मुख्य सामग्रीवर वगळा



माझ बाळांतपण हे जपान मध्येच व्हावं असा निर्णय मी फार आधीपासूनच घेतलेला होता. आणि ह्या एवढ्या मोठ्या निर्णयाची संपूर्ण तयारी अगदी एक एक पाऊल टाकतांना फार विचारपूर्वक करावी लागली. प्रत्युषचा जन्म होण्याआधीपासूनच मी त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या वस्तू, खेळणी, कपडे, बाथ टब, पाळणा, रॉकर, स्ट्रोलर फोटोग्राफी चे वेगवेगळे ड्रेस, असे जे जे काही मला रोज नवनवीन शोधता येईल ते ते मी शोधून जमल्यास लगे हात ऑर्डर करून द्यायचे. त्यामुळे माझ बाळ येण्याच्या काही महिने आधीच त्याच्या स्वागताची सर्व तयारी मी करून ठेवली होती. याने आम्हा दोघा पती पत्नीला ऐनवेळी कोणत्याही प्रकारची धावपळ करावी लागली नव्हती. गरोदरपनाच्या नवव्या महिन्यापासून आम्ही फार निवांत होतो. आता फक्त काही तासांसाठी  हॉस्पिटल ला जायच आणि बाळाला घेऊन यायच. बहुतेक बाळंतपणाची थोडीबहुत माहिती आम्हा दोघांना असती तर तेहि आम्ही दोघांनीच पार पाडलं असत हा.हा...हा....
तर नक्की सांगायचं काय, माझ्या बाळाला काय काय वेळोवेळी हवय त्याला कोणत्या वयामध्ये कोणत्या आणि कशा प्रकारच्या वस्तू पुरवायच्या आहेत. याबद्दल ची माझी धडपड नेहमीच सुरु असते. आणि मुख्य म्हणजे ती फार छान पद्धतीने यशस्वी होते.
तरी देखील नाशिक मध्ये आल्यापासून मला माझ्या ह्या गोष्टीसाठी फार झगडावे लागले आणि त्यात लॉकडाऊन मध्ये तर अजूनच संघर्ष वाढला. आधीपासूनच मी नेहमी म्हणत असते, ह्या नाशिक मध्ये मला बाळासाठी हव्या तशा वस्तू मिळत नाही. एकतर खूप शोधाव्या लागतात किंवा ऑनलाईन हा पर्याय असतो. आणि ह्या साठी पुणे मुंबई अशा दुसऱ्या शहरांचे मी गुण गात असते. बहुतेक मी संपूर्ण नाशिक फिरले नसल्याने मला एवढी कल्पना नाही कि कुठे कोणती वस्तू मिळेल. केवळ वस्तू नाही, हव्या तशा दर्जेची आणि अगाऊ तंत्रज्ञानाची वस्तू हवी असते. किंवा नाशिकचं तेवढं विकसित नाही असे मी बडबडत असते. पण असोत यात खंत वाटत राहणे योग्य नाही आपल्याला हवंय ते कस करता येईल कशा प्रकारे शोधता येईल याचा विचार करून धडपड करत राहणे हेच योग्य.
बाळाच वेगात बदलणार वय हे फार महत्वाचं असत वयाची पहिली पाच वर्षे आपण त्याला ज्या काही सवयी लावू, जे काही शिकवू त्याच सवयी तीच बुद्धिमत्ता त्याला मूळ घटक म्हणून आयुष्यभर राहणार आहेत. त्यामुळे त्याच्या वयाचे काही टप्पे खूप सांभाळून आणि काळजीपूर्वक मला पार पाडायचे आहेत.
आणि हो बाळ हुशार असेल तर त्याची हुशारी पुढे येईलच ती लपणार नाही म्हणून त्याच्यासाठी काही करायच नाही किंवा आपल्या काळात कुठे आगाऊ तंत्रज्ञानाच्या वस्तू होत्या आपण असे राहिलो तसे वाढलो  ह्या सगळ्या पांचट आणि मुर्खास्पद वाक्यांचा मला तिरस्कार आहे. चांगल्या सवयी लागण्यासाठी बाळाला चांगल्या वस्तू पुरवणं हि माझी जबाबदारी आहे आणि माझ्या बाळाचा तो हक्क देखील आहे. आणि हे सगळं मला त्याला पुरवण्याची माझी जबाबदारी पुढेपण अशीच यशस्वी होओ एवढं बळ माझ्यात नेहमी असावं.
खूप खूप यशस्वी हो, बाळा भाग्यवंत हो.
हाय फिडींग चेअर त्याच्यासाठी मला खूप दिवसाआधीपासूनच घ्यायची होती परंतु लॉकडाऊन मुळे थोडं महिना दोन महिन्याचा उशीर झाला तरी देखील मी लॉकडाऊन संपायची वाट पाहिली नाही. बाळाला एकदा एखादी सवयी लागली तर ती बदलवणे फार अवघड असते. त्याच आधीच जेवण तो स्ट्रोलर मध्ये करत होता आता त्याच्यासाठी खुर्चीतिल जेवण हा नवीन बदल आहे आणि माझं पिल्लू तर मला नेहमी छान सहकार्य करत. मी त्याला घेतलेल्या सर्व वस्तू मध्ये तो नेहमीच खुश होतो. आणि ती वस्तू योग्य पद्धतीने वापरतो देखील.
आणि हो आमच्या आजच्या गिफ्ट चे स्पॉन्सर आमची मासीमाँ आहे बर तिच्या पॉकेट मनी मधून तिने आम्हाला गिफ्ट दिले.
Thank You Shooooo much Mau❤️😘

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...