुप त्रास झाला. आजूबाजूला सगळे असल्यामुळे मनमोकळेपणाने रडता देखील येत नव्हत. प्रचंड गर्दीचा देखील त्रास होत होता. मला आयुष्यातीलसगळ्याच दिवाळ्या आठवू लागल्या. पण का कुणास ठाऊक मनाला टोचणाऱ्या त्याक्षणांनी पुढील प्रवासतील चार तासात माझ सणांबद्दलच बरचसं मत बदलून टाकल.मला सगळ काही दांभिक वाटू लागल. मी ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार करतगेले.आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केवळ ह्या सणांसाठी किती-किती मेहनतआजपर्यंत घेतलीय. कशा-कशा वेळा त्यांनी सुखकर रीतीने पार पाडल्या आणि आपल्यालात्याची जराही कल्पना येऊ दिली नाही. पप्पा पोलीस ऑफिसर असल्यामुळे कित्येक वर्षेतर त्यांच्या सोबत सण साजरे करायलाही मिळत नव्हते. दिवळी, दसरा, गणपतीकोणतेही सण असो त्यांचा चोवीस तास बंदोबस्त असायचा. एवढ्या भयंकर कामचस्वरूप सांभाळून ते घरीही फार छान लक्ष देतात. मम्मी तर दिवाळीच्या आठदिवसांपासूनच कामाला जुपलेली असायची. सुखासाठी किती झटतात न ह्या बायका..!?भांडी घर स्वच्छ असल तरी दिवाळी ह्या शब्दामुळे त्या एवढ जीवतोड काम करतात.कि सार काही घर लख्ह उजळवून टाकतात. आपण कधी विचार केलाय का याचा किह्या कामानंतर हाताची बोट फुटून निघतात, तळवे फणफण करतात, कंबर पाठ जामझालेली असते. त्यात शरीराला किती दुखापत होत असते. लागत-भागत पण ह्यासगळ्या गोष्टींकडे दूर लक्ष करून पुढच्या कामाची तयारीहि फार जोरदार सुरु असते.ती म्हणजे रात्रीची एक दोन पेनकिलर घ्यायची, खोबरल तेल दोन्ही हातांना चोळायच,कापलकुपलेल असेल तर एखाद ब्यान्डेज लावायचं झाल सगळ काही ठीक. कि उद्यापुन्हा कामाला नव्याने सुरवात. फराळाचा प्रत्येक पदार्थ हा फारच नाजूक असतो.सगळ्याच वस्तू तळून-भाजून, मोजून-मापून घ्यायच्या असतात. सगळे पदार्थ अगदीजीव लावून बनवावे लागतात. त्यात तीळ मात्रही चूक झाली तर सगळीच फेक झोक होते.बर एवढच नाही हं.... सगळ्याच पदार्थांचे आकार एक सारखेच आले पाहिजे, रंग हवातसाच भाजल्या-तळल्या गेला पाहिजे, तुटकी-फुटकी जडण-घडण अजिबात स्वीकार नसते.पण, मम्मी मात्र कधीही कशातही चुकत नाही. तीच दिवाळी फराळ, उन्हाळी फराळ,सगळ्याच प्रकारच जेवण हे फक्त चाविलाच नाही तर दिसायलाही अगदी सुरेखअसल्यामुळे ती यातही फार चोख रित्या काम करत असते. त्याचबरोबर छान-छानरांगोळ्या, कंदील बनविणे, सुरेख पणत्या बनविणे, फुल-तोरण, एखाद्या वर्षी घराला रंगदेणे, फटाके, पाहुण्यांची उठबस. अशी बरीच खूप खूप काम.आता हे सगळ काही माझ्या साठी नवीन नव्हत, लहानपणापासूनच आपण हेसगळ घराघरांत पाहत आलोय पण का कोण जाणे मला सगळ काही दुख:द वाटत होत.सगळा काही त्रास ताण मला ह्या विचारांत जाणवत होता. सगळ असह्य होत होते.