🎉🎂🍭🧁🎈🎁🛍🧸🍬🎊👓👕🤗👻
आज जगात करोना विषाणुच्या आजाराने जरी थैमान घातल आहे तरी, बऱ्याचशा कुटुंबातील सदस्य जे नोकरी शिक्षणासाठी बाहेर गावी होते ते लॉकडाऊन होण्याआधी आपआपल्या घरी आल्यामुळे सर्वजण एकत्रित येऊ शकले. बऱ्याचदा कुटुंबातील मुल मोठी झाली की सर्व भाऊ बहिण एकत्रित येणे म्हणजे योगायोग जुळून यावा लागतो.
आणि तो योगायोग आज माझ्याघरीसुद्धा जुळून आला त्यात माझे पिल्लू आठ महिन्याचे झाले तर त्याचा मासिक वाढदिवस मोठ्या जोरात करता आला कारण, पुन्हा वार्षिक वाढदिवसाला कोण कोण आपआपल्या कामात व्यस्त किंवा सोबत असण्याचा योग राहिल सांगता येत नाही. म्हणूनच आज त्याच्या मावशीने घरीच केक बनवला, मी लेयर्स ची बिर्याणी, आई बाबांनी तोपर्यंत पिल्लुला खेळवल मामा ने छान छान फोटो आणि व्हिडीओ काढले. सगळे योगयोगाने हजर जरी असले तरी पप्पा पोलिस ऑफिसर असल्यामुळे त्यांना बंदोबस्तला दुपारी चार ते रात्री पर्यंत ची ड्यूटी असल्यामुळे आम्हाला पिल्लुचा बड्डे दुपारीच करुण घ्यावा लागला. त्यात पण खुप घाई घाई मध्ये सगळ अवरा सावर करावी लागली. फोट पण काढायचे असल्यामुळे फार धांधळ उडाली आधी जेवण उरकून मग तयारी करुण फोटो काढून घेतले आणि शेवटी केक कापला. कारण आयुष्यभर आठवणींना फोटोंचा फार मोठा आधार असतो.
असोत..... सगळ काही अनंदात पार पडले याचे आत्मिक समाधान घरात सर्वांना लाभले.
आज माहेराले जानं
झाली झाली वो पहाट
आली आली डोयापुढे
माझ्या माहेराची वाट
रातदीन गजबज
असं खटल्याचं घर
सदा आबादी आबाद
माझं ‘आसोद’ माहेर
माझ्या माहेराच्या वाटे
रेलवाईचे फाटुक
आगगाडीचं येनंजानं
तिले कशाची आटक?
माझ्या माहेराच्या वाटे
डाबा पाण्याच्या लागल्या
म्हशी बसल्या पान्यात
जशा वरमाई न्हाल्या
माझ्या माहेराच्या वाटे
देख मये चारोमेरी
गाडया ऊसाच्या चालल्या
बुधवारच्या बाजारी
माझ्या माहेराच्या वाटे
घंटया घुंगराचा नाद
येती जाती बैलगाडया
धुरकरी घाले साद
मांघे पोत्यातून गये
गव्हा –जवारीची धार
पाखराचा जमे बेत
दाने खाई झाले गार
माझ्या माहेराच्या वाटे
गायी म्हशीचं खिल्लार
गावामधी बरकत
दह्या दुधाची रे ढेर!
माझ्या माहेराच्या वाटे
जरी आले पायी फोड
पाय चालले चालले
अशी माहेराची ओढ
माझ्या माहेराच्या वाटे
जरी लागल्या रे ठेचा
वाटवरच्या या दगडा
तुले फुटली रे वाचा!
“नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या
वाटवरला दगड!”
माझ्या माहेराच्या वाटे
माले लागली गुचकी
आली उडत उडत
एक दीसली, सायंकी
माझ्या माहेराच्या वाटे
मारे सायंकी भरारी
माझ्या जायाच्याच आधी
सांगे निरोप माहेरी
“ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोटया
लेक बहिनाई आली!”
कवयत्री: बहिणाबाई चौधरी
सगळ्यात महत्वाच म्हणजे पिल्लुला नवीन ड्रेस आणायला जमणार नाही याचा खेद वाटला नाही कारण पिल्लूच्या डैडीनी त्याला केरळ वरुण वेस्टी आणली होती ती पिल्लुला नेसन्याची हीच योग्य वेळ दोन्ही बाजूने जुळून आली ती म्हणजे त्याच्या आठ महिन्याच्या वयाला बरोबर आली. म्हणून आज पिल्लूडी "पुत्तूस्वामी" आणि मम्माडीने "साऊथ इंडियन" केरला वेशभूषा केली. थॅंक्यू डैडी आणि आज कामनिमित्त तसेच Lockdown मुळे डैडी येऊ शकले नाही मिस यू शोओओओ मच डैडी.
Happy 8th Month Birthday PutTuSwami🎉🍰🧸🎁🎂🎈👕👓🎊🛍🍭🍬🧁🍫
राजश्री जगताप✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा