#आज_माझ्या_बाबांचा_वाढदिवस_आहे: #प्रत्युष👨👦😘 हॅलो मम्माचे फेसबुक फ्रेंड्स आणि फॉलोवर्स मी प्रत्यूष बोलतोय. माझा जन्म जपान त्सुकुबा येथे झाला हे तुम्हाला सगळ्यांना माझ्या मम्माने सांगितलेच आहे. मी मम्मा-डैडी सोबत जपान मध्ये साडे तीन महिने राहिलो आम्ही खूप खूप मज्जा केली, मी मम्मा डैडीला खूप खूप नवीन नवीन गोष्टी शिकवल्या. आम्ही खूप लांब लांब फिरायला गेलो. उशिकू दायबुत्सु चा बुद्धा पाहिला(जगातील सगळ्यात उंच बुद्धा), माउंट फुजी पाहिला(जपान मधील सगळ्यात मोठे आणि प्रसिद्ध ठिकाण) खूप खूप फिरलो, पण तरीही तुम्हाला खर सांगू?..... मला आई बाबांना कधी भेटेल असे झाले होते. मी कधी त्यांच्याकडे भारतात येईल असे झाले होते. मला सगळ्यात जास्त माझे बाबाच आवडतात ते कसे विचारताय?, थांबा हं सांगतो..... ऐका.... मी मम्माच्या गर्भात असल्यापासून माझे बाबच माझे फार फार लाड करतात. ते तेव्हाच म्हणायचे तो बघ भारतात आला कि माझ्याचकडे जास्त राहील. तो माझच ऐकेल, त्याचे सगळ्यात जास्त मीच लाड करील आणि आज खरच ...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....