मुख्य सामग्रीवर वगळा
प्रत्युष भारतात आल्यापासून पिल्लू(संस्कृती) त्याची खूप छान मैत्रीण झाली. त्याचे खूप लाड करते, काळजी घेते. प्रत्युष ची मम्मी प्रत्युष मम्मी तुम्हाला माहित आहे का माझा सक्खा भाऊ कोण आहे?, नाही ग! कोण ग? ओळखा ओळखा, नाही ग तू सांग ना? आआआ ओळखाणाआआ....! तूच सांग चल हारल्या का तुम्ही?, हो बोला, हो मी हारले.... अहो प्रत्युषच माझा सख्खा भाऊ आहे हाहाहा.... आग हो बघना मला माहीतच नव्हतं ग.... तेव्हा पासून प्रत्युष आणि पिल्लू दीदी एकदम बेस्ट फ्रेंड दोघांना एकमेकांसोबत खेळायला आवडत. दोघांची धम्माल मस्ती चालते. राखीच्या दिवशी सकाळ होताच दात न घासता दोघांनी सेलिब्रेशन ला सुरवात केली. ते रात्री 11,11.30 पर्यंत धमाल मस्ती चालूच होती. चार महिन्यापासून लॉकडाऊन ची खेळायची कसरच पोरांनी काढली. प्रत्युषसाठी सुंदर आठवणीत राहील अशी राखी तिने बनवून आणली. छान छान मिठाई आणली. दिवसभर पिल्लुच्या गप्पा आणि फोटोशूट चालूच होत. पिल्लू बद्दल सांगायचं झालं तर पिल्लू आमच्या रो हाऊस मधली छोटीशी गोड बाहुली. बोलायला आणि मोठ्या माणसाचं मन राखायला खूप हुशार. शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात एक नंबर काढते. तिला अभ्यास पण करायला फार आवडत. दादागिरी तर भारीच जमते, सगळ्यात जास्त मला माझे बाबाच घाबरतात असं तीच म्हणणं. अग पिल्लू बाबा आवाज देताय जा म्हंटल तर, अहो प्रत्युष ची मम्मी तुम्ही घाबरू नका बाबा मला आवाज देता पण मी समोर गेले कि तेच मला घाबरता हाहाहा.... हो का ग मग आता तुझी मम्मी आवाज देते बघ.... अरे बापरे आले आले हं मी... करून पोरगी धूम ठोकते. वरून आपल्याला येऊन फसवते अहो प्रत्युषची मम्मी माझी मम्मी चिडचिडी आहे ना मग उगाच रागवत बसते म्हणून मला जाव लागत तिला शांत करायला हाहाहा.... अशी हि आमची पिल्लू दीदी आघाव पण हुशार. आणि आजी बाई सुद्धा. तिच्या गप्पा फार मोठ्या मोठ्या असतात. पण अशी अचूक आणि चोख बोलते कि आपलं मन हिरावून टाकते. आणि हे चुटकुल प्रत्युष पिल्लू नांन्टू... ते पण तीच नाव घेतलं कि भारी खुश आज पासून पिल्लू परत लॉकडाऊन झाली त्यामुळे ती आली नाही तर तीच नाव घेताच हाच तिच्या घरी पळत सुटला. आतापर्यंत दोघांचे भरपूर फोटो आणि व्हिडीओज काढलेले आहेत. त्यातले आजचे हे फोटो स्पेशल आहेत. असा आमच्या रक्षाबंधनचा सण साजरा झाला. लहान मुलांच्या आनंदासाठी मोठ्यांना झुकावंच लागत. तीच आवाज देणंच फार प्रेमाने लाडाने असत. प्रत्युषच्या सगळ्या नावातून तिला नांन्टू च बोलायला आवडत. मला पण कधी मावशी दीदी म्हणत नाही तर प्रत्युष ची मम्मी म्हणूनच हाक मारते. जे मला खूप खूप आवडत. पिल्लू बद्दल लिहायला खूप काय काय आहे. आता सध्या हे छोटस. आणि हो पिल्लू तुला अजून छान गिफ्ट घेईल हा आरामात. नांन्टू ने ह्या वर्षी राख्या बांधून नाही घेतल्या पण मी जपून ठेवेल आणि त्याला दाखवेल मोठा झाला कि बांधेल. Love you Pillu❤️😘 Love you Nantu❤️😘 दोघा बहीण भावाला उदंड आयुष्य लाभो😘😘 प्रगती करा यशस्वी व्हा माझ्या दोन्ही पिल्लांनो😘😘 राजश्री जगताप

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!

पावसाच्या रेघात खेळ-खेळू दोघात....­­­­­­­!           पाऊस कुणाला आवडत नाही?,--सगळ्यांनाच आवडतो.. अस मला नेहमी वाटायच पण, असे अपवादात्मक लोक बरेच आहेत बरं... म्हणजे त्यांना मी Boaring Item म्हणते. आणि मला अशा लोकांच खूपच आश्चर्य वाटत, राग येतो आणि हसू पण येते. आश्चर्य यासाठी कि पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसून संपूर्ण देहालाच नाही तर मनाला देखील एक-एक थेंब चिंब करत असतो. आणि हा इतका सुखाचा क्षण कसा बर यांना आवडत नाही. ऋतूंचा आस्वाद घेणे ह्या लोकांना का आवडत नाही? किंवा तो घेता येत नाही, ‘कमाल आहे राव’...! राग यासाठी येतो कि हे स्वतः तर पावसाच्या सरींचा आनंद लुटत नाहीत, दुसऱ्याला हि घेऊ देत नाहीत, नाही,.. म्हणजे काळजी स्तवच असत हे सगळ पण, आजारी आपण कुठल्याही कारणाने पडू शकतोच ना.? मग पावसात भिजल्याने आजारपण आले तर एवढ काय वाईट आहे..? ह्म्म्म्... आणि हसू याचे येते कि बिचारे त्यांना जगायचं कस मुळात हेच ठाऊक नसत. आपण जगून दाखवलं तरी ते त्यांना फारस जमत नाही, कारण तीही एक कला आहे जी मला अवगत आहे... हाहःह्ह...!          ...