मुख्य सामग्रीवर वगळा

मी फॉरेन रिटर्न

मी फॉरेन रिटर्न

           नमस्कार मी राजश्री जगताप शिंदे मी माझ्या यजमानांसोबत जपान मध्ये असते. ते गेल्या पाच वर्षापासून नामांकित इंस्टीट्युट मध्ये वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. नोव्हेंबर २०१९ पासून मी माझ्या बाळासोबत भारतात आलेले आहे.
           सध्या आपण म्हणजेच संपूर्ण जग, संपूर्ण देश एका करोना नावाच्या विषाणूमुळे हादरलेलो आहोत. ह्या आजाराची तसेच त्याच्या लक्षणांची पूर्णपणे माहिती संपूर्ण जगाला मिळालेली आहेच, त्याचप्रमाणे त्याची लागण होण्यापासून बचाव कसा करता येईल यावरही उपाययोजना आखण्याचे काम सुरु आहे. करोनाचे विषाणू संसर्ग जण्य असल्यामुळे विदेशातून येणाऱ्या लोकांवर खास अशी देखरेख केली जात आहे. संशयित लोकांना पंधरा दिवस विमानतळावरच ठेवण्यात येत आहे. तेथे त्यांची वेळोवेळी करोना विषाणूची चाचणी करून आरोग्य तपासणी केली जात आहे. काही लोकांना घरी पाठवण्यात येत आहे, परंतु त्यांना होम क्वारंटाइन झोन मध्ये राहण्यास बजावलेले आहे.
           आता सर्वात महत्वाच म्हणजे असे कि काही लोक सरकारच्या ह्या नियमांच फार चुकीच्या पद्धतीने उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. होम क्वारंटाइन झोन असतांना देखील ते घरा बाहेर पडत आहेत, तर नाण्याची दुसरी बाजू काही लोक सेल्फ क्वारंटाइन करून घेत आहेत. परंतु सोशल साईट वर सामाजिक दृष्टीकोनातून आपण जर पाहिले तर, काही लेख, काही कमेंट आणि काही फेसबुक पेज वर अतिशय घाणेरड्या पद्धतीने लोक बोलत आहेत. काही पेज वर प्रश्न केला जातोय कि विदेशात अडकलेल्या लोकांना भारतात आणणे योग्य कि अयोग्य? तर, अशा ठिकाणावरील कमेंट वाचतांना अतिशय दु:ख होतंय. कारण लोक बोलतांना लिहितांना माणुसकीच आणि काळजीचे अजिबात भान न ठेवता बोलत आहेत. उदा. विदेशात लोक मज्जा मस्ती करायला जातात, ते तिथेच अडकून मरुदेत, त्यांना तसेच पाहिजे, त्यांचा आता पैसा संपला त्यांना म्हणाव आता बोंबलत बसा, हनिमूनला फिरायला आपला देश वाईट आहे का? बर एवढच नाही तर विदेशात शिक्षणासाठी नोकरीसाठी जाणारी लोक हि पैशावली असतात. ते आपल्या गरजा पूर्ण करूनच विदेशात हौसेने जातात. परंतु भारतीय जनतेने खरच विचार करून पहाव कि आपले हे शब्द त्यांच्या प्रती योग्य आहेत का? याचा आपण विचारच करत नाहीये. उच्च शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने किती खास्ता खाल्लेल्या असतात ते कोणत्या चरख्यातून पिळून निघून पुढे गेलेत, पुन्हा त्यांना विदेशात राहतांना किती अडीअडचणीना तोंड द्यावे लागते? किती मोठा संघर्ष करावा लागतो? याची जाणीव किंवा माहिती आपल्याला थोड्याबहुत प्रमाणात तरी आहे का? आपण आज त्यांना धडधडीत शिवी गाळ करतोय तिथेच विदेशातच मरुद्या हि आपली भाषा आपल्या भारतीय बांधवांसाठी वापरणे कितपत योग्य आहे?. जरी आजार विदेशातून आलाय, येतोय तरी, आपल सरकार त्यावर तोडगा काढत आहे. आपल्या अशा प्रकारच्या शब्दांनी त्यांच्या कटुंबावर काय परिणाम होत असेल? विदेशात राहून नोकरी करण्याची कुटुंबाच्या मनाची परिस्थिती आपण जाणतो का? त्याचप्रमाणे उच्च शिक्षण उच्च्पदवी घेऊन विदेशात काम करतांना डॉक्टर, वैज्ञानिक, इंजिनियर यांच्याकडून आपल्या देशाचे नेतृत्व केले जाते. एरवी तर आपल्याला त्यांचा फार अभिमान वाटतो. नातेवाईक मित्र मंडळी हे अभिमानाने समाजात पसरवत असतात, आमचा अमुक तमुक, आमचा मुलगा मुलगी, पुतणी, काका मामा, मित्र मैत्रीण अनेक अनेक नाते संबधित युरोपला आहे, जपानला आहे, अमेरिकेत आहेत, फ्रान्सला आहे असे आपण अभिमानाने पाढे पढत असतो. वाढेल तेवढ्या मोठ्या मानसन्मानाने सांगत असतो आणि आज त्याच लोकांवर वाईट वेळ आली तर त्यांना मरुदेत, भारतात येवूच देऊ नका, एवढच नाहीतर कशाला मरायला जाता तिकडे, तिकडेच मरा या शब्दात आपण त्याचं निर्भस्तना करतो, खिल्ली उडवतो. त्यांच्या सुरक्षितेचा विचार करणे तर दूरच उलट अजून त्यांना त्रास कसा होईल हि भावना व्यक्त करतोय. अहो हि आपली भारतीय संस्कृती नाही ओ.....
        आणि खर सांगायचं झाल तर सरकारला ह्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे. म्हणून तर अमेरिका, युरोप, जपान या ठिकाणी स्वतंत्र विमान म्हणजे फक्त तेथील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी विमान सेवेची सोय आणि उपलब्धता केली आहे. जर आपले विदेशात अडकलेले भारतीय बांधव खरोखर चुकीचे असते तर सरकारने देखील असे त्यांच्या प्रती चांगले पाऊल उचलले नसते. सरकारच्या ह्या निर्णयाचे आपण समर्थन करायला हवे. आणि जे विदेशयात्रीकरू नियमांनचे उल्लंघन करतील, पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई हि होईलच ते कोणत्याही परिस्थितीत सरकारला फसवू शकत नाहीत.
       आणि फिरायला जाणाऱ्याबद्दल सांगायचे झाले तर विदेशात जाण्याच आणि आयुष्यात एकदातरी विमान प्रवास करण्याच स्वप्न हे प्रत्येकाचच असत. प्रत्येक माणसाला विदेश फिरण्याच आकर्षण असत. आता थोड्याच दिवसात करोना रोगाच्या विषाणूवर लस निघाल्यानंतर हे जे काही थैमान ह्या आजाराने घातले आहे ते थंड झाल्यानंतर सगळ्यांचे विचार बदलतीलच आणि पुन्हा उच्च शिक्षणाची, नोकरीची धडपड काही स्वप्नांची धडपड सुरु होईल अशी आपण स्वछ मनाने चांगल्या विचारांनी अपेक्षा ठेवू.
         त्याचप्रमाणे सर्वात महत्वाच आणखी एक मुद्दा म्हणजे पोलीस कर्मचारी स्वतः तसेच त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आज संपूर्ण देश बंद असतांना त्याचं कर्तव्य बजावत आहे. त्यांना सहकार्य करूयात. माझे वडील पोलीस ऑफिसर आहेत. आमच्या घरात छोट बाळ असतांना बाहेरील अशा वातावरणातून वडील घरात आल्यानंतर आम्हाला बाळाची जीवापाड काळजी व खबरदारी घ्यावी लागत आहे.
तसेच पोलीस, वैज्ञानिक, डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट, कचऱ्याची घंटा गाडी, भाजीपाला विक्रेते किराणा दुकाने अर्थात आपल्या मुलभूतगरजा भागवण्यासाठी लॉकडाऊन असतांना देखील देशासाठी कर्तव्य करत आहेत. त्यांचे आभार मानूयात. त्यांच्या कार्याला सलाम.
यात माझे थोडे जरी काही चुकले असेल तर माफी असावी.
खूप खूप धन्यवाद!
जय हिंद, जय महाराष्ट्र.

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...