काही चुकीच्या गोष्टीही आठवत होत्या जसे उदा:- बहुतेक लोकांच्या घरात सणासुदिचीचभांडण होत असतात. त्यात सगळ्यात जास्त मला वाईट वाटत होत ते त्या स्त्रीच जीराब राब राबून देखील तिला त्याचा मोबदला असा वाईट मिळतो. लक्ष्मीपूजन च्यादिवशीच एका शेजारील घरात कडाक्याच भांडण झाल, फराळाच्या ताटांची देवाणघेवाणसुरु होती. शेजारील काकू-मामी आल्या, देवाणघेवाणीच काम झालय मग निघायचं न.?,तर त्या बाई बद्दल टीका करायला सुरवात केली. त्यावर आमच्या मम्मी ने तिलाइतक छान उत्तर दिल. “अस कशाला बोलता हो? ती पण बिचारी आपल्या सोबतगेल्या आठदहा दिवसांपासून राबराब राबतेय. तिला तिच्या मेहनतीच फळ अशा प्रकारेमिळाले तर ह्यात तिची काय चूक आहे. थोडासा समजूतदारपणा जर घरातल्यांनीदाखवून हे सगळ टाळल असत तर ती बिचारी किती सुखावली असती.”? कधी-कधीवेळेची साथ असण सुद्धा गरजेच असत”... त्या टीका करणारीच मत चटकन क्षणार्धातबदलल.. हो...ओ..हो.हो... बरोबर बोलताय तुम्ही... मला त्या दुखः सोसणाऱ्या बाई पेक्षाजास्त ह्याच बाई वर दया आली.तर, थोडक्यात.! मला इथेही एक दुखद, वाईट क्षण आठवलेला होता.ह्या सगळ्या भावनिक दुःखात कळलच नाही दादर केव्हा आले. झोपेतून जागअल्याप्रमाणे मी हडबडून उठले. ब्यागा घेतल्या आणि धावपळ करत सेंन्ट्रल लाईनपासून वेस्टर्न लाईन घेतली दादर ते बॉम्बे सेंन्ट्रल फास्ट लोकल च्या दरवाजात उभीराहून ह्या नाशिक ते दादर मधील जे काही मनात विचारांनी थैमान घातल होत त्याचानिष्कर्ष लावला. आणि खर सांगते तो असा काही मनाला भावला. कि त्यावेळेसस्वताला देखील पटवून घ्यायला जड जात होत.तो म्हणजे “स्वतःच्या मनाने घरातील सुखाची उचललेली जबाबदारी”....! होय..........! हे कटू सत्य मलाही तेव्हा पचवने अवघड झाले होते. तस पाहता हि काही पहिलीच वेळ नव्हती माझी, परंतु ती मजेने घेतलेली जबाबदारी होती आणि आजची जबाबदारी खरोखरच खूप वेगळी वाटली.त्याच कारण असे कि, आपण कमवलेला पैसा, आपण घेतलेली मेहनत हि खर्च झालेलीहोती. त्याच क्षणाला कळाले, कि आई वडील मुलांना सुख देतांना त्यांना कोणत्याचरख्यातून पिळून निघावं लागत.वाचकहो.. मी काही एवढी मोठी गोष्ट केली नव्हती. पण तरी देखील मला त्यातून जरआयुष्याच मर्म लक्षात आला असेल. तर नक्कीच ती गोष्ट सगळ्यांसाठी मोठी आहे.आणि मनापासून अजून एक गोष्ट. तिथून पुढे मला कुणाहीसाठी कोणतीहीजबाबदार घेतांना कधीहि त्रास झाला नाही. ती मी स्व:खुशीने आनंदाने घेत आले.चार तासाच्या त्या दुख:द भावनिक प्रवासात मी माझ आयुष्य बदलवल. खऱ्या सुखाचीजाणीव त्या दिवशी झाली.तेव्हापासून मी कधीही कुठलेही सण फार काही आवडीने किंवा खूप धार्मिकतेनेही केलेनाहीत. फक्त माझा सभोवताल सुखावतोय यासठी करत आले. खूप महिलांची तक्रारअसते सणावाराला हे नाही, ते नाही. असंच नसत, तसच नसत. पण मी मात्रएकमेकांना भेटता यावे, एकमेकांतील गोडवा वाढावा, आपल्या सोबतनिस जो कुणीअसेल त्याला छान-छान पदार्थ खायला मिळावेत, आपल्या कडे असणार किंवाआपल्याला सहजासहजी देता येत असणार सुख-आनंद वाटणे, मुख्य आणि शेवटचम्हणजे आपल्या समाजसुधारकांच्या हेतूने चालण्यासाठी हे सगळे सण साजरे करते.यात कुठलीही श्रद्धा, अंधश्रद्धा, वा रूढी परंपरा चालवणे मला मान्य नाही.अशी काही दिवाळी मला साजरी करायला आवडते.राजश्री जगताप....
झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले..... २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा