मुख्य सामग्रीवर वगळा

चुडीवाले.

#चुडीवाले 

                  रोज एक दोन चक्कर पणजी आई च्या घरी फिरायला गेल्या शिवाय आम्ही जेवण करत नाही, झोपत नाही. फिरायला जायचं कॅबीला सोबत तिच्या बाळांसोबत मस्ती करायची मगच आमचा दिवस मजेत जातो. काल जाता जाता पणजी आईच्या दारातच बांगड्यावाला दिसला, त्याला बघून जोर जोरात ओरडून.... घे घे घेघेएए, बांगड्यावाल्यावर ओरडून.... द्द्या द्द्या.... 
बांगड्यावाला बाबा पण... घे बाई बांगड्या तुझं बाळ घ्यायला सांगतय घे.... 
नको बेटा मम्माने पैसे नाही आणले नको आपण उद्या घेऊ आता नको तरी हट्ट चालूच नईईई नईई... विकायला काय आलेलं आहे आणि ते कोणासाठी आहे याचा काहीही एक संबंध नाही केवळ मम्मा आपल्या सांगण्यावर काहीतरी घेतेय याच समाधान त्याला हवं असत. आमचा आवाज ऐकून पणजी आई बाहेर आली आणि त्याच्या ह्या हट्टावर तिने देखील घे घे मी देते पैसे जाऊदे नको रडवू त्याला म्हणत लाडाने फुंकर घातली. आपल्या बाळाला सुद्धा काळत आपल्या आईसाठी आपल्यासाठी कोण कोण काय काय लाड करतात आपल्या मुलांना ह्या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. त्यांना मोठ्या माणसांची पारख असते. बांगड्या घेऊन मी हातात घाले पर्यंत त्याला धीर नव्हता बांगड्या हातात घालुन त्याला छन छन वाजवून दाखवल्या आणि फोटो काढले तेव्हा त्याला समाधान आणि आनंद झाला लेकराच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी वाट्टेल ते करावं वाटत. 
भाग्यवंत हो बाळा❤️😘

नको बेटा असं म्हंटल तेव्हाचा एक फोटो आणि बांगड्या घेतल्यानंतरचे फोटो पाहून त्याचा हट्ट समजून येतोच.🥰😘

राजश्री जगताप.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...