मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वदेशी_दुःख

#स्वदेशी_दुःख              ह्या वर्षी विदेशी दुःख जरी नसल तरी विदेशात जाण्याच दुःख मात्र आहेच. स्वदेशात असतांना आपल्या सांस्कृतिक पदार्थांचा भरभरून आस्वाद घ्यायला मिळाला. आंबे, कैऱ्या, मासे, भाज्या भरपूर हव्या तेवढ्या प्रमाणात खायला मिळाल्या. पण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला स्वादिष्ट जेवण खाऊ घालता आले नाही की भारतीय स्त्रीला फार दुःख होते. घरात काहीही पदार्थ बनवू सर्वात आधी ताट वाढायचं ते पुरुषांना. आणि त्यांना जेवण आवडले म्हणजे आपल्या कष्टाला यश मिळाले. मी कुठलाही पदार्थ बनवायच्या आधीपासूनच सत्त्या हे बनवूया ते बनवूया चल तुझ्यासाठी मी आज हे बनवते ते बनवते. आणि तो ही त्यावर भारीच खुश असतो त्यामुळे स्वयंपाक करण्याची मज्जा काही औरच असते. आणि मला आनंदात पाहण्यासाठी तोही खूप प्रोत्साहन देत असतो. घरात हव्या त्या स्वयंपाकाच्या वस्तू उपलब्ध करून देतो. मागील वर्षी मी मे महिन्यात गरोदर असतांना मला डोहाळे लागलेले होते त्यावेळेस मला जे जे खावसा वाटल ते ते त्याने शोधून काढल. हा आंब्यांचा मौसम असतो त्यात मला आंबे हवे म्हणजे हवे तर केवढा तो खटाटोप त्यान...
माझ बाळांतपण हे जपान मध्येच व्हावं असा निर्णय मी फार आधीपासूनच घेतलेला होता. आणि ह्या एवढ्या मोठ्या निर्णयाची संपूर्ण तयारी अगदी एक एक पाऊल टाकतांना फार विचारपूर्वक करावी लागली. प्रत्युषचा जन्म होण्याआधीपासूनच मी त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या वस्तू, खेळणी, कपडे, बाथ टब, पाळणा, रॉकर, स्ट्रोलर फोटोग्राफी चे वेगवेगळे ड्रेस, असे जे जे काही मला रोज नवनवीन शोधता येईल ते ते मी शोधून जमल्यास लगे हात ऑर्डर करून द्यायचे. त्यामुळे माझ बाळ येण्याच्या काही महिने आधीच त्याच्या स्वागताची सर्व तयारी मी करून ठेवली होती. याने आम्हा दोघा पती पत्नीला ऐनवेळी कोणत्याही प्रकारची धावपळ करावी लागली नव्हती. गरोदरपनाच्या नवव्या महिन्यापासून आम्ही फार निवांत होतो. आता फक्त काही तासांसाठी  हॉस्पिटल ला जायच आणि बाळाला घेऊन यायच. बहुतेक बाळंतपणाची थोडीबहुत माहिती आम्हा दोघांना असती तर तेहि आम्ही दोघांनीच पार पाडलं असत हा.हा...हा.... तर नक्की सांगायचं काय, माझ्या बाळाला काय काय वेळोवेळी हवय त्याला कोणत्या वयामध्ये कोणत्या आणि कशा प्रकारच्या वस्तू पुरवायच्या आहेत. याबद्दल ची माझी धडपड नेहमीच सुरु असते. आणि...

World Tour

#World_Tour https://www.facebook.com/1773734782927157/posts/2374830629484233/?d=n                        👆         ह्या सगळ्या पार्टीच्या अगोदर आम्ही दोन दिवसांची “निक्को” येथे ट्रीप करून आलेलो होतो. निक्को बद्दल सांगायला आणि लिहायला खूप आहे. निक्को हे “ओल्ड कल्चरर जपान” (जुने खेडे गाव) म्हणून ओळखले जाते. निक्को हे तोचीगी प्रीफेक्चर(प्रांतात) मध्ये येते. निक्को हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तेथे फोरेनर्सच नाही तर जापनीज लोक सुद्धा मोठ्या प्रमाणत भेट देत असतात. ते नेहमीच फिरतीवर असतात. तेथील श्राईन्स(मंदिरे), तळे, धबधबे, ओनसेन(अंघोळीसाठी बनवलेले कुंड), निक्को न्याश्नल पार्क, बोटानिकल गार्डन हे प्रचंड प्रसिद्ध आहेत. जपान हा निसर्गश्रुष्टीने नटलेला देश आहे त्यापैकी हे छोटस शहर मनाला भावणार आहे. जापनीज लोकांमध्ये म्हण आहे “Never say ‘kekko’ until you’ve seen Nikko” (kekko meaning- beautiful, magnificient or I am satisfied) अशा पद्धतीने काही शब्दातच निक्को चे वर्णन केलेल आहे.       ...
"उशिकू दायबूत्सु" हे ठिकाण जपान मधील त्सुकुबा शहरात आहे. येथे जगातील सर्वात ऊंच 190मी. (390 फूट) बुद्धांची प्रतिमा 1993 मध्ये कमळाच्या फुलामध्ये उभारली गेलेली आहे. जगातील पाच ऊंच प्रतिमांमध्ये "उशिकू दायबूत्सु" येथील बुद्धांच्या प्रतिमेचा पहिला नंबर आहे. प्रतिमेच्या आतून तीन मजल्याचे संग्रहालय तयार केलेले आहे. जपान मधील अजुन एक माझ्या आवडीचे ठिकाण. माझ्या प्रबुद्ध (प्रत्युष चे पहिले नाव “प्रबुद्ध” आहे. नंतर प्रत्युष) चे फिरण्याचे पहिले ठिकाण. पहिलांदा "उशिकू दायबूत्सु" येथे बाळाला घेऊन जायच ही माझी ईच्छा त्याच्या खुशखबरीच्या दिवसापासूनच मनी होती ती आम्ही दोघांनी मिळून पूर्ण केली. तुझ्यासाठी असलेल्या माझ्या सगळ्याच ईच्छा अपेक्षा पूर्ण होओत प्रत्युष बाळा. खुप खुप मोठा हो. ज्ञानी हो माझ्या बाळा! बुद्ध पौर्णिमेचे तुला अनेक अनेक आशीर्वाद!😘 नमो बुद्धाय🙏💐 राजश्री जगताप.
दिल दियां गल्लां हाय… करांगे रोज़ रोज़ बह के सच्चियाँ मोहब्बतां निभा के....            हे गाण मी नाशिक च्या जिम मध्ये ऐकल होत, मला खूप आवडल. लगेच तिथेच व्हिडीओ पाहिला. त्यातील संपूर्ण सिन आपण जपान मध्ये बनवू शकतो, असे चित्र चटकन डोळ्यासमोर उभे राहिले. कारण गाण्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे आणि कटरिना चे हुबेहूब ड्रेस, त्यातील काही फोटो, जपान मधील बर्फातील काही फोटो, आणि त्याहूनही महत्वाच म्हणजे “माझ्या नवऱ्याचा माझे फोटो काढण्यामधील इंटरेस्ट” एकंदरीत आमच्या दोघांचा Romantic Photo Vidio माझ्या डोळ्या समोर उभा राहिला. नवऱ्याला काही कल्पना न देता गाण लगेच सेंड केल. मग पुढे किती वेळा ते गाण मी ऐकल, पाहील याचा काही अंदाज नाही. फिक्स तर मग ह्या Anniversary ला फोटोशूट confirm...           जपानला आल्यावर सगळ्यात आधी फोटोंसाठी स्पॉट शोधायला सुरवात केली. चर्च मध्ये काही फोटो काढू ठरवल, पण मला मनाजोग चर्च मिळत नव्हत. संपूर्ण त्सुकुबा शहर मी शोधून थकले. माझ्या सगळ्या जपानीस मैत्रिणींना विचारल पण येथील चर्च हे केवळ लग्नासाठी असल्या...