मुख्य सामग्रीवर वगळा


जेव्हा एक बाळ जन्माला येत तेव्हा त्याच्या हृदयात जर कोणत्याही प्रकारची वाईट भावना, दुःख, जात पात श्रेष्ठ कनिष्ठ, द्वेष, मत्सर, राग हा मुळता जन्मापासून नसतो तर, ह्या भावना समाजातुन मनुष्याच्या मनात रुजवल्या जातात. आणि अशाच काही द्वेषापासून त्या निष्पाप कोमल मनाला दूर ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची बंधने, जाती-धर्म याबद्दलची नकारात्मकता दूरच राहावी याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जुन्या बुरसटलेल्या अंधश्रद्धांवरती विश्वास न ठेवता केवळ निर्मळ श्रद्धा आपण अवलंबलेल्या मार्गावर असावी. फार कुठल्या देव, धर्म, जाती, परंपरा यांचा पगडा यात न अडकता केवळ आनंदी स्वछंदी जगण्यासाठी प्रोत्साहन करणे केवळ हा एक धर्म त्या नवीन मनावर बिंबविणे हाच आपला खरा धर्म आहे. सण म्हणजे प्रत्येक ऋतू मध्ये किंवा हंगामात होणारे बदल याचा उत्सव करणे. काही सण हंगामातील पेरण्या होऊन पिकाची वाट पाहण्याचा आहे, तर काही धन धान्य पिकवून साठा करून भरभराटी चा आहे. सर्व सणांचे उत्सव हे शेतकऱ्यांच्या नियमनसूर साजरे केलेले आहेत म्हणजेच, एक निसर्गाला देव मानण्यात येते. यात एकत्र येणे, आनंदी राहणे, आपली श्रद्धा, भक्ती व्यक्त करणे. नाकारात्मकतेपासून दूर राहणे. हाच केवळ उद्देश मनी बाळगून प्रत्येक उत्सव साजरे करावे. एक कोमल निर्मल निष्पाप मनाकडून सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि आषाढी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्या.

लोक देखोनी उन्मत्त वाराणी आसक्त |
न बोले बुद्धरूप ठेवीले जयनी हात ||
संत तया दारी तिष्ठताती निरंतरी |
पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा |
बौद्ध अवतार घेऊन विटे समाचरण ठेवून ||
धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागे बौद्धरुपे पंढरी नांदसी ||
संत एकनाथ महाराज....
पद्यपाणी पद्यपाणी पद्यपाणी

फोटोंच्या मेहनती विषयी थोडे बहुत:
माझ्या पिल्लुच्या फोटोंसाठी सगळ्यांच्या मेहनतीचा वाटा समान आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे फोटो काढायचे म्हंटल कि सगळेच तयार असतात. मामा आणि मम्मा ने टाळ, चंदन, बुक्का, अष्टगंध, सॅंडल आणली. हे सगळ सामान आणायला निघालो आणि मुसळधार पाऊस आला तसेच चिंब भिजत गाडीवर भर वेगात घरी निघून आलो, पणजी आई कडून टोपी आणली, घरा मागे राहण्याऱ्या जगताप आज्जी ने लहान असतांना ड्रेस आणला होता त्यावर आकाशी जॅकेट सुद्धा आहे, पण सद्या उपयोगी आला तो हा पांढरा पोशाख, आशा मावशीची ओढणी घेतली, तुळशीची माळ मी एकदा सात आठ वर्षांपूर्वी सहलीला गेले होते तेव्हा आणली होती. तेव्हा मी याचा कदापी विचार केला नव्हता कि माझ्या बाळाच्या फोटोशूट साठी मला तिचा वापर होईल, मासी ने आणि मम्मा ने पिल्लूला नटवलं जे फार अवघड काम होते. त्याहूनही अवघड असे कि पिल्लू ने सर्व फोटोशूट करायला फार सहकार्य केले तो नेहमीच मला खूप आनंदी ठेवतो त्याच्या ह्या गोजिऱ्या वारकऱ्याच्या रूपाने तर माझ्या डोळ्यात अश्रू आणले निसर्गाची मी खूप आभारी आहे कि त्याने माझ्या पदरी ह्या सुंदर गोजिऱ्या बाळाला दिले आणि ह्या सगळ्या फोटोशूट, फोटो आणि व्हिडीओ चा आनंद आई बाबांनी सर्वात जास्त उचलला, बाकी वारकरी संप्रदया बद्दलची  बरीचशी माहिती त्यांनी आम्हाला दिली दिवसभर अभंग आणि गाणी याचा गजर चालूच होता. मासी मामा ने पटापट एडिटिंग करून दिले मी वरील लेख हा एकादशीच्या आदल्या दिवशीच लिहून ठेवला होता. अशी हि मेहनत घरातल्या ऐकून ऐकून माणसाने उचलली. कुणालाही उपवास नसतांना रताळी, साबुदाणा वडा, बटाटा चटणी, दही, तळलेली मिरची असे एकादशीचा दुप्पट खाशी फराळ मात्र दणकावुन केले. ड्याडींची आम्हाला khupआठवण आली. असे आनंदी उत्साही आमचे छोटेसे कुटुंब.

राजश्री जगताप✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...