मुख्य सामग्रीवर वगळा

"राजपुत्र प्रत्यूष" चा पासपोर्ट, आला रे भोओओ......!



"राजपुत्र प्रत्यूष" चा पासपोर्ट, आला रे भोओओ......!


आम्ही दोघ राजा राणी... गोड गोड गातो गाणी, जसे बाजी आणि मस्तानी,
ओओ लैला मज्नू, सस्सी पुन्नू, हिर रांझा, सोनी महिवाल अशी अमुची प्रेम कहाणी...

            आज तीन वर्षापासून पाहिलेला स्वप्न पूर्ण झाल. लग्न होऊन आले तेव्हा जपान मधील छोट्या छोट्या गोंडस बाळांकडे पाहून खूप मन प्रसन्न व्हायच इथे अगदी आठ दहा दिवसाच्या बाळाला सुद्धा लोक घेऊन फिरतात. त्यामुळे अजूनच कुतूहल वाटायचं. त्याचप्रमाणे येथील बाळांसाठी असणाऱ्या सुविधा पाहूनच मनात निश्चयच केला होता. “माझ्या बाळाला मी जपान मध्येच जन्म देईल”.

       सगळ्यात पहिले तर येथील “Washrooms” पाहूनच आश्चर्य चकित व्हायला होते. प्रत्येक ठिकाणी लहान बाळाला बसवण्यासाठी त्याच्या जान्गु च्या आकाराच्या खुर्च्या लावलेल्या आहेत. त्याचसोबत बाळाचे डायपर बदलण्यासाठी खास “Family Washroom” उपलब्ध आहेत, त्यामध्ये तर बाळासाठी छोटे पाळणे(बेड) देखील आहेत. आणि मी लिहायला सुरवात केली ते Washrooms पासूनच कारण, अगदी Airport मधून पहिलांदा भेट हि त्या ठीकाणापासुनच झाली ना... हा.हा..हा...... मजेचा भाग जरी असला तरी, मी जपानच्या प्रेमात पडायला इथूनच सुरवात झाली. येथील नीटनेटकेपणा स्वच्छता हि अगदी काटेकोरपणे पाळली जाते. बस, कार, ट्याक्सी, ट्रेन यामध्ये आई आणि बाळासाठी स्वतंत्र सीट असते.
त्याचप्रमाणे नंतर बाळाला घेऊन जाण्यासाठी Kangaroo Belt(Baby Reciving Belt) चा वापर हा करावाच लागतो बाळाला हातात किंवा कडेवर घेऊन कुणी जातांना मी पहिले नाही. फिरायला किंवा लांब जातांना स्ट्रोलरचा चा उपयोग केला जातो. अर्थात येथील रस्ते त्या योग्य आहेत म्हणून. त्या स्ट्रोलरला ऊन, पाऊस, थंडी पासून संरक्षण सुद्धा केले जाऊ शकते. हे स्ट्रोलर घेऊन बाळाला कितीही लांबचा प्रवास करणे सोप्पे आहे. आणि ते त्यात फार आरामदायीपणे झोपू शकते, बसू शकते, खेळू सुद्धा शकते. अशा इत्याही प्रकारच्या सुविधा माझ्या पाहण्यात आल्या. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी माझा हा मोठा निर्णय घेण्यासाठी पुरेशा होत्या.

       जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा खरी सुरवात झाली ते बाळाबद्दल बाळासाठी असणाऱ्या सुविधांबद्दल  सर्व गोष्टी जाणून घेणे. येथील सरकारी हॉस्पिटल सुद्धा अगदी प्रायवेट हॉस्पिटलच्या सारखेच सुविधा पुरवतात. सुरवातीलाच एक कुपन बुक दिले गेल, ते वापरतांना फार कमी पैशात चेकअप केले जाते, प्रत्येक चेकअप मध्ये बाळाची वाढ योग्य रित्या आहे कि नाही, आई ला काही त्रास आहेत का, दोघांच्या वजनाची काळजी घेतली जाते. जसे जसे दिवस भरतात तसे चेकअप महिन्यापासून पंधरावडा, आठवडा, आणि दोन दोन दिवस असे केले जाते.
डिलिवरीच्या वेळेस दोन रूम असतात. एक लेबर पेन आणि दुसरी डिलिवरी. आणि शक्यतो नॉर्मल डिलिवरीच केली जाते. सिजेरीयन हे फार अगदीच काही टोकाची भूमिका असेल तेव्हाच केले जाते. अक्षरशा उदा.४, ८, १०, १४, १८, ३५ कितीही तास लेबर पेन होओ पण नॉर्मल डीलीवरीच केली जाते, सिजेरीयन चा निर्णय हा केवळ आई किंवा बाळाच्या जीवाला धोका असेल तरच घेतला जातो. त्यात कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा पेन किलर हि दिली जात नाही.
त्याच प्रमाणे डिलिवरी वॉड मध्ये आपल्या पतीने देखील हजर राहणे आवश्यक आहे. आणि मला येथील हीच संकल्पना फार महत्वाची वाटली. कारण जन्म देतांनाच्या स्त्रीच्या वेदना काय आणि किती असतात याची कोणत्याच पुरुषाला कधीच कल्पना येऊ शकत नाही. परंतु तो जर ह्या अवस्थेत आपल्या स्त्रीला पाहिल तर कमीतकमी तो ते त्या वेदनेला समजू तरी शकेल. आणि ह्याच समजुतीवर त्या स्त्रीचा सन्मान करील अथवा आहे तो वाढविल, आणि बाळाला जन्म देणे म्हणजे नक्की काय याचा अर्थ त्याच्या पदरी पडेल. त्यामुळे मला स्वतःला असे वाटते कि हि संकल्पना प्रत्येक देशात सुरु व्हावी. आणि आपल्या भारतात तर खरोखर अशा थोर कल्पनांची नितांत गरज आहे. कारण स्त्री तिला मिळणाऱ्या सन्मानासाठी जो प्रचंड मोठा लढा देत असते, त्यात तिला हि गोष्ट नक्कीच मदत करील.  

          त्यानंतर नॉर्मल डिलिवरी साठी आई आणि बाळाला पाच दिवस देखरेखी खाली ठेवले जाते, आणि सिजेरीयनसाठी दहा दिवस त्या दिवसात आईला बाळाला घेऊन दुध पाजणे शक्य नसेल तर ती जबाबदारी नर्स कडे असते. बाळांची एक स्वतंत्र अशी रूम असते. तिथे सर्व चिल्ली पिल्ली ठेवतात. कुणी रडत, कुणी दुध पिते, कुणी टुळूटूळू छताकडे बघते. आणि ह्या त्यांच्या रूम कडे बघून फार आनंद होतो. छोट्याशा पिलांचा चिवचिवाट ऐकून काळजाचे ठोके वाढतात, मन प्रसन्न होते. बाळाला ठेवण्यासाठी स्पेशल चार चाकी ट्रॉली असते त्या ट्रॉली मध्येच त्याचे श्वास मोजण्याचे छोटेसे मशीन असते. कुणा बाळाला जर श्वास घेण्यास काही त्रास झाला तर त्वरित त्यातून लाल लाईट येऊन रिंग येते. त्याचप्रमाणे हि ट्रॉली बाळाला ने आण करण्यासाठी देखील वापरली जाते. बाळ हातात उचलून कुणी घेत नाही. हॉस्पिटल मधील ह्या दिवसात बाळाला अंघोळ घालणे, डायपर बदलणे, दुध पाजणे, अशा लहानसहान गोष्टींपासून बाळाची सगळ्याच प्रकारची काळजी घेणे शिकवले जाते. पण यात आपण भारतीय महिला हुशार आहोत बर.... माझ्याअनुभवावरून सांगते.. हा.हा...हा....  
आई ला जर दुध येत नसेल अथवा कमी पडले. तर बाळाला फोर्मुला मिल्क दिले जाते आणि हे दुध आईच्या दुधाच्या बरोबरीनेच काम करते. मुख्य म्हणजे बाळाला ह्या दुधाची चव फार आवडत असते. ते आवडीने भरपूर पिते. त्यामुळे येथील बाळ हे एकसारख्या प्रमाणत गुटगुटीत होतात. आणि आपल्या आपल्या घरी सुधृढ पद्धतीने घेऊन जातात... हुरेरेरेरे.

        ह्या काही उदाहरणांनसोबत माझा थोडाफार अनुभव आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या नंतर कधीतरी लिहिल.

आज हे सगळ लिहिण्या मागचे कारण म्हणजे आज माझ्या बाळाचा पासपोर्ट आला. माझ तीन वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाल. खूप मोठ यश पदरी पडल्याचा आनंद होतोय पासपोर्ट पाहून आमच्या दोघांचे आनंदाश्रू वाहिले, हृदयाचे ठोके वाढले, नाष्टा करायला घेणार होते पण भूकच पळाली आणि आज पर्यंत आम्हाला कोणत्याच कागदपत्रांसाठी झटावे लागले नाही. अगदी वेळेत सगळ्या गोष्टी सुयोग्य पद्धतीने पार पडल्या. आमच दोन महीन्याच पिल्लू सुद्धा एवढ खुश झाल, चक्क पासपोर्ट घेऊन नाचतच होत. ल्ब्यू बाबू पिल्लू.... तुला आयुष्यभर अशा प्रकारच्या सुख सुविधा मिळत राहो. औक्षवंत हो, भाग्यवंत हो माझ्या बाळा.
जपान मधील सुखसुविधा ऐकून होते त्यामुळे मी येवढा मोठा निर्णय घेऊ शकले आणि आज तो सफल देखील झाला. विदेशात डिलिवरीचा निर्णय बऱ्याच मुली घेतात तसा पण, घरून पालकांना बोलावून घेतात तशी मी कुणाचीही मदत घेतली नाही आणि कुणालाही बोलावले नाही.

         छोट्याशा शेवगे दारणा मधील गावातली नवीन पिढी हि विदेशात जन्माला आली. इथे माझ्या देखभालीसाठी कुणीही नसतांना मी हे पाऊल उचलले. माझा जीव पणाला लावून मी निश्चय केला आणि आज केवळ मी केलेल्या त्याच निश्चयामुळे “डॉ. सतीश लक्ष्मण शिंदे”. यांच्या येणाऱ्या पिढीला मी जपान सारख्या देशात घडवू शकले, जन्म देऊ शकले.  
         डॉ. सतीश लक्ष्मण शिंदे. यांनी पी. एच. डी. करून डॉक्टर डिग्री मिळवली, जपान सारख्या देशात वैज्ञानिक म्हणून काम करत होते आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीला आहे त्यापेक्षा अजून पुढे नेण्यास त्यांच्या बायकोने मोलाचे कार्य केले. ती फार धडाडीची कार्यकर्ता होती असे म्हणतात. हा.हा..हा.....
असा काही अजून बराचसा मोठा इतिहास आपण घडवू डॉ. सतीश शिंदे.
“हम तुम दोनो जब मिल जाऐंगे, एक नया इतिहास बनायेंगे”
इसीलिये शिंदे जी, मेरे हर एक फैसले मे साथ रहो जी....

बाकी तुम्ही अजिबात घाबरू नका. माझी तुम्हाला पावलोपावली साथ असेल, त्यासाठी मी वाट्टेल ती मेहनत करायला तयार आहे. बिनधास्त मोठे मोठे निर्णय घेत पुढे चला.....   

आम्ही दोघ राजा राणी... गोड गोड गातो गाणी, जसे बाजी आणि मस्तानी,
ओओ लैला मज्नू, सस्सी पुन्नू, हिर रांझा, सोनी महिवाल अशी अमुची प्रेम कहाणी...
काय मज्नू काय महिवाल काय पुन्नू काय रांझा,
सर्वांपेक्षा सरस्व आहे जीवनाचा मैतर माझा...
ओओ कुठली सस्सी, कुठली लैला, कुठली हिर अन कुठली सोनी,
सर्वांना लाजवील अशी हि देखणी माझी राणी...
आम्ही दोघ राजा राणी... गोड गोड गातो गाणी, जसे बाजी आणि मस्तानी
स्वर्गाहून घर आमुच सुंदर त्यास न लागो द्रुष्ट नजर,
पती माझा परमेश्वर हा मी करते रे प्राण अर्पण...
नशीबवान मी आहे जगती, मला मिळाली असली पत्नी
पत्नी अशी सर्वांना लाभो, जय शिव शंकर जय शंभू....  
आम्ही दोघ राजा राणी... गोड गोड गातो गाणी, जसे बाजी आणि मस्तानी....



 राजश्री जगताप......

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...