मुख्य सामग्रीवर वगळा

World Tour

#World_Tour

https://www.facebook.com/1773734782927157/posts/2374830629484233/?d=n
                       👆
        ह्या सगळ्या पार्टीच्या अगोदर आम्ही दोन दिवसांची “निक्को” येथे ट्रीप करून आलेलो होतो. निक्को बद्दल सांगायला आणि लिहायला खूप आहे. निक्को हे “ओल्ड कल्चरर जपान” (जुने खेडे गाव) म्हणून ओळखले जाते. निक्को हे तोचीगी प्रीफेक्चर(प्रांतात) मध्ये येते. निक्को हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तेथे फोरेनर्सच नाही तर जापनीज लोक सुद्धा मोठ्या प्रमाणत भेट देत असतात. ते नेहमीच फिरतीवर असतात. तेथील श्राईन्स(मंदिरे), तळे, धबधबे, ओनसेन(अंघोळीसाठी बनवलेले कुंड), निक्को न्याश्नल पार्क, बोटानिकल गार्डन हे प्रचंड प्रसिद्ध आहेत. जपान हा निसर्गश्रुष्टीने नटलेला देश आहे त्यापैकी हे छोटस शहर मनाला भावणार आहे. जापनीज लोकांमध्ये म्हण आहे “Never say ‘kekko’ until you’ve seen Nikko” (kekko meaning- beautiful, magnificient or I am satisfied) अशा पद्धतीने काही शब्दातच निक्को चे वर्णन केलेल आहे.

          जपान मध्ये कोणत्याही ठिकाणी ट्रीप प्लान करायचं ठरलं कि वेगवेगळ्या साईट्स
असतात आम्ही जपान गाईड हि साईट वापरतो. त्यावरून संपूर्ण हवी तशी नकाशासोबत माहिती मिळते. त्याचप्रमाणे कोणत्या ठिकाणी जाण्यास कोणत्या वाहनाची आवश्यकता आहे त्याचे वेळापत्रक, त्याचप्रमाणे त्याचे भाडे खर्च किती येईल तेही तेथे दिलेले असते. तेवढ्या ठिकाणी राहण्याचे हॉटेल, रेस्टोरंट, बाथरूम अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे जपान मध्ये प्रवास करणे फार सोप्पे होते.

          आता सुरवात करूया ती ह्या ट्रीप च्या सुरवातीपासून ची तयारी..... प्रश्नच येत नाही ओ..... सगळ्यात आधी येते ती म्हणजे माझी शॉपिंग भरपूर शॉपिंग केली दोन दिवस जायचं होते, चार ते पाच नवीन ड्रेस घेतले त्यावर मचिंग चप्पल, शूज, ज्वेलरी, अर्थात वातावरणाला अनुसरून कपडे घ्यावे लागतात ना दिवसभर उन आणि चार नंतर थंडी म्हणजेच नुकताच उन्हाळा सुरु होण्याचे दिवस म्हणून जास्तीचे कपडे, संपूर्ण ब्याग भरली ती फक्त माझ्याच शॉपिंगने, नवऱ्याचे मोजून दोन टी-शर्ट, दोन शॉर्टस, खाण्याचे पदार्थ, पावर बॅंक असे इत्यादी ब्याग करून घर आवरलेल आणि सकाळ होण्याची वाट पाहणे, मला हा क्षण खूप आवडतो. प्रवासाच्या तयारीची आणि योग्य दिवसाची आतुरता हि काही निराळीच असते. मला तर रात्र भर झोपच लागत नाही चार च्या नंतर झोपायचं आणि पुन्हा सकाळीस पाच सहा ला निघायचं असत. त्यात जपान मधील मेट्रो, मोनोरेल, शिंकांन्सन, क्रुझ, छोटी होडी यातून प्रवास म्हणजे जीवनातील अत्यानंददायक क्षण. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी मी फार उत्सुक होते. जपान मध्ये मे महिन्याचा संपूर्ण आठवडा हा “गोल्डन विक” म्हणून साजरा केला जातो आणि एक आठवडा सुट्या संपूर्ण देशाला असतात. त्यामुळे आमच्याकडे फार आरामात केवळ फिरण्यासाठी भरपूर वेळ होता. नवऱ्याच्या कामातून असा निवांत वेळ मिळणे म्हणजे दोघांसाठी स्वर्गच जणू त्यात ट्रिपचे ठिकाण स्वर्गाहून सुंदर.
२७ एप्रिल ला पहिला दिवस सुरवात हि मेट्रो ट्रेनने सकाळी सातला झाली, निक्को ला आम्ही सकाळी दहा पर्यंत पोहचलो. तेथील सर्वात सुप्रसिद्ध निक्कोचा शिंक्यो ब्रिज(सांकव) यापासून सुरवात केली. हा ब्रिज श्राईन्स चे मुख्य द्वार म्हणून ओळखला जातो. खूप छोटासा आहे परंतु वैशिष्ट्य पूर्ण आहे. कारण याच्या आजूबाजूने प्रत्येक बदलत्या ऋतू नुसार झाडे, पाने, फुले, औटम, सकुरा, नदी, हिमनदी, याचे दृश्य बदलत असते आणि ते ब्रिज ची शोभा वाढवत असते. ब्रिजच्या खालून नदी वाहते. त्याच्या भोवताली बऱ्याचशा श्राईन्स(बुद्धांची मंदिरे) आहेत त्यात “तोशुगु” हि सर्वात मोठी आणि महत्वाची सर्वात जुनी असल्यामुळे तिचे आकर्षण काही वेगळेच आहे. जपान मध्ये एक वैशिष्ट आहे तेथे छोट्या छोट्या गोष्टींना, ठीकांनाना सुद्धा खूप मोठे महत्व मिळालेले आहे. आणि ते जापनीज लोकांनी टिकवून ठेवलेले आहे. आमचा पुढील संपूर्ण प्रवास हा शिंकांन्सनने आणि मोनोरेल ने झाला. आयुष्यातील अविस्मरणीय भरपूर धम्माल असा प्रवास
फोटोंची लिंक
                   1👇
https://www.facebook.com/100003623217859/posts/1285207858276642/?d=n
                    2👇
https://www.facebook.com/100003623217859/posts/1286859818111446/?d=n

           दुपारच्या भर उन्हात वॉटर फॉल(धबधबे) पाहण्याचा आनंद म्हणजे अद्वितीयच. चारही बाजूने हिरवळ आणि नितळ पाण्याचा खळखळ वाहणारा आवाज मनाला भावणारा सुखद गारवा. कुठेतरी दुसऱ्या जगात आल्याचा भास होत होता. त्यानंतर हेच संपूर्ण दृश्य रोपवे आणि केबल कार मधून पाहतांना जे काही चित्र दिसत होते त्यावरून नजर हटवने शक्य नव्हते. व्हिडीओ आणि फोटोज हे केवळ काही बोटावर मोजण्यासारखे आपण काढू शकतो. परंतु एवढ्या दिव्य भव्य निसर्गाला मानवी कॅमेऱ्यात कैद करणे सोप्पे नसते. तरीही आपण शक्य तितके सुंदर दृश्य टिपण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यानंतर उंचावरील ह्या सगळ्या निसर्गातून डोंगर, दरी, बोगदे, घाटातून जे रस्ते उतरतात त्या वळनांतून उतरत येतांना मनातील आनंद ओसंडून वाहतो. घाटातून उतरतांना भले मोठे चार बोगदे लागले ह्या बोगदयांतुन जातांनाचे मोहक दृश्य अगदी सिनेम्याटिक होते. आपल्या सिनेसृष्टीत आपण जे दृश्ये आजपर्यंत पाहिलेले आहेत ते सर्व पाहायला मिळाले. श्रीदेवी, माधुरी, करिष्मा, सलमान, ऋषीकपूर, शाहरुख काही अल्बम ची गाणी सगळेच रोम्यांटीक गाणी आठवू लागले. "तेरे मेरे होठों पे मीठे मीठे गीत मितवा, आगे आगे चले हम पीछे पीछे प्रीत मितवा", साँसोका चलना दिल का मचलना", जरा सा झूम लू मैं....युरोप, स्विझरल्यांड, नेदरल्यांड, न्यूयॉर्क, लंडन, प्यारेस, बेल्जियम, इंग्लैंड, यू.एस. स्पेन, इटली, फ्रांन्स, ऑस्ट्रेलिया, ग्रीस असे इत्यादि अनेक अनेक ड्रीम कंट्रीज़ जपान मध्ये दिसु लागल्या.
#माझे_स्वप्न_आहे_की_मला_अनेक_अनेक_देश_पाह ण्याची_संधी_मिळो.
केबल कार आणि बस ची व्हिडिओ लिंक
                    👇
https://www.facebook.com/100003623217859/posts/1285226778274750/?d=n

         संध्याकाळी पाचच्या सुमारास डोंगर पायथ्याशी आलो. आणि तिथे पाहिले तर बोटिंगसाठी सुंदर सुंदर बदक, कमळ, मोराच्या आकाराच्या बोटी सज्ज होत्या. पण वातावरण थंड पडायला सुरवात झाली होती. त्यात बोटिंग करायचं म्हणजे अंगावर शहारे आणणारा क्षण. पण एकदा फिरायला निघालो कि कितीही, कोणताही त्रास होओ आपण मज्जा करायच कमी करत नाही. जेवढे पैसे खर्च केलेत तेवढे सगळे वसूल झाले पाहिजे कि नाही हा.हा..हा.... मग हात पाय दुखोत किंवा थकवा असो घरी आल्यावर दोन दिवस आराम करून काही फोटो बघत सगळा थकवा दूर होऊन जातोच. ट्रीप चा पहिला दिवस कधी उजाडला आणि कधी मावळला काही कळालेच नाही. पुन्हा हॉटेल वर परतून फ्रेश होऊन जेवायला निघालो खाली येऊन बघतोय तर सगळे काही साडे आठच्या आधीच बंद झाले, चौकशी नंतर कळाले खेडे गाव असल्यामुळे आठ वाजताच दुकाने बंद होतात. हॉटेल च्या खालचे रेस्टोरंट चालू होते परंतु तिथे पोट न भरण्यासारखे चिकन मिळाले. मग काय सोविनर्स शॉप मध्ये जाऊन असेच काहीतरी रेडीमेड पदार्थ घेऊन निघालो रात्री दहा पर्यंत फार सामसूम झाले होते. त्यात दिवसभर एवढे थकलेलो असतांना देखील नाईट वॉकचा आनंद घेतला.

#Edo_Wonderland_Nikko.

        दुसरा दिवस उजाडला तिथून फार लांब लांब ठिकाणी जायचे होते. “किनुगवा ओनसेन”(आंघोळीचे कुंड) हे लांबहूनच पाहिले कारण पुढील ठिकाणे जास्त आकर्षक मोहक होती. सुरुवात झाली ती “इदो वंडर ल्यांड”(जपानीज कल्चरल थीम पार्क) पासून एक खूप मोठे खेडे गाव जुन्या पारंपारिक पद्धतीने जतन करून ठेवलेलं आहे. जपानची संस्कृती जापनीज लोकांनी इथे जतन करून ठेवलेले ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याबद्दल लेख लिहिणे म्हणजे फार कठीण गोष्ट आहे. कारण प्रत्येक ठिकाणांची नावे, आणि तेथील वेगवेगळ्या गोष्टी हे पाहण्यासाठीच खुप दिवस लागतात. परंतु आम्हाला ते एक ते दोन दिवसात पूर्ण करावे लागले. आणि लेखही फार मोठा लिहू शकत नाही. घर, तलाव, सांकव, लहानापासून मोठी झाडे, नदी, बांधणी चे कपडे बनवायला शिकवतात, टोपल्या विणणे. त्याचप्रमाणे खेळाचे मोठ मोठे हॉल बनवलेले आहेत तेथे खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे ३० मिनिटे, ४०,४५ मिनिटे असे निरनिराळे खेळ चालू असतात. त्यातील काचेच्या बाहुल्या पाण्यातून येतात जादूचे खेळ, निंन्जा(आपल्याकडे निंन्जा हतोडी कार्टून आहे ना(ते जपानीजच आहे) त्याचा असली खेळ) हा सर्वात प्रसिद्ध जपानीज खेळ आहे. जपानीज सांस्कृतिक पदार्थ, पेय्य, कार्टून्स, बुद्धा, जपानीज मांजर, पुन्हा भूत बंगला. असे अनेक अनेक खूप काही पाहण्यासारख ह्या “निक्को” मध्ये होते परंतु दोन दिवसात एवढे सगळे पाहणे शक्य नाही. त्यासाठी पुन्हा एकदा “निक्को”ची सैर करायचीच आहे.               👇
https://www.facebook.com/
100003623217859/posts/1287704658026962/?d=n

#Tobu_World_Square.

दुपारी दोन वाजेपर्यंत इथे पोहचलो.

         हे किनुगावा ओनसेन, निक्को, तोचीगी, जपान येथील थीम पार्क आहे. थीम म्हणजेच काय तर एखादा निवडलेला विषय आणि त्यानुसार केलेली रचना. तर Tobu येथील विषय हा प्रत्येक देशातील सुप्रसिद्ध असे ठिकाण निवडून त्याची प्रतिकृती बनवलेली आहे. ह्या संपूर्ण #Tobu_World_Square क्षेत्रफळ हे ............ एवढे आहे. त्याची सुरवात हि जपान पासून आणि शेवट हा देखील जपान पर्यंत केलेला आहे. तब्बल १०२ प्रतिकृती तेथे उभारल्या गेलेल्या आहेत. सुरवात हि प्रवेशद्वारापासून करूया.
                 
             प्रतिकृती.                               देश.
०. टोकियो स्काय ट्री.
१. न्याश्नल डायेट बिल्डींग.
२. आकासका प्यालेस.
३. टोकियो स्टेशन.
४. टोकियो टावर.
५. इम्पेरिअल हॉटेल.
६. टोकियो डोम.
७. टोकियो न्याश्नल म्युझीयम, होंकन.
८. टोकियो न्याश्नल म्युझीयम, ह्योकेईकन.
९. योयोगी न्याश्नल जिमन्यासीम.
१०. नरिता इंटरन्याश्नल ऐअर पोर्ट, टर्मिनल २.
११. फुजी मारू(प्यासेंजर शिप)
१२. जापनीज टिपिकल फिशिंग पोर्ट.                    १ ते १२ जपान.
१३. फ़ुजुजिओ लाईट हाऊस.                           तैवान.
१४. स्टयाच्यु ऑफ लिबर्टी.                          
१५. प्लाझा हॉटेल ग्रांड आर्मी प्लाझा.
१६. वल्ड ट्रेड सेंटर. अमेरिकन स्टयान्डर्ड बिल्डींग.
१७. एम्पायर स्टेट बिल्डींग.
१८. चार्यस्लर बिल्डींग. सेन्ट्रल पार्क.
१९. फ्लाटीरॉन बिल्डींग. हार्लेम निव्हयोर्क सिटी.
२०. व्हाईट हाऊस.                                   १४ ते २० उनायतेड स्टेट.
२१. पिऱ्यामिड ऑफ मेंन्कौरे.
२२. पिऱ्यामिड ऑफ खाफरे.
२३. पिऱ्यामिड ऑफ खुफू.
२४. ग्रेट स्फिनक्स ऑफ गिझा.                      
२५. अबू सिंम्बेल टेम्पल.                              २१ ते २५ इजिप्त.
२६. पार्थेनॉन.                                        ग्रीस.
२७. रोमन कोलोसीयम.
२८. लीअनिंग टॉवर ऑफ पिसा.                २७, २८ इटली.
२९. एस. टी. पीटर्स ब्यासिलिका.               व्याटीकनस सिटी.
३०. मिलन कॅथेद्रल.
३१. एस. टी. ब्यासिलिका.                     ३०,३१ इटली.
३२. प्यालेस ऑफ वरसाईलेस.
३३. च्यातेअऊ डे चामबोर्ड.
३४. ब्यासिलिक दु स्याक्रे कोईऊरु.
३५. नोट्रे दम दे प्यारीस.
३६. अर्क डे ट्रिओमफे.
३७. आयफेल टॉवर.                          ३२ ते ३७ फ्रान्स.
३८. बेल्वेदरे.                                ऑस्ट्रिया.
३९. बौर्गुंड स्तेव्ह चर्च.                        नॉर्व्हे.
४०. पेटरहोफ प्यालेस.
४१. सेंट बेसिल्स क्याथड्रेल.                     रशिया.
४२. पीस प्यालेस.      
४३. मागेर ब्रग.
४४. द विंड मिल्स एट किंडरडीजक.
४५. द विंड मिल्स ऑफ झान्स सच्न्स(A)
४६.  द विंड मिल्स ऑफ झान्स सच्न्स(B)          ४२ ते ४६ नेदरल्यांड.
४७. नेऊसचवान्सटेन कास्टल.                     जर्मनी.
४८. बकिंघम प्यालेस.
४९. डोवर कास्टल.                    
५०. टॉवर ब्रिज.
५१. वेस्टमीनस्टर अब्बे.
५२. बिग बेन & द प्यालेस ऑफ वेस्टमीनस्टर.       ४७ ते ५१ ग्रेट ब्रिटन.
५३. सागराडा फामिलीआ.                            
५४. अल्हाम्बरा.
५५. पार्क गुयेल.
५६. कासा वीसेन्स.
५७. क्याथड्रेल ऑफ सांता ईऊलायला बार्सिलोना.       ५२ ते ५६ स्पेन.
५८. व्याट अरुण.                                    थायलंड.
५९. मास्जेद ई, इनाम इस्फाहन.                    इराण.
६०. अंगकोर व्याट.                               कंबोडिया.
६१. #ताज महाल.                                #इंडिया.
६२. फॉरबिडेन सिटी.                        
६३. टेम्पल ऑफ हेवेन.                      
६४. मोगाओ केव्स.
६५. युनगांग ग्राटोस.
६६. ग्रेटवॉल ऑफ चायना.                           ६१ ते ६६ चायना.
६७. नामदाईमून.
६८. गायोन्ग्बोक्गुन्न.                               साऊथ कोरिया.
६९. द्रागौन & टायगर प्यागोडा.
७०. ताईपी १०१                                   तैवान.
७१. द प्यागोडा ऑफ इशियामादेरा.
७२. तोशोडाई-जी.
७३. याकुशी-जी.
७४. होरयू-जी.
७५. कासुगातैशा.
७६. निनोमारू प्यालेस ऑफ निजो कास्टल.
७७. किंकाकू-जी.
७८. गीन्काकू-जी.
७९. बायोडो-इन-फोनिक्स हॉल.
८०. क्योटो इम्पेरियल प्यालेस.
८१. कास्टसुरा इम्पेरीयल विला. कियोमीझुदेरा.
८२. द ग्रेट बुद्धा हॉल ऑफ तोडाई-जी.
८३. इत्सूकुशिमा श्राईन.
८४. हिमेजी कास्टल.
८५. झुईगन-जी.
८६. द रेलीक्वारी हॉल ऑफ इंगाकू-जी.
८७. जापनीज फोर सीजन.
८८. मल्टीलेअर हाऊस इन तामूगीमाता, यामागाता.
८९. रेसिडेन्स ऑफ वेल्दी फार्मर, निगाता.
९०. सक्याटर्द हाऊस इन शोकावा तोयामा.
९१. गाशोझुकुरी हाऊस इन शिराकावा गो गीफू.
९२. मिस्टर थोमस रेसिडेंस.
९३. यामातोमे हाऊस, ओसाका.
९४. यामातोमुने हाऊस, इहीमे.
९५. फॉर्मर कायची स्कूल.
९६. मेन बिल्डींग ऑफ डोगो ओनसेन.
९७. औरा चर्च.
९८. द प्यालेस फोर्मली ग्लोव्हर, नागासाकी.
९९. डोझाकी चर्च.
१००.शुरेईमोन.
१०१. सप्पारो क्लॉक टोवर.
१०२. झुलॉजीकल पार्क वीत अमुऊझमेंट पार्क.              ७१ ते १०२ जपान.

हा......आ.आ...आ....... आता लिहून एवढी थकले कि बस.....(यातील बरीचशी नावे मराठीत लिहितांना चुकली असतील), तर फिरतांना पायांचे अक्षरशा तुकडेच पडलेले त्या फिरण्याला काही अंतच राहिला नव्हता. फुल पैसा वसूल होऊन सुद्धा मला असे वाटले सत्त्या खूप स्वस्त तिकीट होत रे...! अजून पैसे मागितले असते तरी मी दिले असते. एवढे संपूर्ण जग सत्यात फिरतांना काय मज्जा येईल ना रे.......!
#मनात_विचार_केला: #अनेक_अनेक_देशांची_प्रतिकृति_आज_पाहिली_भविष्यात_संपूर्ण_जग_सत्यात_पहायला_मिळो.
तुम्ही वाचून सुद्धा तेवढेच थकाल बर. पण हे मी माझ्या आवडीसाठी लिहिले आहे. मला संपूर्ण यादी लिहाविशी वाटली म्हणून मी लिहिली. हे संपूर्ण जग पाहतांना जेवढी मज्जा आली तेवढच लिहितांना देखील आली. त्याचप्रमाणे आठवणींना देखील उजाळा मिळाला. माझ्या प्रत्यूष ला जेव्हा समज येईल तेव्हा मात्र मी नक्कीच त्याला Tobu_Word_Square पाहण्यासाठी घेऊन जाईल, मला पण पुन्हा पाहायला मिळेलना हो..... हि गम्मत कुणाला समजच नाही ओ......
                  1👇
https://www.facebook.com/100003623217859/posts/1287818818015546/?d=n
                  2👇
https://www.facebook.com/100003623217859/posts/1287832314680863/?d=n

Tobu World मधून परततांना Tobu स्टेशन वरती Steam Locomotive(वाफेवर चालणारी आगगाड़ी) नोव्हेंबर 1897 “Taiju” C11207🚂 नावाची आगगाड़ी पाहायला मिळाली. जातांना हिच्या बद्द्ल माहिती होती परंतु ती ठराविक वेळेत पर्यटकांसाठी स्टेशनच्या रुळावर आणली जाते. आणि आम्ही नशिबवानच म्हणा जे शेवटून दुसऱ्या बस ने आलो बहुतेक शेवटच्या बस ने आलो असतो तर हुकली असती. त्यात पर्यटकांची तूफान गर्दी असतांना देखील मी गर्दीतून वाट काढून नवऱ्याला घेऊन गेले. प्रत्येक ठिकाणची धमाल शब्दात मांडत येणार नाही ती थोड्या बहुत प्रमाणात फोटो आणि व्हिडीओ मध्येच पाहू शकता.
                    1👇
https://www.facebook.com/JagtapRajashri12/videos/1856426444657990/?
                   2👇
https://www.facebook.com/JagtapRajashri12/videos/1856423467991621/?

Tobu च्या ह्या संपूर्ण जगात माणसे किंवा प्राणी इतर सजीव आहेत की नाही असा प्रश्न आता तुम्हा सर्वांना पड़ला असेल ना?
तर त्याचे उत्तर हो असेच आहे. आश्चर्य वाटले ना ऐकून?...
चला तर मग शेवटच्या दोन लिंक पहा त्यात जी माणस आहेत त्यांचा आकार हा 1:25 scale miniature(लहान प्रमाणातील प्रतिकृति. ज्याप्रमाणे प्रसिद्ध ठिकाणाच्या प्रतिकृतिंचे आकर कमी केलेले आहेत त्याच प्रमाणात माणुस, प्राणी, ट्रेन, बस, विमान अशी इत्यादि वाहने, वस्तु यांचे देखील आकर बदलवलेले आहेत. यासोबत ज्या त्या ठिकाणचे नैसर्गिक दृश्य देखील हूबेहूब बनवण्यात आलेले आहेत.
त्यामुळे #Tobu_World_Square चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. जपानच्या ह्या कौशल्याला सलाम.
त्यातील इंग्लंड चा हा एक व्हिडिओ
                 👇
https://www.facebook.com/JagtapRajashri12/videos/1856432337990734/?
Miniatures👇
https://www.facebook.com/JagtapRajashri12/videos/1856431007990867/?

संपूर्ण देश एकाच ठिकाणी वसवण्याची ही जपानची संकल्पना अद्वितीय आहे.🙏

एकंदरीत संपूर्ण निक्कोची धमाल पाहण्यासाठी मी आमच्या फोटोंच्या आणि व्हिडीओंच्या लिंक्स येथे दिलेल्या आहेत. कमेंट्स द्वारे नक्की काळवा निक्को कसे वाटले ते........
Missing a lot Japan🇯🇵…….

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...