#मनसोक्त_जगले....!
“असामी” हि मला एका इंडियन रेस्टोरेंट मध्ये भेटली होती. आमच जेवण झालेलं होत. आणि मस्त गप्पा सुरु असतांना हि माझ्या समोरील टेबल वरून उठून आली. आणि You are so Beutifull, your smile is very nice & cute अस म्हणून बोलायला सुरवात केली. ते पहिल्या भेटीतच आम्ही खूप जुन्या ओळखीच्या मैत्रिणी असल्यासारखं बोलू लागलो. माझा नवरा मात्र सुन्न होता. तो आमच्या सोबत मध्ये-मध्ये फक्त गालातल्या गालात हसत होता. आम्ही दोघी फेसबुक वर जोडल्या गेलो. आणि मग तिथून निघालो. मस्त आहे ना ती.? मी नवऱ्याला विचारल.. हो.. कुठली आहे?, काय माहित.., काय?? हो एवढ कुठे बोलली मी तिच्यासोबत?.. अरे...!, कमाल आहे तुम्हा मुलींची... एक तर पहिल्याच भेटीत एकदम सक्या-पक्या मैत्रिणी असल्यासारखं बोलता, वरून २०,२५ मिनिटे? कहर म्हणजे एवढ कुठे बोलली म्हणतेस?? आणि कुठली? काय? काहीच माहित नाही.. हो मग आता मला भेटली आणि ती स्वत:हून बोलायला आली ना? मग मी काय म्हणू ए बाई नको बोलूस माझ्यासोबत मी तुला ओळखत नाही अस...? माफी द्या ओ बाई मला तुम्ही, चुकलो मी.. चालुद्या तुमच... पण, राजू बी केअर फुल ऑलवेज या.या.. आय नो, डोंट वरी. घरी आल्यावर आमचे काही मेसेज झाले. आणि त्यात, येत्या बुधवारी भेटायचं ठरलं.
ती तिच्या कार ने मला घ्यायला घरी आली, मग काय कॉफी कॅफे मध्ये गेलो. तिथेचं गप्पा झाल्या त्यात ती म्हणाली मी बुद्धांना खूप मानते आमचा एक हॉल आहे तिथे तू येणार का? हो मीही बुद्धिष्ट आहे मलाही फार आवडेल. हे ऐकून तिला आश्चर्य वाटल. तिथे जाऊन मला जपानीज मध्ये बुद्ध वंदना घ्यायला मिळाली. तिने तस त्याचा अर्थ समजावला मला. नंतर घरी हि सोडवल. तिच्या बोलण्यातून मला माहित झाल होत कि तिला इंडीयन जेवण खूप आवडते, मग पुढील भेटही ठरली त्यात तिला जेवायला बोलावले. जेवण झ्याल्यावर मस्त शोप्पिंग ला गेलो. येतांना बुद्ध वंदनाहि घेऊन आलो. अशा प्रकारे आमची मैत्री वाढत गेली. आम्ही नेहमी एकमेकींना प्रत्येक मेसेजच वेळोवेळी उत्तर देत असतो. त्यामुळे कुठलीही मदत एकमेकिंकडून घेता येते. आणि मी विदेशात असतांना माझ्यासाठी हि खूपच मोलाची गोष्ट आहे. माणस जोडता आली पाहिजे, एवढच उद्धिष्ट हो.. पण, तीही आपल्या सारखी मनमोकळी असावीत. बाकी कधीही कोणतीही अडचण येत नाही.
मागच्या महिन्यातील गोष्ट आहे. माझ्या ह्यांना ऑस्ट्रेलियाला जाण्याचे आमंत्रण आले. लगेच फोन करून मला कळवले. आणि आपण दोघांनी जाऊयात म्हणाले. मीही खूप खुश झाले. पण दोघांचा विझा मिळणे थोड कठीण आहे अस ते म्हणाले, तरी पण बघू मी दोघांसाठी प्रयत्न करतो. चार दिवसांनी कळाले त्यांचा विझा मोठ्या मुशकीलीवर मिळाला तर मिळेल. आम्ही दोघेही थोडे दुखी झालो. दोघांचेही डोळे भरले. मी येणार...च... म्हणून रडू लागले... तू मुद्दाम मला नेत नाहीस, तुझे पैसे खर्च होतील ना? म्हणून माहित आहे मला... खोटारड्या... जा मी बोलणारच नाही तुझ्याशी..... मी इथे एकटी कशी राहणार? मला किती कंटाळा येतो मागे तू चार दिवस नव्हतास तेव्हा मी आजारी पण झालेली आठवत नाही का तुला?. आठवतंय पण काय करू आता माझ्यापण हातात नाहीये न मला लेट इन्विटेशन आलय न बघतेसना तू?.., मी नसतांना तुझी सगळी उर्वरित काम करून घे, लेख लिही, घर सजव, मेडीटेशन कर, अभ्यास कर...आपल्याला नोव्हेंबर महिन्यात "होकाईदो" ला जायचे आहे ना? त्याची शॉपिंग कर मस्तपैकी... ए गप्प, जा तू, तुला जायचं तर.., मला नको सांगू काय करायचं ते. आणि मला नाही यायच ते होकाईदो -फोकाईदोला जा तूच एकटा.. फॉरेन ट्रिप ला एकटा जातो आणि इथल्या इथे मला नेतोस..?? ओ..हो...हो... शहानी ग तू....! ऑस्ट्रेलिया च माहित नव्हत तोपर्यंत होकाईदो आणि आता त्याला काहीच महत्व नाही.. जपान मधील सर्वात महत्वाच ठिकाण आहे ते. मला काही ऐक ऐकायच नाही जा तू मुकाट्याने.. अशी रागाउ नकोस हेबघ ते पण फॉरेन सारखच आहे. फ्लाइटनेच जाणार आहोत ना आपण मस्त जवळच्या जवळ जाऊन आरामात फिरता येईल. ऑस्ट्रेलियाला आपण खास फिरण्यासाठी जाऊ..वाहहहहहहह....... पिंकी क्यूट प्रॉमिस? ऐस पिंकी क्यूट प्रॉमिस... डन.. आता मला जरा बर वाटतय माझ काम पण आता छान होईल तू नाराज असलिस की माझी काम होत नाहीत... बी हैप्पी फॉर मी....ह.ह.हा..हा....
एवढ होऊन सुद्धा दोन तीन दिवस मला रडू यायचं सारख. मग अचानक आठवलं “असामीला” विचारल तर राहायला येतेस का? तर हा लगेच नको ग.. ती नाही येणार. जपनीज लोक नाही येत जात कुणाकडे. गप्प्प्प बास्स्स्स..... एकदम गप्प एकतर स्वतः मला नेत नाहीस आणि वरतून मला शिकवतोय... जा..आ.. चुपचाप कामावर.. तोही बिचारा गप्प झाला. आणि बरं बघ येते का ती.
आणि मग काय आमच्या मैत्रीच्या ह्याच विश्वासावर मी तिला पंधरा दिवसापूर्वी विचारले. माझे मिस्टर आठ दिवस ऑस्ट्रेलियाला जात आहेत. तर तुला माझ्या घरी राहायला येता येईल का? तर तीही हो म्हणाली. पण किती दिवस जमेल ते मी तुला नंतर सांगते. म्हंटल ठीक आहे. मला वाटल एक दोन दिवस येईल हि अस म्हणतेय तर.. नाही का?. तिची कार पार्क करण्यासाठी गेटची चावी हवी होती. त्यासाठी मी यांना म्हंटल मी “निशिकावा-सन”(आमची ओफिशियल मदतगार) ला विचारते, तर हे लगेच पाहिलांदा उलटच बोलतील. गोष्ट होणार आहे कि नाहि हे पडताळण्या आधीच याचा नकार असतो. अग नको विचारू. ते खूप चार्ज घेतील किंवा फक्त बिल्डींग वाल्यांसाठीच पार्किंग असेल. तिला सांग बाहेरच पार्क कर. आता मला हे तिळभरही पटलेलं नव्हत. मी विरोध करून झालेला होता समजावून सुद्धा झालेलं होत. तरी माणूस ऐकत नाही. हात जोडले म्हंटल ठीक आहे. नाही विचारत. ते गेले कामावर आणि लगेच निशिकावा-सन ला मेल केला. आणि ती तर हे ऐकून खूप खुश झाली कि मी इतकी छान जपानीज मैत्रीण करू शकले कि ती माझ्या घरी येऊन राहू शकते. तिने माझ फार कौतुक केल. आणि सांगितलं देखील कि तुम्ही हौसिंग एजन्सी कडे जा आणि ह्या-ह्या नंबर ची चावी घ्या. असामी तिच्या लंच ब्रेक मध्ये वेळ काढून आली. गेलो तर नेमकं त्या दिवशी ते बंद, तिला म्हंटल आता जेवून ज तर म्हणली आज नको उद्या येते आज डब्बा आहे माझा. मग दुसऱ्या दिवशी सोबत जेवण केले आणि गेलो तर तिथे वेगळीच स्टाफ होता ती म्हणाली तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि त्यावर ज्याच्यानावावर घर आहे त्याची सही आणावी लागेल. आणि आठ दिवसांचे पैसे धावे लागतील. आम्ही एकमेकींकडे बघितलं, तरी मी तिला म्हंटल जर लागले पैसे तर मी देईल तू काळजी करू नकोस. तिथे १०एक मिनिटे गेली. आम्ही दोघीं त्या स्टाफ ला तोंड वाकड करून हसायचं काम चालेल. मग मी तिला म्हंटल एवढ काही असत तर निशिकावा-सन मला बोलल्या असत्या. थांब आपण त्यांना फोन करू. बोलण झाले आणि कळाले कि त्याची काहीच आवश्यकता नाही. मग कशीतरी तिथून चावी मिळाली. आणि काय मग ती आठवडाभर राहायला येणार अस म्हणाली आम्ही दोघी खूशच झालो. दोघीही पूर्ण आठवडाभराच प्लानिंग करून मोकळ्या झालो. तेव्हा पासून मी ह्यांना रोजच दिवसातून चार वेळा विचारायचे झाला का विझा? आला का विझा? विझाच काय स्टेट्स आहे? प्रत्येक फोनला, घरी आल्याबरोबर. सारख माझ चालेल विझा? विझा? विझा? फोन वाजला कि विझा चा मेल आहे का? रात्री ते झोपले मी जागी असेल आणि मेसेज वाजला कि मी धडपडून उठून बघायचे विझा चा मेल आहे का? ते एवढे हसले माझ्यावर... ऐ... जा.ना... तू.... ऑस्ट्रेलियाला का जात नाहीस? का मिळत नाही तुला विझा? जा.... आमच इथे प्लान्निंग झालंय सगळ आणि त्यावर आता तू पाणी फेरू नकोस.. अग बाई चाललय काय तुझ? आधी चार दिवस रडत होती. आणि आता एवढी खुश आहेस.. कर मज्जा कर चांगल खा-पी शोप्पिंग कर.. होस्टेल ला असल्यासारखी रहा मस्त. तुझ्या होस्टेल वरचे दिवस आठव मस्तपैकी.. दोघेही खुश झालो. त्याच आनंदाच्या भरात त्यांना चिवडा, खाकरा, शंकरपाळी, बाहेरून गुलाबजाम, सोनपापडी असा काही खाऊचा स्टॉक करून दिला. त्याबदल्यात डेबिट कार्ड पण हं... हाह्हाहा.....
आणि खरच मी इतक सुंदर प्लानिंग केल, आठवडाभर सगळी काम मस्त मजेत केली. एक नाष्ट्याची आणि लंच-डिनर ची यादीच केली त्यात सगळे इंडियन पदार्थ बनवले. पोहे, उपमा, पालक पराठा, साबुदाणा खिचडी, रताळे-शेंगदाणे गोड तिखट खीर, मेदू वडा... जेवणात—सुक्क चिकन-रोस्टेड चपाती- सलाड, बार्बीक्यू चिकन-तिरंगी पुलाव-सलाड, बटाटा पराठा-खीर, पालक.बटाटा.चणाडाळ भाजी-भात-चपाती, भेंडी-चपाती-डाळ-भात-रवा, छोले-पुरी-जीरा राईस, दोन-तीन वेळा रेस्टोरेंट मध्ये गेलो, चिकन सूप-राईस, कोलंबी सूप-जपानीस सैंडविच अशा दोन नवीन दिश मला माहिती झाल्या. त्यात "नात्तो" ह्या नावाची एक दुर्गधी वाली डिश तिने मला ट्राय करायला सांगितली आणि माझा व्हिडीओ पण काढला त्यावर पोट धरून धरून स्वतःच हसली पण मी ह्या सगळ्यांबरोबर माझ दिवाळी फराळ सुद्धा केल लाडू, शंकरपाळ्या, कारंजी, चिवडा.. हा झाला खाना-खजाना... आता बाकीची मज्जा रात्रभर गप्पा, डान्स, मेहंदी-पायावर, तिच्या गळयाभोवती सुंदर हार मेहंदीने काढला ती स्वतः एवढी खुश झाली कि रोज धावपळ करत दुपारी, रात्री वेळेवर येण्याचा प्रयत्न करत असे. ती डेन्तिस्ट आहे तिच्या क्लिनिक मध्ये सगळ्यांना फार आवडले. तीहि भारी मुरडत होती. वेगळ काहीतरी केल्यासारख. एक रात्री लॉंन्ग ड्राईव्ह ला गेलो तिच्या घरी. तिची मम्मी आणि डॉगी खूपच छान आहेत. “इंग्लिश विंग्लिश” हा पिक्चर तिल फारच आवडला. आणि त्याहून मज्जा सिंगल असल्यामुळे “क्वीन” ह्या पिक्चरची तिने घेतली. भारी धम्माल केली आम्ही. एकदा बुद्धांच्या प्रार्थनेसाठी गेलो. एकदा घर डेकोरेट केल. आणि शेवटी तिला साडी नेसवून मस्त नटवून तिचे फोटो काढले. जेवढ काही भारतीय गोष्टी तिला शिकवता सांगता आल्या तेवढ्या शिकवल्या. त्याच कारण हे सगळ ती स्वतःपुरत ठेवणार नसून तिच्या संपर्कातील सगळ्याच लोकांना ती भारतीय कला, मेहनत, चित्रपट, जेवण आणि बऱ्याचशा गोष्टींची माहिती देऊ शकली. तसेच तिच्या दोन मैत्रिणी माकी आणि मामीना ह्या माझ्याही छान मैत्रिणी झाल्या. असामीने मला एक सुंदर इंडियन शॉप दाखवल तिथे सगळ्याच भारतीय आणि विवध देशातील वस्तू खूप छान आणि कलात्मक मिळतात. त्यामुळे माझा वेळही खूप छान गेला. मला माझ्याकडील जे काही गुण आहेत ते कुणाला तरी शिकवण्याची संधी मिळाली. आणि माझ्या ह्याच कलागुणांमुळे कि काय माहित नाही, पण तिलाही मी फार आवडते. जातांना तीने एक गोष्ट सांगितली, कि जपानीज लोक आपल्या वैयक्तिक गोष्टी कुणाला सांगत नाहीत परंतु तू मला इतकी जवळची वाटलीस कि आज मी मनसोक्त तुझ्याशी माझ्या आयुष्यावर बोलू शकले. अजून एक गोष्ट अशी कि जपानीज लोक कुणाच्या घरी राहायला जात नाहीत. आणि न कुणाला घरी बोलावतात. पण मी तुझ्या घरी येतांना तसा कोणताही विचार केला नव्हता. बर झाल नाही केला, नाहीतरी मी तुझ्या ह्या मैत्रीतल्या गुणांना मुकले असते. मला खूप अभिमान वाटतो कि माझी परदेशातील भारतातील माझी एक खूपचं जवळची मैत्रीण आहे... खूप बर वाटल मला असामीच्या ह्या प्रतिउत्तरावरती.
लहानपणापासूनच मला मैत्रीचा फारच छंद आहे. त्यामुळे मी कुठेही असली तरी मला मैत्री हे नात खूप छान-छान स्वरुपात मिळत गेल. मी कधीच एकटी राहिले नाही. मैत्रीने मला नेहमी साथ दिली. आणि याच निम्मित्ताने मला माझे सगळेच मित्र मैत्रिणी आज पुन्ह्या नव्याने आठवले आणि आवडले देखील.... माझा नवरा मला वेळेचा सदुपयोग कसा करायचा त्याबद्दल बरंच काही-काही छान-छान सांगत होता, पण मला माझ्या पद्धतीनेच करायला आवडला. आणि तो सफल झाला.
मी मनसोक्त जगले......
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा म्हणजेच मैत्री.
कधीही मनमोकळेपणाने बोलावे, मनात काही ठेवू नये.
खोट बोलून आपल्याच मनाला फसवू नये,
मनात येईल तसे आनंदाने जगावे..
मनसोक्त जगावे.....
Rajashri Jagtap

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा