मुख्य सामग्रीवर वगळा

व्हाट्सअप फ्रेंड्स

#व्हाट्सअप_फ्रेंड्स प्रज्ञा आणि माझी ओळख दंडे अलंकार, नाशिक रोड येथे झाली होती. मला हवी तशी दागिन्यांची डिझाईन बनवण्यामध्ये त्यांनी खूप मदत केली. त्याचप्रमाणे वेळेवर माझी ऑर्डर काढून देली. त्यासाठी आम्ही एकमेकींचे नंबर घेतले, आणि व्हाट्सअप स्टेटस फॉलो करता करता खूप छान बेस्ट फ्रेंड्स झालो. त्या माझ्या दांडग्या ब्लाइंड फॉलोवर आहेत. माझे लेख, फोटोज व्हिडीओज ला त्या फार आवडीने प्रतिसाद देतात कधी बरेच दिवस लेख आला नाही कि त्या आवर्जून विचारतात तुम्ही खूप दिवसापासून काहीच लिहिले नाही. मला तुमचं लिखाण फार आवडत, मी नियमित लिखाण चालू ठेवावं यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहन देत असतात. बोलता बोलता कळाले आमच्या दोघींचे सासर आसपासचेच. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही एकमेकींच्या घरी जाणार होतो. एवढं नाही तर माझ्या जेवणाची सुद्धा त्या नेहमी वाह वाह करत असतात. खरी सुगरण, ऑल राउंडर अशी मला हाक मारतात. तस अजून लॉकडाऊन मुळे त्यांच्यासाठी स्वयंपाकाचा योग आला नाही पण मी नक्कीच प्लान करेल. एप्रिल मध्ये आम्ही निवांत भेटणार होतो पण हल्लीच्या करोना च्या परिस्थिती काहीच शक्य झाले नाही. आमची मैत्री २०१७ पासून असल्यामुळे मी काही आरामात भेटण्याची वाट पाहिली नाही, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन येत असे. तिथेच काय ती आमच्या गप्पांची मैफिल व्हायची. संक्रांतीच्या सणाला मी साडी नेसून पिल्लूला खेळणी आणायला गेले, अचानक मनात आले चला प्रज्ञाला भेटू जातांना छानसे मोगऱ्याचे गजरे घेतले. भेट होताच दोघी खुश झालो. आमच्या दोघींची पसंती सारखीच आहे हे मी आधीच जाणलं होत पण आज साड्यांच्या रंग डिझाईन वरून पाहिलं सुद्धा कारण पाहिले तर दोघींनी सारख्या वारक्याच साड्या नेसलेल्या होत्या. साड्या,गजरे, मैत्रिणीची भेट याने संक्रांतीचा सण सुंदरच साजरा झाला. सण साजरा करण्यासाठी सांस्कृतिक पद्धतीनेच तो करावा किंवा झाला पाहिजे असे बंधन योग्य नाही दोन सुहासिनी भेटल्या सुखादुःखाची फुले गप्पांमधून काही गजऱ्यातून वाटून घेतली हाच माझ्यासाठी मोठा सण झाला. घरी येऊन आनंदाने मम्मीला गप्पा सांगितल्या. माझ्या घरातल्या सर्वांनाच प्रज्ञाचा स्वभाव आवडतो. "स्वीट लेडी" म्हणून आम्ही त्यांना संबोधतो. त्याच कारण पण तसच आहे. शांत स्वभाव, बोलतांना हळूच आणि मोजकंच शिवाय प्रेमाने त्या बोलतात. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात काहीना काही संघर्ष असतो. तसच त्याही फार हिंमतवान आहेत. संसारासाठी तडजोड, जपून मोजून मापून उधळपट्टी नकरता संसार करणे, आपल्या छोट्याशा एकुलत्या एक बाहुलीच संगोपन सुद्धा त्या खूप छान पद्धतीने करतात. हे त्यांच्यातील गुण मी टिपले. त्याचप्रमाणे मी कधीही कोणत्याही कामासाठी फोन केला कि त्या नक्कीच प्रतिसाद देतात मला हव्या त्या दागिन्यांच्या डिझाइन्स विषयी माहिती त्यांच्याकडून मिळते. सिया त्यांची छोटी मुलगी मी सिया डॉल म्हणते. तीसुद्धा माझी फॅन आहे. सिया ला मला खूप भेटायची ईच्छा आहे. लवकरच भेटू आपण सिया डॉल. हे मला खूप दिवसापासून लिहायचे होते पण आरामात करता करता शेवटी आज प्रज्ञाच्या वाढदिवसादिवशी आमच्या मैत्री विषयी लिहण्याचा योग आलाच. आमचे संक्रांतीचे फोटो पाहून सगळ्यांना वाटले आम्ही बहिणी आहोत. माझ्या ह्या बहिणीसारख्या गोड मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐🥳😘 खूप खूप आनंदी रहा हीच सदिच्छा💐 राजश्री जगताप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...